बीड रेल्वे स्टेशनला ‘या’ तरुण नेत्याचं नाव देण्याची मागणी का होतेय ?

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील अनेक वर्ष मोठा मुद्दा बनला होता. गेले  भिजत घातलेला मार्गी लागला आहे. बीड जिल्ह्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाची स्वप्न पूर्ती झालेली आहे. ” कोण आली रे कोण आली…बीड जिल्ह्याची रेल्वे आली”… या घोषणांनी आज बीडकर खुश झाले आहेत. कधी निधी अभावी तर कधी राजकीय इच्छाशक्तीअभावी हा रेल्वे प्रकल्प रखडून पडलेला होता जो आता पूर्ण झाला आहे.  

बहुप्रतीक्षित नगर-बीड-परळी रेल्वे मार्गावर नगर ते आष्टी या ६० किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून नगरहून सोलापूर वाडी आणि तिथून आष्टीपर्यंत हि रेल्वे धावलीय. त्यामुळे येत्या काही दिवसात आष्टी ते नगर रेल्वे प्रवास शक्य होणार आहे.

आता या रेल्वेची सर्वप्रथम मागणी कुणी केली तसेच या रेल्वे प्रकल्पाचा पाठपुरावा कुणी याचीच चर्चा सगळीकडे चालू झाली आहे. पण बीडचे ग्रामस्थ या यशाचे श्रेय सर्वांनाच देतायेत.  त्यातले महत्वाचे नाव म्हणजे स्व. गोपीनाथराव मुंडे तसेच स्व.खासदार सौ.केशरकाकू क्षीरसागर आणि स्व. अमोल गलधर !!!

या मध्ये आणखी महत्वाची नवे म्हणजे, तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख साहेब,स्व.विमलताई मुंदडा,तत्कालीन पालकमंञी जयदत्त (आण्णा) क्षीरसागर,खा.रजनीताई पाटील, माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि विद्यमान खासदार प्रीतमताई मुंडे तसेच तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी बीडच्या रेल्वे साठी अथक प्रयत्न केले. 

May be an image of 4 people and people standing

या मागणीची मूळ सुरुवात स्व.खासदार सौ.केशरकाकू क्षीरसागर यांनी केली होती असं सांगण्यात येतं.

या रेल्वेप्रश्नासाठी तत्कालीन खासदार स्व.केशरकाकू क्षीरसागर यांनी सातत्याने १० वर्ष पाठपुरावा केला होता.  त्यासाठी त्यांनी तत्कालीन इंदिरा गांधी यांची भेट घेतली होती.

May be an image of 2 people, people standing and text that says "अहमदनगर- बीड- रेल्वे मार्ग मागणीसाठी खा. सौ. केशरबाई क्षीरसागर ऊर्फ काकू यांच्या नेतृत्वाखाली दिल्ठी येथे तत्कालीन पतप्रधान कै. इंदिरा गांधी यांची भेट घेतली असताना."

तसेच बीड रेल्वेचा मागणी घेऊन त्या तात्कालाईन पंतप्रधान राजीव गांधी यांनाही भेटायला गेल्या होत्या.

May be an image of 4 people, people standing and text that says "而 190 MAAH तत्कालीन पतंप्रधान राजीव गांधी यांच्या समवेत रेल्वे शिष्ट मंडळ"

त्यांच्या या पाठपुराव्यामुळे या रेल्वेमार्गाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळण्यातील सर्व अडथळे दूर झाले होते.  त्यानंतर हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी बीड जिल्हा रेल्वे संघर्ष समितीने नेटाने प्रयत्न केले होते.

या संघर्ष समितीतील पदाधिकाऱ्यांनि मिळून तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्याकडे घेऊन गेलो होतो. या समितीच्या आग्रही भूमिकेची दखल घेत स्व.विलासराव देशमुख यांनी या प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी ५०% खर्च राज्य सरकारच्या वतीने उचलण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला होता. मागील काही वर्षांपूर्वी बीड रेल्वेसाठी भरघोष असा निधी उपलब्ध करून देण्यात आला ज्यामध्ये राज्याने देखील अर्धा वाटा उचलला होता.   या कामासाठी माजी ग्रामविकास मंत्री तथा बीडच्या माजी पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला,त्यामुळे सर्व काही शक्य झाले असल्याच्या भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

खरं पाहिले तर हि रेल्वे बीडमध्ये आणण्यामध्ये तर याचं श्रेय प्रत्येकालाच जाते…कारण बीडचे प्रत्येक लोकप्रतिनिधी या लढयात होता, तसेच आंदोलनामध्ये होता. यामध्ये सर्वात महत्वाचं नाव म्हणजे, स्वर्गीय अमोल गलधर हे तरुण तडफदार नेते.

