आगरकर व टिळकांना जामीन मिळवून देण्यासाठी महात्मा फुले मदतीला आले होते.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे फार मोठे देशभक्त व प्रकांडपंडित म्हणून ओळखले जायचे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना दिवाणी व फौजदारी अशा दोन्ही प्रकारच्या खटल्यांना सामोरे जावे लागले होते…अशाच एका खटल्यात ‘बर्वे प्रकरण’ त्याकाळी बरंच गाजलं होतं. ज्यात महात्मा फुलेंनी टिळकांना जामिन मिळवण्यासाठी मदत केली होती.

नेमकं काय प्रकरण होतं? ज्याचा सबंध भोसले घराण्याशी देखील होता. 

१९८२ मध्ये त्यावेळेच्या कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधव बर्वे यांनी टिळक आणि आगरकर यांच्यावर अब्रूनुकसानीची केस दाखल केली होती. हा खटला सुनावणीसाठी त्यावेळच्या कायद्याप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरला होता. या खटल्यामध्ये टिळक आणि आगरकर यांचे वकील होते ते फिरोजशहा मेहता. जे पुढे मुंबईचे मोठे नेते म्हणून उदयास आले. या खटल्यात टिळक-आगरकर यांना चार महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा झाली होती.

टिळकांकडे फारशी संपत्ती नव्हतीच त्यामुळे ते आपल्या जामिनासाठी प्रयत्न करू शकले नव्हते. 

वकील लोकांना तसेच इतर खर्च देण्यासाठी टिळकांना पैशांची गरज होती. त्यात हि अडचण ज्योतीराव फुलेंना कळाली. त्यांच्याकडे देखील इतके पैसे नव्हते पण त्यांची मैत्री पुण्यातील भवानी पेठेतल्या श्रीमंत व गुळाचे व्यापारी रामू शेट उरवणे यांच्या सोबत होती. रामू शेट उरवणे हे ज्योतीरावांना खूप मानत असत.

ज्योतिरावांच्या सांगण्यावरून रा. रामू शेट उरवणे यांनी टिळक आणि आगरकरांच्या जामिनासाठी  त्यावेळी दहा हजार रुपये भरले आणि जामीन मिळवला. तसेच त्यांच्या वकिलांचे पैसेही

पण भोसले घराण्याशी या प्रकरणाचा काय सबंध ?

आगरकर केसरीचे व टिळक मराठ्यांचे संपादक होते तेंव्हाची गोष्ट. वृत्तपत्रांद्वारे आपल्या अग्रलेखांद्वारे हे दोन्ही समाजसुधारक लोकशिक्षण, राजकीय जागृती व शासकीय अन्यायाचा प्रतिकार इत्यादींवर लिहित असायचे.

त्याच दरम्यान केसरी व मराठ्यातून कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वे यांच्यावर टीका करणारे लेख सतत छापून येत असायचे. कि, दिवाण माधवराव बर्वे हे कोल्हापूर संस्थांनाशी, गादीसोबत विश्वासघात करतात. कामकाजात गैरकारभार करतात. माधवराव बर्वे हे कोल्हापूर संस्थानाचा कारभार पाहत होते. मात्र चौथे शिवाजी जसे जसे मोठे होत होते. तेंव्हा बर्वे यांना वाटलं आता आपले वर्चस्व कमी होत आहे. मग त्यांनी कोल्हापूरचे शासक चौथे शिवाजी महाराज हे मानसिक रुग्ण आहेत, वेडे आहेत अशी हूल उठवली आणि राज्याच्या कारभारावर आपले नियंत्रण आणले. 

मराठा विश्वात कोल्हापूर हे फक्त दुसरे संस्थान नव्हते. छत्रपती शिवरायांशी थेट संबंध असल्यामुळे हे एक विशेष स्थान होते.

टिळक आणि आगरकर यांनी त्यांच्या लेखांतून छत्रपतींच्या निदान, उपचार आणि मानसिक स्थितीवर जाहीरपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आगरकरांच्या संपादना खालील केसरी आणि टिळकांच्या अंतर्गत मराठा या दोन्ही वृत्तपत्रांनी लेखांत असा युक्तिवाद केला की शिवाजी चौथा ‘वेडा’ नव्हता. तर त्यांची  मानसिक स्थिती नाजूक होती. तेही त्यांच्या सेवकांनी आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या गैरवर्तनामुळे होती. त्याला.

ब्रिटिशांनी कोल्हापूरचा म्हणून नियुक्त केलेल्या कारभारी महादेव बर्वेवर शिवाजीला वेडा बनवण्याच्या कटात सामील असल्याचा आरोप या लेखांत केला होता.

या जाहीर बदनामी मुळे महादेव बर्वे यांनी टिळक आणि आगरकर यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला. टिळक आणि आगरकरांच्या टिप्पण्या मोठ्या प्रमाणावर ब्रिटिशांवर कारवाई करण्याच्या त्यांच्या इच्छेमुळे प्रेरित होत्या. कारण इंग्रज सरकारच्या छत्रपती शिवाजींसंबंधीच्या वर्तणुकीवर त्यांनी कडाडून टीका केली.

त्या दोघांना त्यांनी केलेले आरोप सिद्ध करता आले नाहीत म्हणून ते दोषी आढळले आणि त्यांना चार महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.  टिळक व आगरकर यांना शिक्षेसाठी डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले.

याच क्षणी महात्मा फुले त्यांच्या बाजूने बोलण्यासाठी तसेच आर्थिक मदतीसाठी पुढे आले. आणि २६ ऑक्टोबर १८८२ रोजी त्या दोघांची सुटका झाली

ही मदत करण्यामागे ज्योतिरावांचा एक मोठा हेतू होता तो म्हणजे, आगरकर आणि टिळकांवरील खटला खोटा ठरला तर ब्रिटिश सरकार कोल्हापूरच्या गादीवर अन्याय करीत आहे असे सिद्ध होईल आणि त्यांच्या कैदेत असलेल्या शिवाजी महाराजांची सुटका होईल. 

महाराजांना वेडे ठरवणाऱ्या बर्वेंच ऐकून इंग्रज सरकारने जरी न्यायनिष्ठुरता दाखविली, तसेच टिळक-आगरकर सुटून आल्यावर सरकारने त्यांना कैद केल्याबद्दल निषेध व्यक्त करावा म्हणून मुंबईतील सत्यशोधक समाजाचे तरुण पुढारी नारायणराव लोखंडे व इतर मराठे मंडळींनी डोंगरी जेलपासून थाटा-माठात मुंबईभर टिळक-आगरकरांची मिरवणूक काढली होती. तसेच त्यांना पानसुपारी, हारतुरे आणि शेलपागोटे अर्पण केले होते.

पुण्यात ज्योतिरावांनीही सत्यशोधक समाजाची सभा भरवून त्या सभेत त्यांचे स्वागत करून सरकारचा निषेध केला होता. 

टिळक – आगरकर यांच्या घेतलेल्या भूमिकांमुळे टिळक आणि कोल्हापूर राजघराण्यांमध्ये घनिष्ठ संबंध निर्माण झाले, जे १८९४ मध्ये सिंहासनावर बसलेल्या पुढील शासक शाहूंच्या काळात देखील कायम राहिले होते. टिळकांच्याच सूचनेनुसार, शाहूंनी क्रांतिकारी उपक्रम राबवणाऱ्या शिवाजी क्लबला पैसे आणि शस्त्रासह मदत केली. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

.

 

Leave A Reply

Your email address will not be published.