नीरज चोप्राच्या आधी या खेळाडूने भालाफेकमध्ये दोन वेळा गोल्ड मेडल पटकावलंय…

टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने गोल्ड मेडल जिंकून जगभरात भारतीयांची मान उंचावली. देशभरातून शुभेच्छांचा पूर आला होता आणि नीरज चोप्रा भारताचा हिरो झाला. भालाफेक प्रकारात नीरज चोप्राने केलेला थ्रो अप्रतिम होता आणि आपल्या सुरवातीच्या काही थ्रोमध्येच त्याने आपली ताकत दाखवून दिली आणि अपेक्षेप्रमाणे तो मेडल जिंकलाही.

पण नीरज चोप्राच्याही अगोदर एका भारतीयाने एकदा नाही तर दोनदा गोल्ड मेडल जिंकलं होतं.

भालाफेक प्रकारात नीरज चोप्राच्या अगोदर दोनदा गोल्ड मेडल जिंकणारा खेळाडू आहे देवेंद्र झाझरिया.

आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं कर्तृत्व दाखवून देणारा देवेंद्र झाझरिया हा एका हाताने अपंग. राजस्थानच्या चुरु जिल्ह्यात देवेंद्र झाझरियाचा जन्म झाला. वयाच्या ८ व्या वर्षी विजेच्या झटक्याने शॉक बसून देवेंद्रचा एक हात निकामी झाला होता.

पण हा निकामी झालेला एक हात देवेंद्र झाझरीयाच्या आतील खेळाडूला गप्प बसवू शकला नाही. देवेंद्र खेळाकडे जास्त आकर्षित होता. एका हाताने त्याने निरंतर आपली प्रॅक्टिस सुरु ठेवली. त्यात देवेंद्रने असा खेळ निवडला कि ज्यात फक्त एका हाताचा वापर होतो. त्याने खेळ निवडला तो भालाफेक.

लोकांनी देवेंद्रला बरच समजावलं कि हा खेळ तुझ्यासारख्या गड्याने न खेळलेलाच बरा पण देवेंद्रने या सगळ्या लोकांच्या गप्पांकडे दुर्लक्ष केलं आणि खेळावर पूर्ण काँसंट्रेट केलं

भाला बनवून त्यावर देवेंद्रने प्रॅक्टिस सुरु केली. आपल्या प्रॅक्टिसमध्ये भरपूर मेहनत घेऊन देवेंद्र स्पर्धांमध्ये जाऊन धडकला. २००४ सालंच एथेन्स पॅरालम्पिक स्पर्धा. या स्पर्धेत देवेंद्र झाझरियाने इतिहास रचला. ६२.१५ मीटर भाला फेकत एथेन्स पॅरालम्पिक स्पर्धेत पहिलं वहिलं सुवर्णपदक देवेंद्र झाझरियाने पटकावलं.

यानंतर २०१६ साल उजाडलं रियो ऑलम्पिक स्पर्धेमध्ये ६३.९७ मीटर भाला फेकत वर्ल्ड रेकॉर्ड केला आणि या स्पर्धेतही देवेंद्रने गोल्ड मिळवलं. देवेंद्र झाझरिया हा असा एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने पॅरालम्पिक स्पर्धेत ऍथलेटिक्स [पुरुष भालाफेक] मध्ये २ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.

इतक्या भरघोस कामगिरीनंतर २०१२ साली देवेंद्र झाझरियाला पदमश्री पुरस्कराने सन्मानित करण्यात आले. मेजर ध्यानचंद अवॉर्ड आणि अर्जुन अवॉर्डसुद्धा देवेंद्र झाझरियाला मिळाला आहे. सध्या गो स्पोर्ट फाउंडेशनसोबत सध्या देवेंद्र दिव्यांग खेळाडूंना खेळामध्ये सपोर्ट करत आहे.

जास्त प्रसिद्धी न मिळाल्याने देवेंद्र झाझरिया हे नाव आपल्याला माहिती नसेल.

नीरज चोप्रा भालाफेक प्रकारात गोल्ड जिंकल्यावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडत राहिला. दुसरीकडे अनेक ठिकाणी देवेंद्र झाझरिया गोल्ड जिंकल्यानंतर सेलिब्रेशनचे व्हिडिओदेखील व्हायरल झाले होते. दोन गोल्ड मिळवलेला हा खेळाडू भारताची शान आहे, त्यावेळी क्रिकेटच्या बातम्यांमुळे देवेंद्र पूर्णपणे झाकोळून गेला होता. दोन गोल्ड मेडल आणि अनेक अवॉर्ड आज देवेंद्र झांझरियाकडे आहेत.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.