डिप्रेशन मध्ये गेल्यावर बीटल्स ग्रुप ज्या आश्रमात आला होता त्या आश्रमाची आजची अवस्था कशी आहे.
बीटल्स ग्रुप…संगीत विश्वातील एक जबदस्त ताकदवान बँड. अख्ख जग बीटल्सच्या गाण्यावर थिरकत होतं. बीटल्स म्हणजे तुमच्या आमच्या पिढीतल्या पोरा-पोरांचे मोटीव्हेशनल सिंगर्स..ज्यांची गाणी सर्वासाठी प्रेरणादायी वाटतात. थोडं जरी उदास वाटलं तरी बीटल्स ची गाणी लावायची..शप्पथ सांगतो लय बरं वाटतं. बरं आपण आज जे बोलणार आहोत ते म्हणजे आपल्याला इन्स्पायर करणारा हा ग्रुप मात्र कसल्या तरी विवंचनेत होता.
काहीश्या डिप्रेशमध्ये होता, मनात बराच गोंधळ माजत होता, त्यांना त्यांचं मन खात होतं….त्यांचे डोळे आणि मन कसल्यातरी शोधात होते. शेवटी त्यांना उत्तर सापडलं …अध्यात्माचं !
अध्यात्म म्हणलं कि बीटल्स ग्रुपला नजरेसमोर फक्त भारत दिसला. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाच्या बाबतीत, भारत सर्वच देशांचं कुतूहल जागृत करतो, सगळं जग याबाबतीत भारताकडे आकर्षित होते, फक्त या आकर्षणामुळे, १९६८ मध्ये हे बीटल्स ग्रुपचे तारे भारतात दाखल झाले होते.
सगळ्या जगात फेमस असलेला पॉप बँड ग्रुप ‘द बीटल्स’ भारतात आला होता, तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या ग्रुपमधल्या पोरा-पोरांनी थेट भारत गाठला का? तर आध्यात्मिक प्रबोधनाच्या शोधात, जेणेकरून ते त्यांच्या संगीतात ते काहीतरी परिवर्तन घडवू शकतील.
इंग्लंडमधील लिव्हरपूल येथील जॉन लेनन, पॉल मॅकार्टनी, जॉर्ज हॅरिसन आणि रिंगो स्टार या ऐन विशीतील युवा-चौकडीच्या ‘बीटल्स ग्रुप’ ने प्रस्थापित पाश्चात्य संगीत क्षेत्रात बंडखोरी करून युरोप व अमेरिकेत १९६० च्या दशकाच्या पूर्वार्धात वादळ निर्माण केलं होतं. त्यांची त्याकाळात खूप हवा होती. बीटल्स ग्रुपने तरुणांमध्ये तुफान लोकप्रियता मिळवली होती. तेंव्हा जगभरात परिवर्तनाचे वारे सुरू असताना संगीत क्षेत्रात त्याचे हुंकार ‘बीटल्स’ द्वारे उमटले होते. पण त्यांच्या ग्रुपचा मॅनेजर ब्रायन एप्स्टाईन याच्या मृत्युनंतर अस्वस्थ झालेल्या या बीटल्स ग्रुपने मनःशांतीसाठी भारतात धाव घेतली होती.
इंग्लंडमधील एक म्युझिक बँड भारतात ध्यान करायला येतो म्हणजे हि बातमी त्या काळात जगभरात गाजली होती.
यासाठी त्यांनी ऋषिकेश आश्रम गाठला. त्या काळात महर्षी महेश योगी यांचा दिव्य योग ऋषिकेशमध्ये खूप प्रसिद्ध होता. महेश योगी यांचे ध्यान शिबीर लोकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करत. असंही त्या काळी देशात आणि जगात ध्यान आणि योगाची लाट होती आणि विशेषत: महेश योगींचा हा अतिसंवेदनशील योग लोकांचे लक्ष वेधून घेत होता…कारण हे ध्यानधारणा करून लोकांच्या आयुष्यात समाधान मिळत होते.
बीटल्स ग्रुप ऐकून होता ते फेब्रुवारी १९६८ मध्ये महर्षी महेश योगी यांच्या ऋषिकेश येथील आश्रमाच्या ध्यानधारणा शिबिरात ते दाखल झाले. गंगेपासून काही अंतरावर ऋषिकेशच्या जंगलात बांधलेला हा आश्रम खरोखरच सुंदर होता, ध्यानासाठी छोट्या झोपड्या, सुंदर नजारे, निसर्गरम्य वातावरण, जवळच असलेली पवित्र गंगा नदी सगळं काही छान होतं. फॅब फोर म्हणजेच बीटल्सचे सदस्य भारतातील या आध्यात्मिक आश्रमात येताच मंत्रमुग्ध झाले.
