उन्हाळा आलाय भरपूर ताक प्या का ते वाचा.

उन्हाळा सुरु झालाय. रोज डोक्यावर उन तापायला लागलय, अशा वेळी डोकं आणि शरीर दोन्ही थंड ठेवण गरजेचे आहे भिडू. उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातून येणाऱ्या घामाने खूप लवकर अंगातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अशक्तपणा येण्याची शक्यता आहे. या साठीच उन्हाळ्यात विविध शीत पेय घेतली जातात. अशा सगळ्या कॉल्ड ड्रिंक्स मध्ये सगळ्यात जास्त परवडणार आणि सहज मिळणर ड्रिंक कुठल असेल तर ताक. ताक अनेकांना आवडत तर काहीना त्याचा तिरस्कार देखील असतो. पण आवडू किंवा नाही ताक आपल्यासाठी गरजेचे आहे. अनेक औषधी गुण ताकत आहेत बर का भिडू त्यामुळे हे खाली दिलेले सगळे फायदे वाचा एकदा आणि आजच ताक प्यायला सुरवात करा.

 • नियमीत ताकाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
 • उन्हाळ्यात जीरपूडसोबत ताकाचे सेवन केल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहते.
 • वजन कमी करण्यासाठी ताकात काळं मीठ मिसळून पिण्याने फायदा होतो.
 • सकाळ-संध्याकाळ ताक पिण्याने स्मरण शक्ती वाढते.
 • वारंवार उचकी येत असल्यास ताकात एक चमचा सुंठ मिसळून सेवन केल्याने फायदा होतो.
 • उच्च रक्तदाब असल्यास गिलोय (अमृत वल्ली) चूर्ण ताकासोबत सेवन केल्याने फायदा होतो मळमळणे, उलटी येणे अशी लक्षणे असल्यास ताकात जायफळ उगाळून पिण्याने फायदा होतो.
 • गुलाबाचे रूट दळून ताकात मिसळून तयार केलेला लेप चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स नाहीसे होतात.
 • सौंदर्य समस्यांसाठी ताक हे फायद्याचे आहे. ताकात आटा मिसळून तयार केलेला लेप त्वचेवर लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
 • शरीराचा एखादा भाग जळल्यावर लगेच ताक लावल्याने फायदा होतो.
  जर आपण अती ताण असलेल्या स्थितीत असाल तर नियमित ताकाचे सेवन करणे आपल्यासाठी योग्य राहील. याने शरीरासह डोक्यातील उष्णताही कमी होते.
 • विषारी किड्याने चावल्यास ताकात तंबाखू मिसळून लावल्याने आराम मिळतो.
 • खाज सुटत असल्यास अमलतासाचे पान पिसून ताकात मिसळून त्याचा लेप शरीरावर लावावा. काही वेळाने स्नान करावे. खाजेपासून मुक्ती मिळेल.
 • विष सेवन केलेल्याला वारंवार फिकट ताक पाजल्याने लाभ होतो.
 • टाचा फाटल्यास ताक काढल्यानंतर निघणारं लोणी लावायला हवं.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.