बाटला हाऊस प्रकरणातला डॅशिंग पोलीस अधिकारी आपल्या बदनाम लव्हस्टोरीमुळे संपला

भारतात रोज कित्येक खून पडतात, हत्या घडतात, सूडाच्या भावनेतून घडलेल्या गोष्टी, वैयक्तिक वादातून झालेल्या हत्या, अंडरवर्ल्डमधील घटना अशा अनेकी गोष्टी आपण वाचत असतो. पण काही घटना या इतक्या विचित्र असतात कि नक्की दोषी कोण असा प्रश्न पडतो. अनेक गुंतागुंतीच्या केसेस शेवट्पर्यंत त्यांचा निकाल लागत नाही.

आजचा किस्सा असाच आहे ज्यामुळे सगळा देश नक्की आरोपी कोण आहे या प्रश्नाच्या मागे लागून सगळ्या शक्यतांचा अंदाज लावत बसला होता पण शेवटी निघालं भलतंच.

दिल्लीतील स्पेशल सेल हे खासकरून दहशतवादी आणि अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुन्हेगारांना पकडण्यासाठी बनवण्यात आलं होतं. याच स्पेशल सेलमधील एका अधिकाऱ्यासोबत एक अशी घटना घडली कि स्पेशल सेलची बरीच बदनामी झाली होती.

बद्रीश दत्त.

हे स्पेशल सेलच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांपैकी एक होते. बाटला हाऊसमध्ये झालेल्या एन्काऊंटर मध्ये बद्रीश दत्त यांचा महत्वाचा रोल होता. बद्रीश दत्त यांचं नाव खरं प्रसिद्धीच्या झोतात आलं ते म्हणजे मॅच फिक्सिंगच्या वेळी.

२०१३ साली आयपीएल मध्ये झालेल्या मॅच फिक्सिंगच्या वेळी श्रीशांत, अजित चंडिला, अंकित चव्हाण या लोकांना दोषी ठरवण्यात आलं होत. बुकी, फिक्सर्स, अवैध मार्गाने मिळवलेले पैसे या सगळ्या प्रकरणाचा उलगडा केला होता तो बद्रीश दत्त यांनी. सर्वात आधी त्यांनी या प्रकरणाची तक्रार नोंदवली होती.

बुकी लोकांच्या एका फोन टॅपची माहिती बद्रीश दत्त यांना मिळाली आणि पुढे त्यांना कळलं कि यात काही खेळाडूही सामील आहे, त्याच कनेक्शन अंडरवर्ल्डशी आहे. दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम यात महत्वाचा दुआ आहे अशी माहिती त्यांनी मिळवली होती. पुढे अनेक लोकं यात अडकली. पण पुढे घडणारी घटना विलक्षण होती.

९ मे २०१३ ला बद्रीश दत्त आयपीएल फिक्सिंगची FIR नोंदवतात. आणि पुढच्या २४ तासात बद्रीश दत्त यांची हत्या होते. दिल्लीतल्या गुडगावमध्ये एका अपार्टमेंटमध्ये बद्रीश दत्त यांचं प्रेत सापडतं. ११ मे २०१३ च्या सकाळी पोलिसांनी ज्यावेळी ती खोली उघडली तेव्हा तिथे बद्रीश दत्त यांच्या प्रेताबरोबर एका महिलेचही प्रेत सापडलं.

आयपीएल फिक्सिंगची FIR नोंदवल्यानंतर सिनियर अधिकाऱ्यांसोबत त्यांची मिटिंग होती पण ते पोहचू शकले नाही. फोन केला तर फोन उचलला जात नव्हता आणि बद्रीशी दत्त हे कधीच कुठल्या कामात उशीर करत नसत म्हणून पोलिसांना शंका अली आणि त्यांना थेट हत्या झालेले बद्रीश दत्त मिळाले.

त्यांच्यासोबत जी महिला मृतावस्थेत सापडली ती होती डिटेक्टर गीता शर्मा. पोलिसांनी तपासाची सगळी सूत्र अंडरवर्ल्डकडे वळवली. दाऊद इब्राहिमचा यात हात असण्याची शक्यता वर्तवली जात होती. कारण आयपीएल फिक्सिंगमध्ये त्याचा भाऊ असल्याचं तपासात आढळून आलं होतं. पण खरी स्टोरी वेगळीच होती.

पहिल्यांदा जेव्हा खोलीत त्यांचे मृतदेह पाहण्यात आले तेव्हा असं दिसत होतं कि गीता शर्माने बद्रीश दत्त यांची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. पण जेव्हा फॉरेन्सिक टीम आली तेव्हा तिसरीच भानगड समोर आली ती म्हणजे बद्रीश दत्त यांनी आधी गीता शर्माला गोळी झाडून ठार केलं आणि नंतर स्वतः डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

ज्यावेळी पोलिसांनी दाऊदच्या D COMPANY वरून मुद्दा हटवून सखोल चौकशी केली तेव्हा उलगडा झाला. यात मॅच फिक्सिंगचा मुद्दाही मागे पडला आणि नवीन चौकशीला सुरवात झाली.

बद्रीश दत्त हे आपल्या बायकोपासून बरेच वर्ष वेगळे राहत होते. डिटेक्टर गीता शर्मा हि त्यांची गर्लफ्रेंड होती आणि ते तिच्याच सोबत तिच्या फ्लॅटमध्ये राहत होते. गीता शर्मा हि एक डिटेक्टर होती आणि छोट्या मोठ्या केसेस ती सॉल्व्ह करायची.

एकदा गीता शर्माने रीतसर परवानगी न घेता गृहमंत्रालयाचे फोन टॅप केले होते आणि त्या गुन्ह्यात तिला तुरुंगात डांबण्यात आले होते.

गीताला विश्वास होता या प्रकरणात बद्रीश दत्त तिला सोडवतील पण बद्रीश दत्त यांनी यात काहीही हालचाल केली नाही. ते साधं तिला भेटायला तुरुंगातही गेले नाही. त्यामुळे ती बद्रीश दत्त याना टॉर्चर करत होती कि जर तू मला यातून सोडवलं नाही तर तुझे सगळे सिक्रेट सिनियर अधिकाऱ्यांना सांगिल म्हणून.

जेव्हा गीता शर्मा सुटून बाहेर आली तेव्हा बद्रीश यांच्याशी तिचे वाद होऊ लागले आणि या सततच्या टॉर्चरने बद्रीश दत्त यांनी गीता शर्माला गोळी घातली आणि स्वतःही आत्महत्या केली.

यात असलेला अंडरवर्ल्ड आणि मॅच फिक्सिंगचा मुद्दा पूर्णतः बाजूला गेला. यात या गोष्टींचा काहीही संबंध आढळला नाही. मात्र स्पेशल सेलला आपला एक स्पेशल अधिकारी गमवावा लागला.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.