युवराज अजून संपलेला नाही. गांगुलीच्या त्या शब्दांनी सिद्ध केलंय.

साल होतं २००८. जगात ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटच आगमन झालं होत. चड्डी क्रिकेट म्हणून हिणवल्या गेलेल्या ट्वेंटी ट्वेंटीला तर सुरवातीला बीसीसीआय विरोध करत होतं. पण मागच्याच वर्षी भारतानं दक्षिण आफ्रिकेतला ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि भारताचा विरोध पातळ झाला.

याच दरम्यान क्रिकेट मार्केटिंगचे गुरु ललित मोदी आयपीएलची कन्सेप्ट घेऊन आले. तोपर्यंत झी वाल्यांनी आयसीएल सुरु केलेलं. बीसीसीआयला कळाल ही तर सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. वाजत गाजत जगातला सर्वात मोठा महासंग्राम आयपीएलची सुरवात झाली.

आठ फ्रँचाइजी मालक आणि त्यांच्या आठ टीम्स मैदानात एकमेकांविरुद्ध लढणार होते. ललित मोदीने युरोपियन फुटबॉल क्लबच्या धरतीवर आयपीएल सजवलं होत. खेळाडूंचा लिलाव होणार नाचगाणी चीयरलीडर्स ची धूम असणार वगैरे चर्चांनी कट्टे रंगले होते. पण सर्वात जास्त उत्सुकता मैदानावर कोणत महायुद्ध रंगणार याच्याबद्दल होत.

भारताच्या मुख्य खेळाडूंचा लिलावच झाला नाही. त्यांना आयकॉन खेळाडू म्हणून आपल्याच शहरातल्या टीम मध्ये ठेवण्यात आलं. यात सचिन, गांगुली,द्रविड हे जुने खेळाडू तर होतेच शिवाय सेहवाग आणि युवराज हे नव्या दमाचे खेळाडू सुद्धा होते. खरं तर सचिन वगैरे खेळाडूंनी ट्वेंटी ट्वेंटी मधून आधीच निवृत्ती घेतली होती. हा खेळ नव्या पिढीचा होता. 

नुकताच झालेल्या वर्ल्ड टीट्वेंटी स्पर्धेत युवीने सहा बॉलमध्ये सहा सिक्सर मारून अनेक रेकॉर्ड तोडफोड करून टाकलेले. त्याच्याच करिश्माई बॅटींग मुळे भारत हा पहिला वर्ल्डकप जिंकू शकला होता. सगळ्या जगाचं लक्ष किंग्ज इलेव्हन पंजाबकडून  युवी कसा खेळेल या कडे लागलं होत.

स्फोटक डावखुरी बॅटींग, अंगात ठासून भरलेलं अॅग्रेशन, नजाकतदार फिल्डिंग, वेळेला भल्या भल्या फलंदाजान अडचणीत आणणारी स्पिन बॉलिंग या सगळ्यामुळे युवी हा ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटसाठीचा टोटल पॅकेज होता. हा खेळच त्याच्यासाठी बनलाय असं वाटत होत.

जेव्हा स्पर्धा सुरु झाली तेव्हा मात्र युवराज आपल्या नेहमीच्या अॅग्रेशन मध्ये दिसला नाही. पंजाबला त्याने सेमीफायनल पर्यंत पोहचवल खरं तर कप्तानीचं दडपण घेतलं होतं की आणखी काय माहित नाही पण त्याची बॅट म्हणावी तशी तळपली नाही. त्याने पूर्ण स्पर्धेत त्याने ठीक ठीक फलंदाजी करून एकच अर्धशतक झळकवल. पुढच्या आयपीएल मध्ये मात्र तो आपल्या बॉलिंगमुळे चर्चेत आला. त्याने या सिरीज मध्ये दोन वेळा हटट्रिक घेतली.

२०११मध्ये भारताला त्याने वनडे वर्ल्ड कप जिंकून दिला. त्या वर्ल्डकपचा तो मन ऑफ द सिरीज होता. 