आश्रमाचे महर्षी महेश योगी यांनी बीटल्स ग्रुपला वचन दिले होते की ते त्यांच्या मानसिक आणि आध्यात्मिक समस्या दूर करतील, जेणेकरून त्यांना शांती मिळेल.
बरं ऋषिकेश आश्रमात या ग्रुपने काय थोड्या थोडक्या दिवसांसाठी नाहीतर तब्बल सहा महिन्यांचं वास्तव्य ठोकलं होतं. हे सगळे फॉरेनर पोरं-पोरी इथे इतके रमले होते कि, इथे ते सुती पायजमा आणि देवतांच्या चित्रांनी सजवलेला कुर्ता परिधान करत, ध्यानधारणा करत, शाकाहारी जेवण खात, गाणी म्हणत….हळहळू त्यांना इथे शांतात मिळत गेली आणि आयुष्याचा अर्थही ..
त्यांच्या या वास्तव्यात लेनन, मॅकार्टनी यांनी सुमारे चाळीसच्या वर गाणी लिहिली व ती प्रामुख्याने ‘व्हाईट अल्बम’ या ध्वनिमुद्रिकेद्वारे प्रसिद्ध झाली. ऋषिकेश आश्रमात आलेल्या अनुभवांनी प्रभावित होऊन त्यांनी अशा गाण्यांमध्ये ‘मदर नेचर्स सन’, ‘जय गुरुदेवा ओम’, ‘डीअर प्रुडन्स’, ‘अक्रॉस द युनिव्हर्स’ ‘रिव्होल्युशन’ अशी धार्मिकतेवर आधारित गाणी लिहिली होती. तसेच त्यांनी ओपन कॉन्सर्ट बंद करून अल्बमवरच फोकस केलं.
याच आश्रमात राहून या फेमस ग्रुपने ‘ओब-ला-दा’ आणि ‘बॅक इन द यूएसएसआर’ हे हिट गाणे तयार केले होते. जे लोकं बीटल्स ग्रुपचे फॅन्स आहेत त्या फॅन्ससाठी हा आश्रम कोणत्या मंदिरापेक्षा कमी नाही. मात्र त्याची आता जीर्ण अवस्था झाली असं सांगण्यात येतंय.
असो केवळ भारतालाच नाही तर ऋषिकेश आश्रमालाही विसर पडला आहे की, बीटल्स ग्रुप भारताच्या दौऱ्यावर आलेलय बीटल्स ग्रुपने तब्ब्ल ६ महिने इथे राहून गेले होते. त्यानंतर बीटल्स चे फॅन्स या आश्रमाला भेट द्यायचे.
त्यावेळी हा आश्रम अतिशय अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज होता, भित्तीचित्रे, घंटा, छान हिरवेगार रेखीव झाडं होते, हिरवे पोपट, अनेक सुंदर पक्षी, सुंदर सुसज्ज झोपड्या हे सर्वच मनमोहक होते. पण नंतर महेश योगी यांनी शिष्यांसह हा आश्रम सोडला.आणि ऐंशीच्या दशकापासून हे आश्रम एक अवशेष बनले, येथे रानटी वेली, झुडपे आश्रमात वाढली. परंतु बीटल्समुळे आजही येथे लोक येत असतात. पण हा आश्रम मात्र जीर्ण अवस्थेत आहे.
आजही बीटल्सच्या चाहत्यांचे संदेश भिंतींवर लिहिलेले आहेत. स्प्रे पेंटसह अनेक कलाकृती बनवल्या गेल्या आहेत.
या आश्रमाला ‘बीटल्स आश्रम’ असे नाव देण्यात आले आहे, परंतु त्याची अवस्था पाहून कोणीही म्हणू शकत नाही की जगातील सर्वात प्रसिद्ध पॉप ग्रुपने एकदा येथे काही दिवस घालवले होते आणि याच आश्रमात राहून त्यांना आपल्या कलेमध्ये आणखी काहीतरी नवीन करण्याची उमेद मिळाली होती.
हे हि वाच भिडू :
- भोजपुरी गाण्यांना पॉपचा तडका मिळाला आणि वासेपूरचा २७ गाण्यांचा अल्बम हिट झाला.
- गोल्डमॅन ने एकदा भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती
- शक्तिमानचं नाही तर नव्वदीच्या या देशी सुपरहिरोंवर सुद्धा पिक्चर बनायला पाहिजे