चौथीच्या मुलाने वडिलांच्या पश्चात वडिलांवर लिहलेला निंबध व्हायरल झालाय कारण..
माझे पप्पा म्हणायचे, तू मोठा साहेब हो, अभ्यास केला नाहीस तर कुनीबी मदत करत नाही, हे कोणत्या नेत्याचे भाषणातील शब्द नाहीत तर हे हा आहे एका चौथीच्या विद्यार्थ्याचा आपल्या वडिलांविषयी लिहिलेला निबंध. या मुलाच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्याला शाळेत बाबांविषयी निबंध लिहायला सांगितला आणि या मुलाने जे लिहलं ते इतकं मनातून लिहलं होतं की पाहतां पाहतां तो निबंध Wtsapp वरुन व्हायरल झाला. लोक त्या मुलाचे चौकशी करू लागले.
बीडच्या सिटीझन या वर्तमानपत्राने त्यांच्याबद्दलची माहिती घेवून बातमी छापली. त्याच्याबद्दल लोकांनी वाचलं आणि अगदी आपल्या मुलाप्रमाणे त्याच्या मदतीसाठी सज्ज झाले.
ही गोष्ट आहे, आष्टी तालुक्यातील वाळकेवाडी येथील मंगेश वाळके या चौथीत शिकणाऱ्या मुलाची. जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मंगेश वाळके या विद्यार्थ्याने हा निबंध लिहिलाय. वर्गशिक्षिका श्रीमती नजमा शेख यांनी हा निबंध वाचला आणि त्यांच्या डोळ्यातुन पाणी आले.
वडिल हयात नसलेल्या कुटुंबाची आणि मुलांची काय अवस्था होते. हेच मंगेशने आपल्या वहीतील पानावर उतरविले. १३ ओळीच्या निबंधात मंगेशचे दुःख आणि त्याच्या मनातील भावना प्रत्येकाच्या हृदयाला भिडणाऱ्या आहेत.
माझ्या पप्पांना टीबी झाला होता. ते मला खाऊ, पेन आणायचे. माझे पप्पा वारले तेव्हा माझी आई आणि मी खूप रडलो. पप्पा नाहीत तर आता आम्हाला चोरांची भीती वाटते, पप्पा तुम्ही परत या, असेही मंगेशने या निबंधात म्हंटले आहे.
‘घरात पप्पा म्हणायचे, खुप अभ्यास कर. मोठा साहेब हो. कुणीच मदत करत नाही. तुम्ही लवकर परत या’ हे शब्द जीवाला जाऊन भिडतात.
मंगेशची आई दिव्यांग असुन मंगेशच घरातील सर्व कामात मदत करून शाळा शिकत आहे. मंगेशची त्याच्या पप्पा प्रती असलेली ओढ आणि प्रेम हे त्याच्या शब्दातून जाणवत आहेत. पण, आज समाजात अशी अनेक घरे आहेत जिथे बाप केवळ पोरांच्या आठवणीत आणि भिंतीवर टांगलेल्या फोटोत आढळतो. कुणीच मदत करत नाही. तुम्ही लवकर परत या’अशा पोरांसाठी समाजाने पुढाकार घेऊन त्याची सुरक्षा करायला हवी.