देशाकडून खेळताना वेगळ्याचं उर्जेने खेळणारा युवराज सिंग पण आयपीएल मधली बटीग अव्हरेजचं करत राहिला. त्याच्या पेक्षा कमी टॅलेंट असणारे सुरेश रैना , पांड्या बंधूसारखे खेळाडू आयपीएल गाजवत राहिले मगर युवी का बल्ला खुलके कभी बोला ही नही.

एका मागून एक आयपीएल येत गेले. युवीच्या जादुई बॅटींगचे स्वप्न बघत त्याचे फॅन्स म्हातारे झाले. त्यातच कन्सर मुळे त्याच्या करीयरचे बरेच वर्ष वाया गेले. तरीही जिद्दीने त्याने कमबॅक केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर हवा केली. २०१४च्या सिझन मध्ये त्या जादूचे ट्रेलर दिसले पण परत युवराजची गाडी आउट ऑफ फॉर्म निघून गेली.

सुरवातीला पंजाबकडून खेळणारा युवराज नंतर पुणे वॉरीयर्स, मग रॉयल चॅलेन्जर बेंगलोर, मग दिल्ली डेअर डेव्हिल, मग सनरायझर हैद्राबाद , मग परत पंजाब आणि या सिझन ला मुंबई अशा सगळ्या टीमची वारी करून आला. प्रत्येक वेळी प्रत्येक टीम युवराज सारखा सुपरस्टार प्लेअर आपल्या टीम मध्ये पाहिजे म्हणून त्याला तगड मानधन दिल. 

२०१५ साली तर दिल्लीने १६ कोटीला करार करून युवराजला आयपीएल इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू बनवले.

पण त्यावेळीही तो काही चमक दाखवू शकला नाही. तिथून पुढे त्याचा रेट खाली उतरत गेला, या वर्षी तर त्यच्या बेस रेटला म्हणजेच २ कोटीला कोणी खरेदी केलं नाही म्हणून बेस रेट १ कोटी करावा लागला. तेव्हड्याच किंमतीत मुंबई इंडियन्सने त्याला विकत घेतलं.

हा सिझन सुरु होण्याच्या आधीच त्याच्या रिटायरमेंटची चर्चा कॉमेंट्री बॉक्स बध्ये दबक्या आवाजात सुरु झाली होती. सदतीस वर्षाचा युवराज सध्या आंतरराष्ट्रीय टीम मधूनही बाहेर आहे. त्याच्या फिटनेसबद्दलही बऱ्याच जणांनी शंका व्यक्त केलीय. युवी वरचं दडपण यावेळी नेहमी पेक्षा किती तर पटीने जास्त असणार.

काल या सिझन मध्ये मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्लीविरुद्ध होता. यावेळी दिल्लीचा सल्लागार आहे सौरव गांगुली. युवराज सामन्यापूर्वी गांगुलीला जाऊन भेटला. गांगुलीला युवराजचा क्रिकेटमधला गॉडफादर मानलं जात. युवराजने त्याला कसं खेळू हा सल्ला मागितला. तेव्हा गांगुली म्हणाला,

“प्ले लाईक युवराज !!”

गेले काही दिवस प्रेशरमूळ, फिटनेसच्या समस्यामुळे युवराज आपल्या जुन्या रंगात दिसत नव्हता. दादाने दिलेल्या सल्ल्यामुळे युवराज वरच सगळचं प्रेशर उडून गेलं. त्याने कालच्या सामन्यात जोरदार हाफ सेंच्युरी झळकली. यात तीन षटकार आणि पाच बाऊड्रीज होत्या. खरा युवराज अजूनही आहे हे त्याने दाखवून दिल.

मॅचनंतरच्या मुलाखतीमध्ये त्याने स्पष्ट सांगितले,

“माझ्या निवृत्तीची काळजी बऱ्याच जणांना आहे.  माझ सचिनसारख्या खेळाडूंशी याबद्दल बोलण होत आणि त्यालाही याच फेज मधून जाव लागलं होतं. आजच्या खेळीमुळे मला आत्मविश्वास आला आहे. क्रिकेट माझ्यासाठी अजून संपलेलं नाही हे नक्कीच!! “

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.