स्टार्टअप सुरु करायच्या आधी त्याची सगळी A,b,c,d, माहित करून घे भिडू …

जसा कोरोनाचा काळ सुरु झाला तेव्हापासून बऱ्याच नव्या गोष्टींची, शब्दांची माहिती आपल्याला झाली. म्हणजे एकीकडे जिथं निगेटिव्ह वातावरण होत, तिथे एका शब्दानं जादूची कांडी फिरवल्यासारखं पॉझिटिव्हिटी पसरवली, तो म्हणजे स्टार्टअप. 

म्हणजे कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लादल्यामुळं सगळ्याचं क्षेत्रांना मंदीची झळ बसली, त्यामुळे पगार कपात, नोकर कपात मोठया प्रमाणावर व्हायला लागली. अक्षरशः खायची पंचायीत झाली.

तेव्हा बऱ्याच भिडूंच्या डोक्यात स्टार्टअप सारखी आयडिया आली. परत कुठल्या एखाद्या नोकरीच्या भरवश्यावर बसण्यापेक्षा आपला स्वतःचा स्टार्टअप सुरु करून पैसा कमवायचा यावर लोक भर द्यायला लागली. 

त्यातल्या बऱ्याच जणांचे दगड बरोबर निशाण्यावर लागले आणि त्यांच्या सक्सेस स्टोऱ्या बाकीच्या इन्स्पायर करायला लागल्या. त्यातचं  स्टार्टअपची वाढती क्रेझ पाहून सरकारने सुद्धा यंदाच्या बजेटमध्ये हा मुद्दा सिरिअसली घेतला. त्यामुळे आपल्याला वेगळं काहीतरी करायचंय असं म्हणणाऱ्या लोकांच्या विचारांना आणखी बळ मिळालं.  

त्यात सोने पे सुहागा म्हणत शार्क टॅंक सारखा शो भारतात आला, आणि लोकांचा स्टार्टअपमध्ये आणखी इंटरेस्ट वाढल. त्यामुळे स्टार्टअपच्या बाजूने लोकांचा कल आणखी वाढला. पण स्टार्टअपचा विषय जितका इंटरेस्टिंग वाटलं, तितकचं कन्फ्युजन सुद्धा वाढायला लागलं. कारण होते त्यातले काही मार्केटिंगआणि फायनान्सचे शब्द, जसं कि B to B, B to C, इक्विटी आणि आणखी बरंच काही… 

आता भिडू तुम्ही सुद्धा स्टार्टअपची आयडिया डोक्यात घेऊन फिरणारे असाल तर आपण या शब्दाची  a,b,c,d जरा सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. 

B to B 

 B to B  म्हणजे बिजनेस टू बिजनेस. म्हणजे समजा तुम्ही एखादं हेअर ऑइल तयार करता. जे तुम्ही थेट ग्राहकांना विकण्याऐवजी एखाद्या कंपनीसोबत डील करता. आणि ती कंपनी तुमचं प्रोडक्ट पुढे  ग्राहकांना सप्लाय करते. म्हणजे यातला दुसरा बिजनेस ती कंपनी असते. जी एक प्रकारे तुमचं प्रोडक्ट विकण्यासाठी मध्यस्थी असते.  अशा प्रकारात कंपनीचा जास्त फायदा असतो. 

B to C

B to C  म्हणजे बिजनेस टू कस्टमर. म्हणजे तुमचं हेअर ऑइल तुम्ही कोणत्याही मध्यस्थी शिवाय थेट ग्राहकांना विकता. या प्रकारात तुम्ही जास्त फायद्यात राहता.

इक्विटी

इक्विटी म्हणजे तुमच्या कंपनीत किंवा स्टार्टअपमध्ये दुसर्‍या गुंतवणूकदाराचा हिस्सा. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याला तुमच्या स्टार्टअपबद्दल सांगता तेव्हा तुम्ही त्याला तुमच्या स्टार्टअपमध्ये थोडी गुंतवणूक करायला सांगता ज्या बदल्यात तुम्हाला त्याला तुमच्या कंपनीचा थोडा हिस्सा द्यावा लागतो. म्हणजे तुमच्या हेअर ऑइलच्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला ५० लाखांची गुंतवणूक हवी आहे, त्या बदल्यात तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला १ टक्के इक्विटी देता, अर्थात हिस्सा देता.

व्हॅल्युएशन

 व्यवसाय किंवा कंपनीच्या इकॉनॉमिक व्हॅल्यूला काढणं व्हॅल्यूएशन म्हणतात. यावरून या कंपनीची किंमत किती असेल हे समजू शकते. उदाहरणार्थ, जेव्हाही आपण आपला माल विकायला जातो तेव्हा त्याचा दर्जा पाहून किंमतीचा अंदाज लावला जातो. त्यानंतर फायलन व्हॅल्यूएशननंतर मालाची विक्री केली जाते.

मार्जिन

उत्पादनाची किंमत आणि ते विकल्यानंतर मिळणारा नफा यातील फरकाला मार्जिन किंवा प्रॉफिट मार्जिन म्हणतात.

हे ही वाचं भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.