लहान मुलींना त्यांच्या भविष्याची कल्पना करता यावी म्हणून बार्बीची एन्ट्री झाली

मला चांगलचं  आठवतयं, माझा  बर्थडे होता, पाचवं वर्ष संपून  सहाव्या वर्षात पदार्पण करणार होते. पाचवा  बर्थडे म्हणून पप्पांनी लय मोठे नियोजन केलं होतं. लहान पोरांना चिवडा, केक आणि चॉकलेट होतं तर मोठ्या माणसांना आईनं स्वतः पुरी भाजी केली होती.

घरात गप्पा गोष्टी सुरू होत्या, मोठी माणसं मला आवडीने गोंजारत होती, तर माझ्या वयाची पोर पोरी माझ्या भोवती गराडा घालून होती. आता बर्थडेचा एक दिवस तर असतो जेव्हा आपल्याला  सगळ्यात स्पेशल असल्याचं फिलं होत.

तर प्रथेनुसार सगळ्यांनी मला ओवाळलं, केक कापला. आता वेळ होती गिफ्ट राऊंडची. कोणी कपडे आणले, कोणी घरात वापरल्या येतील अशा आईच्या कामाच्या वस्तू आणल्या,  कुणी पुस्तक दिली कोणी पैसे दिले तर कुणी बिस्कीट पुडे. पण मला एका गोष्टीची लयं आतूरता असायची. तो गुलाबी रंगाचा बार्बीचा बॉक्स. जो मला माझ्या प्रत्येक बर्थडेला मिळायचाचं.

त्या बार्बीसोबत मी खेळायचे, तिचा  मेकअप करायचे,  तिला आपली मैत्रीण म्हणून तिच्याशी बोलत बसायचे, तर  अशी ही माझी बार्बी सोबतची आठवण. आपल्यातल्या बऱ्याच महिलांच्या लहानपणीच्या बार्बीसोबतच्या आठवणी अश्याचं  काहीशा असतील. आणि पुरुष मंडळींच्या आठवणी आपल्या लहान मुलीला, छोट्या बहिणीला एकदा तरी बार्बी गिफ्ट केलेली असणार.

असो… तर अशा या सगळ्यांच्या आठवणीतल्या बार्बीचा आज बर्थडे.  ९ मार्च १८५९ साली बार्बी डॉलची एन्ट्री झाली. न्यूयॉर्कमधल्या अमेरिकन टॉय फेअरमध्ये पहिली बार्बी डॉल सादर करण्यात आलेली. सोनेरी केस आणि काही फिचर्स असलेली ही डॉल ११ इंच उंच होती. मॅटेल कंपनीकडून ही मार्केट मध्ये आणली गेली होती.

या बार्बी डॉलची ही कन्सेप्ट होती, रूथ हँडलर यांची. ज्यांनी आपल्या नवऱ्याची १९४५ साली स्थापन झालेली ही मॅटेल कंपनी  जॉईन केली. ही कंपनी खेळाचं साहित्य तयार करायची.

एक दिवस रूथ हँडलरची मुलगी बारबरा  कागदाच्या बाहुल्यांसोबत खेळत होती, रूपये हे बघितलं आणि तिथूनचं  बार्बी डॉलची कन्सेप्ट समोर आली. लहान मुलींना त्यांच्या भविष्याची कल्पना करता येईल अशा खेळण्यांची बाजारात गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आणि त्यांनी लगेच त्यावर काम करायला सुद्धा सुरुवात केली.

पण अडचण अशी होती तकी, रूथने जेव्हा ही कन्सेप्ट आपल्या नवऱ्या समोर आणि कंपनी समोर मांडली तेव्हा ती कोणालाच पटली नाही. अमेरिकेत अशा प्रकारचे प्रॉडक्ट चालणार नाही, असं सगळ्यांचं मत होतं.

पण रुथ यांना आपल्या कन्सेप्टवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी बार्बीवर अजून काम करायचं ठरवलं. बार्बीचं रूप लिली या जर्मन कॉमिक बुक मधल्या कॅरेक्टरसारखं होतं. त्यांनी अमेरिकेच्या एका टॉय फेयरमध्ये बार्बी सादर केली होती. ज्याला बरीच पसंती मिळाली.

आणि शेवटी मॅटेल कंपनीने बार्बी डॉल मार्केटमध्ये उतरवलीचं. बघता बघता रुथ यांचा शब्द खरा ठरला आणि बार्बीची लोकप्रियता वाढली. रुथ हँडलरने तिचं नाव बारबरा या मुलीच्या नावावर ठेवले.

1955 मध्ये, मिकी माऊस क्लब या टीव्ही कार्यक्रमाच्या  स्पॉन्सरशिपसोबत मुलांसाठी जाहिराती प्रसारित करणारी मॅटेल ही पहिली खेळण्यांची कंपनी बनली. याच्या मदतीने  कंपनीने आपल्या नवीन खेळण्यांची जाहिरात करण्यास सुरुवात केली.

बार्बी आता जगभरात पोहोचली होती.  त्यामुळे तिच्यासोबत बाकीच्या कॅरॅक्टरची सुद्धा मागणी वाढली. म्हणजे 1961 ला बार्बी डॉलच्या बॉयफ्रेंड, ज्याच्या नाव रुथ यांनी आपल्या मुलाच्या नावावरून ठेवलं. 1963 मध्ये बार्बीचा बेस्ट फ्रेंड मिडज  आला, 1964 साली बार्बीची धाकटी बहीण स्कीपरची  एन्ट्री झाली. तस तशी मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर होऊ लागली.

या बार्बीमध्ये सुद्धा नवनवीन रूप समोर येत लागली.  एअरलाइन ऑपरेटर, डॉक्टर, पायलट, ऑलिम्पिक अॅथलीट आणि यूएस अध्यक्षीय उमेदवार म्हणून सुद्धा ती समोर आली. यासोबतच डिझायनर कपडे, कार मेकअपच्या सामान सुद्धा सप्लाय व्हायला सुरुवात झाली.

आता कुठलीही यशस्वी गोष्ट एकदा ना एकदा वादात सापडतेच असंच बार्बी सोबत सुद्धा झालं.  ते तिच्या फिगरमुळे.  पण त्याचा बार्बीच्या विक्रीवर काडीमात्र फरक पडला नाही  आणि आजही  कितीही नवनवीन खेळणी आली तरी मुलींची फेवरेट ही बार्बीचं  राहते.

बदलत्या जमान्यात बरोबरसुद्धा बार्बी बदलत गेली. फक्त खेळण्यात पुरता मर्यादित न राहता बार्बीवर  चित्रपट तयार झाले,  पुस्तकं लिहिली गेली, एवढचं नाही तर सोशल मीडियावर सुद्धा बार्बी नावाने अकाउंट पहायला मिळतील. एकूण काय गेल्या ६३ वर्षांत या वर्ल्ड फेमस बार्बीची क्रेज जरा सुद्धा कमी झाली नाही.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.