एका बंगाली महिलेच्या डोक्यालिटीमुळं ब्रिटिश व्यापारी हँग पडले होते…

इंग्रजांनी जवळपास २०० वर्ष भारतावर राज्य केलं. आता या काळात देशाच्या जनतेसोबत काय- काय घडलं हे काय नव्यानं सांगायला नको. पण आपल्या देशातही अशी काही डोकेबाज माणसं होती, ज्यांनी या ब्रिटिश अधिकाऱ्यांना चांगलंच येड्यात काढलं होतं.

त्यातलंच एक नाव म्हणजे राणी रासमनी. ज्यांनी आपल्या हुशारीनं इंग्रजांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं.  

दरम्यान याआधी जाणून घेऊ कि, या राणी रासमनी नक्की होत्या तरी कोण?

तर बंगालात राहणाऱ्या राणी रासमनी यांचा जन्म केवट समुदायातला, त्यांचे आई- वडील मासे पकडून घर चालवायचे. जातीच्या उतरंडीमुळे त्यांना कधीच सन्मान मिळाला नाही. या दरम्यान त्या ७ वर्षांच्या असताना त्यांच्या आई- वडिलांचं निधन झालं.

यानंतर वयाच्या ११ व्या वर्षी त्यांचा विवाह बाबू राजचंद्र दास या त्यांच्यापेक्षा वयानं कितीतरी मोठ्या असणाऱ्या जमीनदाराशी झाला. ज्यामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. राजचंद्र बाबूच्या त्या तिसऱ्या पत्नी होत्या. व्यवहारात हुशार असल्यानं राजचंद्र बाबूनं त्यांना व्यापारात घेतल.

तर हा किस्सा आहे १८४० चा.

ब्रिटिश सरकार आपल्या व्यापारी धोरणानं देशातील जनतेला बंधनात अडकवटचं होतं. ईस्ट इंडिया कंपनीनं जवळपास सगळ्या राज्यांचा कंट्रोल आपल्या हातात ठेवला होता. ज्यात बंगालसुद्धा होत.

त्यावेळी इंग्रजांनी बंगालवर एक नियम लादला, ज्यानुसार हुगली नदीत मासे पकडण्यावर टॅक्स लावण्यात आला. अर्थातच याचा परिणाम मच्छिमारांवर झाला. त्यांच्यासमोर पोटा- पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. इंग्रजांच्या म्हणण्यानुसार मासे पकडणाऱ्या जाळीमुळं त्यांच्या व्यापारी जहाजांना येण्या-जाण्यात अडथळा येतो. 

आता यामुळं मच्छीमारांकडं उपाशी मरण्याशिवाय पर्याय नव्हता. या पिडीतांनी मदतीसाठी अनेक मोठमोठ्या लोकांकडं धावं घेतली. पण ब्रिटिशांशी आपले संबंध बिघडतील असं एकच उत्तर त्यांना मिळालं.

आता शेवटचा पर्याय म्ह्णून मच्छीमार आपलं गाऱ्हाणं घेऊन राणी रासमणि यांच्याकडं आले. राणी रासमनी ही बंगालची सर्व-साधारण विधवा महिला. ज्यांना बंगाली भाषेत ‘राशमोनी’ म्हंटल जात. त्यावेळी रानी रासमनी यांची हवेली कोलकात्याच्या मधोमध बाजार भागात असायची. 

या मच्छीमाऱ्यांनी आपण सगळं म्हणणं राणीपुढं मांडलं. आता व्यापारात एकदम चलाख असणाऱ्या राणी रासमनीनं एक आयडिया शोधून काढली. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीकडून एक जमीन भाडेतत्वावर घेतली. ज्यासाठी १० हजार रुपये मोजले. बदल्यात त्यांना हुगली नदीच्या किनाऱ्यावरचा १० किलोमीटरचा भाग मिळाला.

भाड्यानं घेतलेला हा किनारा हुगलीमधला गजबाजीचा भाग होता. या रानी रासमनीनं आपल्या भागाच्या किनाऱ्यावर लोखंडाच्या मजबूत आणि जाड अश्या साखळ्या लावल्या. या जागेला त्यांनी अश्या प्रकारे घेरलं कि, ती एक सेपरेट जागा बनली. यानंतर राणीनं मच्छीमारांना तिथं मासे पकडण्याची परवानगी दिली. 

आता राणीच्या या प्लॅनमुळं इंग्रज अडचणीत सापडले.

मोठं- मोठी जहाज घेऊन तिकडून इकडे येणाऱ्या इंग्रजी व्यापारांना मध्येच खोळंबून राहावं लागत होत. या रोज-रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या कंपनीनं राणीला उत्तर मांगितलं, तर त्यांनी कंपनीसोबत झालेल्या कराराची कागदपत्रं समोर ठेवली. सोबतच असंही म्हंटल कि,  मच्छीमारांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्यामूळ त्यांच्या कमाईवरही परिणाम होतोय आणि ते हे काम स्वतःसाठी करतायेत.

आता राणीच्या या भूमिकेमुळं शेवटी ब्रिटिशांचं झुकावं लागलं. त्यांना समजलं होत कि, राणीनं हे लीजच नाटक मच्छीमारांच्या मदतीसाठी केलं होत. आता इंग्रजांकडं दुसरा कुठलाच पर्याय नसल्यानं  त्यांनी हुंगलीत मासे पकडण्यावर लावलेला टॅक्स संपूर्णपणे हटवला.

राणी रासमनीचा आणखी  एक किस्सा चर्चित आहे. तो म्हणजे दक्षिणेश्वर काली मंदिरचा. आपल्या पतीच्या मृत्यूनंतर १८४७ मध्ये त्यांनी मंदिरासाठी २० एकर जमीन खरेदी केली १८५५ मध्ये या मंदिराचं काम पूर्ण होउन ते लोकांसाठी उघडण्यात आलं. पण कोणताच पंडित तिथं पुजारी बनण्यास तयार नव्हता. कारण काय तर एका दलित महिलेनं ते मंदिर बांधलं होत.

एका जमीनदारानं राणी रासमनीच्या विरोधात १६ वेळा दावा दाखल केला होता. राणी रासमनीनं  याविरुद्ध लढाई लढली, पण त्याचा काहीएक फायदा झालं नाही. शेवटी हार मानत यांनी हे मंदिर रामकुमार चट्टोपाध्याय यांच्या नावे केलं. ज्याचे पुजारी रामकृष्ण परमहंस होते.

 हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.