कोल इंडिया सुरु व्हायच्या आधी, कोळश्याच्या व्यापारावर वासेपूर राज्य करत होतं.

कोळशात खपायची रग भारतातल्या लोकांना फार पूर्वीपासूनच आहे. आणि आज हि ती काही केल्या कमी होईना. अगदी जेव्हा जेव्हा कोळसा डोळ्यासमोर येतो तेव्हा हमखास गँग्ज ऑफ वासेपूरची आणि त्यातल्या कॅरेक्टर्सची आठवण यायला पाहिजे. आजची स्टोरी कोल इंडियाची असली तरी रामधीरसिंग आणि शाहिद खानला डावलून कस चालेल ? त्यांचं कॉण्ट्रिब्युशन कोणताच भारतीय विसरू शकणार नाही. कारण

इन्सान जो है दो नसलं के होते है, एक हरामी और दुसरे बेवकूफ. और ये सारा खेल इन दोनो का ही है ।

तुम्ही कोणत्या कॅटेगरीत येता ते ठरवा आणि पुढची स्टोरी वाचा. कारण

कब कोई हरामी बेवकूफी पर उतर आता है, और कब कोई बेवकूफ हरामजदगी का तालाब बन जाता है पता ही नहीं चलता।

कोल इंडिया सुरु व्हायच्या आधी, कोळसा हा वासेपूरची समग्र मालमत्ता होती. आणि बरं का,

या वासेपूरची गोष्ट थोडी रगेल आहे. जर तुम्ही वरवर बघितल तर वासेपूर ही साध्या लोकांची वस्ती वाटते आणि पण एकदा का तुम्ही आत आलात तर त्यात एकापेक्षा एक हरामजादे लोक आहेत. वासेपूरचा चित्रपट जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला ती एक गोष्टच वाटते. पण खरं सांगायला गेलं तर धनबादने कोळशात आपलं नाव कोळशात खरं खरंच अजरामर केलंय. इथंच कोळशाच्या खाणीवरून गॅंग वॉर घडली. आणि त्याचा इतिहास आपण पडद्यावर बघितला. आता त्या लोकांनी  शेवटी काय सिद्ध केले ही वेगळी बाब आहे. पण इथले कोळसा वारियर्स आज ही स्वतःला फन्ने खां च समजतात.

गोष्ट सुरूच आहे….

ब्रिटिशांनी धनबादच्या आसपासच्या सर्व भातशेती काबीज करून कोळसा उत्खननाच काम सुरू केल तेव्हा रेल्वेगाड्या कोळशावर चालत असत आणि सर्व आधुनिक कारखाने आणि मशीन कोळशावर चालत असत.

स्वातंत्र्यानंतर धनबाद बंगालमधून बिहार राज्यात गेले आणि आता धनबाद झारखंडमध्ये आहे.

इथं ज्या कोळशाच्या खाणी होत्या त्या, फक्त एकट्या रामधीर सिंहच्या होत्या. पिक्चरची रील लाईफ सोडली तर खरा रामधीरसिंह जो कोळसा माफिया होता त्याच नाव होत सूरज देव सिंग. धनबाद मध्ये इतक्या कोळशाच्या खाणी होत्या की, वासेपूरात दाखवलंय त्याहीपेक्षा नादखुळा गॅंग वॉर या भागात सुरु झालं होत. यात साबीर आलम आणि फहीम खान अशी नाव सुद्धा होतीच. अगदी कोळशात स्वतःचे हात काळे करायला केंद्राच्या राजकारणातली मंडळी धनबाद मध्ये गोळा झाली होती.

पुढं जेव्हा राष्ट्रीयीकरण सुरु झालं तेव्हा,

जस पिक्चर मध्ये दाखवलय अगदी तसंच सूरज देव सिंगच्या खाणी भारत सरकारने आपल्या कब्जात घेतल्या.

आणि इथं सुरु झाली कोल इंडियाच्या जन्माची कहानी.

कोल इंडिया लिमिटेड नोव्हेंबर १९७५ मध्ये अस्तित्वात आली. स्थापनेच्या वर्षात ७९ मिलियन टन एवढं कमी कोळसा उत्पादन करणारी ही कोल इंडिया, कोळसा माफियांच्या खाणी काबीज करत करत आज भारतातल्या सर्वात मोठ्या ८३ खाणींची मालकीण आहे. आणि जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी तसेच सर्वात मोठी कॉर्पोरेट नियोक्ता म्हणून हीच कोल इंडिया ख्यातनाम आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर कोळशाच मायनींग हे भारतातल्या प्रायव्हेट सेक्टरपैकी एक होतं. पण सप्टेंबर १९५६ मध्ये भारत सरकारने स्वतःची कोळसा उत्पादन करणारी कंपनी काढली. तीच नाव नॅशनल कोल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं होत. ६० च्या दशकात कोळसा हा प्रमुख्याने रेल्वेसाठीच लागायचा. आणि बऱ्यापैकी कोळशांचा खाणींचा कारभार रेल्वेकडूनच बघितला जायचा. तो कारभार रेल्वेकडून काढून घेऊन तो या नॅशनल कोलला देण्यात आला होता.

याच कारण होत की भारतात वाढणाऱ्या औद्योगिकीकरणाच्या वाढत्या एनर्जीची गरज भागवण्यासाठी या नॅशनल कोल मदत करू शकेल. पण यातून म्हणावं तस काही साध्य झालंच नाही. उलट यातून कोळसा वॉर सुरु झालं. आणि मग धनबाद सारखी प्रकरण घडू लागली.

यातूनच भारत सरकारने ठरवलं की, २१४ कोळश्याच्या खाणी आणि १२ कोल ओव्हन्सच राष्ट्रीयीकरण करायचं. आणि त्याप्रमाणे १ जानेवारी १९७२ भारत सरकारने एक नवी सरकारी कंपनी स्थापन केली.  भारत कोकिंग कोल लिमिटेड (BCCL) असं या सरकारी कंपनीचं नाव होत. पुढं ३० जानेवारी १९७३ ला उरलेल्या ७११ प्रायव्हेट कोळसा खाणी यात समाविष्ट करण्यात आल्या.

१९७५ पर्यंत टप्प्या टप्प्यात सगळ्याच कोळसा खाणींचा कार्यक्रम करत १ नोव्हेंबर रोजी कोल इंडिया लिमिटेड हि कंपनी अस्तित्वात आली. आणि आज ही सरकारी कंपनी कोळशात तग धरून आहे.

कोळश्याच राजकारण भारताने खूप जवळून पाहिलंय. यातून बरेच कोल माफिया तयार झाले. त्यांच्या माफियागिरीवर बरेच चित्रपट निघाले. मग यात अमिताभ बच्चन पासून ते मनोज वाजपेयींनी अप्रतिम पात्र वठवली. आणि तोच इतिहास आपल्याला बघायला आवडतो. कारण वर सांगितल्याप्रमाणे आपण दोन कॅटेगरी मध्ये येतो एक हरामी और दुसरे बेवकूफ…

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.