दारू पिणे आरोग्यासाठी चांगले आहे. कसं ते वाचा.

तर भिडू आज मायबाप सरकारने दारूची दुकाने उघडली. कोरोनाच्या तडाख्यातही जीव मुठीला धरून राज्यभर लाखो मदिराप्रेमींनी या दुकानाबाहेर गर्दी केली.

ही गर्दी केली ती चूकच आहे पण दारू पिणे हे चूक आहे का? एक्स्पर्ट म्हणतात तसं काय नाही.

कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर खाल्ली तर ते विष असतं तसंच दारूच्या बाबतीत आहे. अति दारू पिणाऱ्यांना लिव्हरचा प्रॉब्लेम, कॅन्सर असे अनेक रोग होतात. खर्च वाढतो, घरी बायको कडून अपमान होतो असे अनेक प्रॉब्लेम असतात

पण जर ती प्रमाणात घेतली तर ते अमृत असते.

म्हणून आम्ही घेऊन आलोय दारू पिण्याचे आरोग्यासाठी असलेले 11 फायदे.

1. प्रमाणात दारू घेतली तर आयुष्य वाढतं

हे आम्ही नाही म्हणत तर स्पेनमधल्या काही विद्यापीठांनी हा रिसर्च केला आहे. तब्बल 12 वर्षे त्यांनी लोकांचे ओब्जर्व्हेशन केलं. त्यांना अभ्यासाअंती लक्षात आलं की,

“दररोज अगदी थोडीशी वाईन घेणाऱ्यांचं मृत्यूचं प्रमाण अजिबात दारू न पिणाऱ्यांपेक्षा कमी होतं.”

असाच रिसर्च 2017 मध्ये केला गेला. एकूण 3,33,000 जणांचा अभ्यास केला त्यांनाही हेच आढळून आलं. आणखी बऱ्याच मेडिकल जर्नल मध्ये छापून आलेला आहे.

2. दारू मुळे हृदय विकाराचा त्रास कमी होतो.

खूप दारूमुळे हृदयविकार होतो यात शंका नाही पण 1999 साली केलेल्या एका संशोधनात हे समोर आलं की आठवड्यातून एखादेवेळेस थोडीशी दारू घेतली तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

2006 मध्ये केलेल्या अभ्यासात हे दिसून आलं की मध्यमवयीन स्त्रीपुरुष जे अगदी थोड्या प्रमाणात दारू सेवन करतात त्यांच्यतील हृदयविकाराच प्रमाण दारू न घेणाऱ्यापेक्षाही कमी होत.

3. टाइप 2 वाल्या मधुमेहाची शक्यता कमी होते.

टाइप 2 वाला मधुमेह म्हणजे अगदी इन्शुलिनला ही प्रतिसाद न देणारा मधुमेह. आधुनिक जीवनशैली मुळे हा रोग होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

2005 साली डायबेटिक केअर नावाच्या एका आरोग्य मासिकात एक लेख छापून आला होता त्यात त्यांनी हा दावा केला होता. अति दारू पिणाऱ्या व बेछूट लाइफस्टाइल असणाऱ्या व्यक्तींमध्ये हा रोग होण्याची शक्यता मात्र दाट आहे.

4. अल्प प्रमाणात दारुसेवन करणे प्रजननक्षमता वाढण्यासाठी मदत करते.

इटलीमधल्या फर्टिलिटी सेंटरने 2018 साली 323 जणांचा सॅम्पल घेऊन संशोधन केले, त्याचा रिपोर्ट एका आरोग्य जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. त्यांचा दावा आहे की,

आठवड्यात 4 ते 7 वेळा ड्रिंक घेणाऱ्या पुरुषांची प्रजनन क्षमता आठवड्यात 1 ते 3 वेळा किंवा 8 पेक्षा जास्त वेळा ड्रिंक घेणाऱ्या पुरुषांपेक्षा जास्त आढळली.

5. दारू पिणाऱ्यांमध्ये सर्दीचं प्रमाण खूप कमी असते.

हे तर सर्वांना ठाऊक आहे की खूप दारू पिल्यावर डिहायड्रेशन होऊन सर्दीचे प्रमाण वाढते. पण वर सांगितल्याप्रमाणे अगदी कमी प्रमाणात दारू सेवन केली तर सर्दी होण्याची शक्यता कमी होते.