हे अमोल गलधर कोण होते ? ज्यांचं नाव बीड रेल्वे स्टेशनला द्यावं अशी मागणी त्यांचे कार्यकर्ते आणि बीडचे ग्रामस्थ करत आहेत.

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, स्वर्गीय विलासराव देशमुख, स्व. केशर काकू क्षीरसागर यांचा मोलाचा वाटा आहे कारण केंद्रातून निधी आणण्याचं श्रेय ह्या मोठ्या लोकांना जाते. पण या रेल्वेसाठी तळागाळातून  लोकांना संघटित करणे, त्यांना रेल्वे वाहतुकीचे महत्व समजावून सांगणे इथपासून ते रेल्वेसाठी आंदोलन करणे इथपर्यंतचा सर्वच संघर्ष त्यांनी अगदी नेटाने केला होता. अख्ख्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातून तरुण मुलं त्यांनी एकत्र केली होती त्यात महिलांनाच देखील समावेश होता. आज जलधर नाहीत, त्यांचे २०१० साली एका अपघातात निधन झाले आहे. 

रेल्वेच्या कृती समितीमध्ये युवा कृती बीड जिल्हा समितीचा देखील महत्वाचा वाटा होता.  स्व. अमोल गलधर युवा तरुण तडफदार मुलगा एका शेतकरी कुटुंबातला होता. लढाऊ वृत्तीच्या अमोल गलधर यांनी त्या दरम्यान जेवढे रेल्वेमंत्री झालेले असतील मग ते लालूप्रसाद यादव असो वा ममता बॅनर्जी. या सर्व रेल्वेमंत्र्यांना त्यांनी बीड रेल्वे प्रशांसाठी भेट घेऊन पाठपुरावा केला होता.

 एक वेळेस तर त्यांनी ममता बॅनर्जी या रेल्वेमंत्री असतांना ममता यांचा पुतळा जाळून त्याची राख शासकीय कार्यालयामध्ये पाठवली होती.

त्यांच्याकडे त्या दरम्यान राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचं प्रदेश उपाध्यक्ष पद होतं. तसेच ते बीड मधील आधार प्रतिष्ठानचे ते संस्थापक होते.

रेल्वेचा प्रश्न त्यांनी इतका लावून धरला होता कि,  रेल्वेच्या आंदोलनादरम्यान बीडमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी अमोल गलधर याना अटक केली होती. अमोल गलधर यांची लोकप्रियता इतकी होती कि, त्यांच्या अटकेची बातमी पसरातच बीडमधील परिस्थिती चिघळली होती, त्यांचे कार्यकर्ते सार्वजनिक ठिकाणी दगडफेक करत होते.

WhatsApp Image 2021 12 30 at 4.49.49 PM

WhatsApp Image 2021 12 30 at 4.48.50 PM

त्या दरम्यान बीडमध्ये इतका हा वाद चिघळला होता की, संपूर्ण बीड बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्यामुळे अखेर पोलिसांनी अमोल गलधर यांना नागरिकांसमोर आणलं होतं तेंव्हा कुठे त्यांचे कार्यकर्ते शांत झाले होते. जरी अमोल गलधर हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी नेते होते तरी जेंव्हा बीडच्या रेल्वेचा मुद्दा उपस्थित व्हायचा तेंव्हा सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची एकजूट होत असे. 

WhatsApp Image 2021 12 30 at 4.47.40 PM

तसेच अमोल गलधर यांनी एकदा याच प्रश्नाला घेऊन टॉवर वर जाऊन शोले स्टाईल मध्ये आंदोलन देखील केलं होतं. तसेच त्यांनी एकदा आकाशवाणी बंद पाडली होती, तेंव्हा त्यांचं हे आंदोलन राज्यभरात गाजलं होतं.  त्यांनी केलेल्या संघर्षाला स्मरण करून स्वर्गीय अमोल गलधर यांचे नाव रेल्वे टेशन ला द्यावे अशी बीडच्या प्रत्येक तरुणांची भावना आहे असं सांगण्यात येतंय. 

त्यामुळे बीडच्या रेल्वेसाठी पहिलं नाव घेतलं जातं ते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचं आणि त्यांच्यानंतर अमोल गलधर यांचं नाव घेतलंच जातं. त्यामुळे या बीड रेल्वेला स्व. गोपीनाथराव मुंडे यांचं द्यावं आणि बीड रेल्वे स्टेशनला अमोल गलधर यांचं नाव द्यावं अशी मागणी बीडच्या ग्रामस्थांनी उचलून धरली आहे.  

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.