टी-२०, टेस्ट, वनडे कुठलाही फॉरमॅट असूद्या ऋषभ पंतने स्वतःला सिद्ध करून दाखवलंय

भारताला आता पर्यंत एकसेबडकर एक विकेट किपर मिळाले आहेत. त्यात किरण मोरे पासून, नयन मोंगिया, महेंद्रसिंग धोनी सारखे नाव घेतलं जात. हल्ली अजून एक नाव यात जोडले गेले आहे. ते म्हणजे ऋषभ पंत.

शुक्रवारी दिल्ली डेहराडून मार्गावर ऋषभ पंतच्या कारचा अपघात झाला. सुदैवाने त्याला जास्त काही लागले नाही. कार चालवतांना अचानपणे झोप लागल्याने त्याचा अपघात झाल्याचे सांगितलं जात आहे.

कमी काळात ऋषभ पंत टिम इंडियाचा लाडका प्लेयर झाला

विकेटच्या मागे ५० ओव्हर थांबून आपल्या सहकाऱ्यांना विश्वास देणं आणि कधी ओपनिंग तर कधी मिडल ऑर्डरवर येऊन पंतने अनेकवेळा टिम इंडियाला मदत केली आहे. अनेकवेळा तो कुठल्या नंबरला येणार म्हणून वाद निर्माण झाले होते.

मैदानावरील वातावरण हसत खेळत ठेवण्याचे काम ऋषभ पंत करत असतो. मध्यंतरी त्याचा फॉर्म पूर्ण गंडला होता. बीसीसीआय आणि निवड समितीला त्याच्यातील टॅलेंट बद्दल विश्वास होता. त्यामुळे त्याच्या  पडत्या काळात सुद्धा पंतला अनेक संधी दिल्या.

पंत करियर फक्त फार मोठं नाही. मात्र कमी काळात त्याने आपली छाप पडल्याचे दिसून येते. 

ऋषभ पंतचा जन्म उत्तराखंड मधील हरिद्वार येथे ४ ऑक्टोबर १९९७ झाला. वडिलांचे नाव राजेंद्र तर आईचे नाव सरोज पंत आहे. २०१७ मध्ये ऋषभच्या वडिलांचे निधन झाले. मात्र त्याच्या आईने कधीच ही जाणीव त्याला होऊ दिली नाही. ऋषभ पंत क्रिकेटर होण्यास त्याच्या आईचा मोठा रोल राहिला आहे.

पंतला क्रिकेटचे चांगला कोच मिळावा म्हणून वयाच्या १२ वर्षांपासून दिल्ली येथील सॉनेट क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांच्याकडे पाठवले जात होते. त्यांच्यातील टॅलेंट ओळखून त्यांना अनेक संधी मिळत गेल्या. पुढे त्याने त्याच सोन केलं.

डोमेस्टिक क्रिकेटचे मधून सुरुवात

ऋषभ पंतचा फर्स्ट क्लास करियरची सुरुवात  २२ ऑक्टोबर २०१५ मध्ये रणजी ट्रॉफी ने झाली. २०१५ ला अंडर १९ वर्ल्डकपसाठी भारतीय संघात निवड झाली होती.

२०१६-१७ च्या रणजी ट्रॉफीमध्ये पंतने एका डावात ३०८ रन्स काढले होते. या त्रिशतकासह पंत भारतीय क्रिकेटच्या इतिहासात तीन शतके करणारा तिसरा खेळाडू ठरला होता. २०१६ मध्ये पंतने रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळताना झारखंडविरुद्ध सर्वात जलद शतक मारले होते. २०१७ मध्ये त्याला विजय हजारे ट्रॉफीसाठी दिल्लीचा कर्णधार बनवण्यात आले.

२०१६ ऋषभ पंत पहिल्यांदा छाप पाडली. २०१६ ला अंडर १९ वर्ल्डकप मध्ये संधी मिळाली होती. विकेटकिपर असणाऱ्या पंत ने २४ बॉल मध्ये ७५ रान काढून सगळ्याचे लक्ष वेधून घेतले होते. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा चांगले रन्स काढले. २०१६ चा वर्ल्डकप भारताला जिंकता आला नाही. मात्र ऋषभ पंत हा लंबी रेस का घोडा आहे हे समजलं होत.

२०१६ मध्ये आयपीएल मधून सुरुवात करणाऱ्या ऋषभ पंतच टॅलेंट पाहून एक वर्षाच्या आता भारतीय संघात स्थान मिळाले. फेब्रुवारी २०१७ मध्ये इंग्लंड विरोधात टी-२० क्रिकेट मधून पंतने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले. त्यानंतर एक एक करत टिम इंडियाच्या टेस्ट आणि वन डे टिम मध्ये त्याला स्थान मिळाले.

इंटरनॅशल क्रिकेट मधील करियर फक्त ५ वर्षांच आहे. टी-२०, वनडे आणि टेस्ट क्रिकेट या तीनही फॉर्मट मध्ये पंतने स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. पंतने आता पर्यंत ३३ टेस्ट मॅच खेळाला असून २ हजार २७१ रन काढले आहेत. भारताकडून त्याने ३० वनडे मॅच खेळल्या आहेत. त्यात  ८६५ रन काढले आहेत. तर भारताकडून ६६ टी-२० मॅच खेळला आहे.

शुक्रवारी झालेल्या अपघातातून पंत लवकरच बाहेर पडून भारतीय संघाकडून खेळतील असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.