हा अभ्यास 1993 साली कार्नेजी मेलन विद्यापीठाने समोर आणला. असाच रिसर्च 2002 साली न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आला होता. त्यांच्या मते विशेषतः रेड वाईन पिणाऱ्यांना त्यात अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे सर्दी होण्याची शक्यता 60%ने कमी असते.

6. मेंदूविकार होण्याचं प्रमाण रेग्युलर ड्रिंकर्समध्ये कमी आहे.

2011 साली मेंदूविकार मानसशास्त्र यासंदर्भातील एका मेडिकल जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला. 1977पासून हा अभ्यास सुरू होता, त्यासाठी 3,65,000 जणांचे सॅम्पल टेस्ट करण्यात आले होते.

अगदी थोड्या प्रमाणात घेतलेले अल्कोहोल मेंदूच्या पेशीनां अधिक फिट बनवते. त्यामुळे अल्झायमरसारखे विकार होण्याची शक्यता कमी असते.

पण हा संशोधन करणारे एडवर्ड नेफसी यांनी सांगितलं की

कमी प्रमाणात दारू पिणे मेंदू साठी चांगले आहे याचा अर्थ आम्ही दारू न पिणाऱ्यांना दारू प्या म्हणून सांगतोय असा नाही.

7. दारू पिणाऱ्यांना पित्ताशयात खडे होण्याचा त्रास कमी असतो.

2009 साली इंग्लंडमध्ये एका विद्यापीठामध्ये हा अभ्यास करण्यात आला होता. त्यांनी सिद्ध केलं की दररोज 2 पेक्षा कमी ड्रिंक घेणाऱ्यामध्ये पित्ताशयात खड्याचा त्रास होण्याचं प्रमाण एक तृतीयांश पेक्षा कमी आहे.

हाच अभ्यास 2017 साली चीनमधल्या संशोधकांनी केला व त्यांनाही हेच आढळून आलं. सिगल नावाच्या संशोधकांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की,

consuming moderate amounts of alcohol does help in the production of bile, which keeps gallstones from fully forming.”

8. दारूचे सेवन करणाऱ्या महिलांमध्ये हाडे ठिसूळ असण्याचे प्रमाण कमी आढळले.

वय वाढेल तसे हाडे ठिसूळ होत जातात. स्त्रियांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. रजोनिवृत्तीनंतर होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे त्यांना हा त्रास होतो.

पण 2012 साली The North American Menopause Society या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिसर्च पेपरमध्ये दावा करण्यात आला की,

” अत्यंत सुप्रमाणात दारूचे सेवन करणाऱ्या महिलांना रजोनिवृत्तीनंतर हाडांची झीज होण्याचे प्रमाण कमी असल्याचे समोर आले व osteoporosis सारखे रोग होण्याची शक्यता देखील कमी होती.”

9. र्‍हुमॅटॉईड संधिवात होण्याचे प्रमाण दारू पिणाऱ्यांमध्ये अत्यल्प आहे

हा रोग हाता पायांच्या सांध्यांवर परिणाम करतो. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधून किंवा श्वसन संस्थेतून ह्याचा प्रसार होतो त्यामुळे याला सिस्टेमिक आजार असे म्हटले जाते.

2010 साली एका रिसर्च पेपरमध्ये दावा केला आहे की दारू न पिणाऱ्यांपेक्षा दारू पिणाऱ्यांना हा रोग होण्याची शक्यता 4 पटीने कमी आहे.

अल्कोहलमध्ये दाहकता कमी करण्याची क्षमता असल्यामुळे सांध्यांमध्ये सुजण्याचे व दुखण्याचे प्रमाण कमी असते. त्यांना संधिवात होण्याची शक्यता कमी होते.

10. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी दारूची प्रचंड मदत होते.

अनेकजणांना हा अनुभव आला
असेल. योग्य प्रमाणात दारू घेतल्यामुळे मानसिक थकवा दूर होतो. चिडचिड होत नाही, त्याक्षणी मन प्रफुल्लित होते. टेन्शन डिप्रेशन याच प्रमाण देखील खूप अंशी कमी होते असा संशोधकांचा दावा आहे.

मात्र खूप जास्त प्रमाणात दारू पिणाऱ्यांमध्ये क्लिनिकल डिप्रेशनच प्रमाण अधिक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. या रोगाला भारतात अवेअरनेस नाही त्यामुळे या रोगांशी संदर्भात रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असंही या संशोधकांनी सांगितले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.