महात्मा गांधींवर विषप्रयोग करण्याचा डाव इंग्रजांच्या एका आचाऱ्याने उधळून लावला होता.

महात्मा गांधी म्हणजे आपल्या देशाला लाभलेले असमान्य व्यक्तिमत्त्व ! त्यांच्या नावातच सर्व काही आले.

ज्यांनी आयुष्यभर अहिंसा धर्म शिकवला आणि त्याच्या जोरावर अनेक आंदोलन यशस्वी केलीत आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याच अहिंसावादी गांधीजींना मारण्याचे, त्यांच्या हत्येचे किती प्रयत्न झालेत. त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे इंग्रजांकडून झालेला विषप्रयोग !

महात्मा गांधी यांच्यावर अगदी सुरुवातीच्या काळात ते सक्रीय झाले तेंव्हाची हि घटना आहे. काही भारतीयांनी त्या महात्मा गांधींना वाचवलेल्या एका शूर स्वयंपाक्याबद्दल माहितीच नाही. पण त्या कर्तव्यासाठी त्याला आयुष्यात त्यासाठी खूप मोठी किंमत मोजायला लागली. 

काय होता हा प्रसंग वाचायलाच हवा असा आहे….ज्या एका स्वयंपाक्याने गांधीजींचा जीव वाचवून आपल्या देशाचा इतिहास बदलला !

हा काळ तेंव्हाच आहे जेंव्हा ब्रिटिशांनी भारतात नील आणि अफूची शेती करण्याची योजना अमलात येत असतांनाच त्याला भारतीयांचा विरोध होत होता.

कारण याच  दोन्ही पिकांचे उत्पन्न कमवून इंग्रज परदेशात घेऊन जात असायचे. अर्थातच इंग्रजांना याचा फायदा त्यांच्या भारतावर सत्ता गाजवण्यासाठी होत असायचा. परिणामी त्यांनी हि शेती भारताच्या काही भागात म्हणजेच बंगाल, ओडिशा, बिहार या राज्यामध्ये हि शेती अनिवार्य केली. कारण इंग्रज हेच अफू चीनमध्ये पाठवले जायचे. त्यातूनही त्यांना मोठा फायदा होत होता. नीळचे उत्पादन युरोपात पाठवून त्यातूनही मोठा नफा ब्रिटीश करून घेत होते.

अशा सगळ्या घडामोडी भारतात घडत होत्या आणि त्याच दरम्यान गांधीजी आफ्रिकेहून भारतात परतले होते. ब्रिटीशांच्या या जुलूमशाहीबद्दल गांधीजींना कळले. 

अफूची आणि नीलची शेती करून जमिनीची उत्पादकता कमी होत होती हे त्यांच्या कानावर आले. म्हणून तेथील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महात्मा गांधी यांना चंपारणला गेले.

गांधीजी येणार म्हणल्यावर तेथील चंपारण चा व्यवस्थापक डब्ल्यू एस इरविन याला कल्पना आली कि गांधीजी येऊन येथे या समस्येवर तोडगा काढणार. महात्मा गांधी यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले आणि समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली.

ठरलं तसं गांधीजी आले… १५ एप्रिल १९१७ दिवशीच्या दुपारी हजारो लोकं बिहारच्या पूर्व चंपारणमधील मोतीहारी रेल्वे स्थानकावर गांधीजींची वाट पाहण्यासाठी जमले होते. त्यांना आशा होती कि, आता गांधीजी च आपल्याला या समस्येतून बाहेर काढतील.  मुजफ्फरपूरहून येणाऱ्या ट्रेनमधून गांधी स्टेशनवर उतरले तेव्हा दुपारी ३ वाजले होते. स्थानिक शेतकऱ्यांना जमीनदारांकडून नील पिकवण्यासाठी भाग पाडले जात होते अशा भयावह परिस्थितीची चौकशी करण्यासाठी ते आले होते.

गांधींना एरविनकडून डिनरचे आमंत्रण मिळाले.

मात्र त्याच्या मनात काय काळबेरं काय आहे याची कल्पना कुणालाच नव्हती. 
सत्य कथनामुळे महात्मा गांधीचे प्राण वाचले, तरी त्या स्वयंपाक्याला याची मोठी किंमत मोजावी लागली. त्याला कारागृहात डांबण्यात आले. त्याचे घर उद्ध्वस्त करण्यात आले. त्याची जमीन जप्त करण्यात आली. त्याचे कुटुंब देशोधडीला लागले. या स्वयंपाक्याचे नाव मियां अन्सारी असे होते. इतिहासात ही घटना नमूद करण्यात आली नसली, तरी सरकारी दस्तऐवजात याची नोंद आहे.

म्हणून एरविनने आपल्या स्वयंपाकी मियां अन्सारी याला गांधींना विषाने भरलेल्या दुधाचा पेला देण्यास सांगितले. यासाठी त्याला मोठी रक्कम ऑफर केली. हे काम नाही केलं तर गंभीर शिक्षा देईल अशा धमक्या दिल्या.जेव्हा दुधाचा पेला द्यायची वेळ आली, तेव्हा दुधाचा पेला देताना त्या स्वयंपाक्याने महात्मा गांधींना सत्य सांगितले आणि त्यामागील एरविनचा भयानक हेतू उघड केला. आणि यामुळे महात्मा गांधींचे प्राण वाचले.

त्या स्वयंपाक्याला याची मोठी किंमत मोजावी लागली.

त्याला तुरुंगात टाकले. त्याची जमीन जप्त करण्यात आली. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला त्यांच्या गावातून बाहेर काढण्यात आले. इतिहासात ही घटना नमूद करण्यात आली नसली, तरी सरकारी दस्तऐवजात याची नोंद आहे.

त्यानंतर कालांतराने, १९५० पर्यंत डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी मोतीहारीला भेट दिली आणि त्याच्या शौर्याची दखल घेतली. त्याच्या कुटुंबाला भेडसावणाऱ्या कष्टांबद्दल जाणून घेतल्यावर, राजेंद्र प्रसाद यांनी  प्रदेशाच्या जिल्हाधिकाऱ्यांना बटक मियां आणि त्याच्या तीन मुलांना २४ एकर जमीन  देण्याचे आदेश दिले होते.

जर बटक मियां नसता, तर गांधीजींच बरं-वाईट झालं असतं, असा प्रसंग ओढावला असता तर  आज आपला इतिहास वेगळा असता !

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.