अवघ्या ३ मिनिटाच्या झूम कॉलनं ९०० कर्मचारी घरी बसवलेत

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांच्या आधी सीईओचा कॉल म्हटल्यावर कर्मचारी चांगलेच खुश होते. सीईओ सांताक्लॉज बनून आपल्याला बोनस जाहीर करेल या आशेवर वर्क फ्रॉम होम करणारे लॅपटॉप पुढं बसले होते. कारण अशे प्लॅन एचआरच्या ‘सुपीक’ डोक्यात येतच असतात याचा कर्मचाऱ्यांना अनुभव होताच. मात्र घडलं अगदी वेगळंच.

सीईओनं अवघ्या ३ मिनिटाच्या झूम कॉलवर ९०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढत असल्याचं  जाहीर केलयं.

कडाक्याच्या थंडीतही घाम फोडणारी ही घटना घडलीय अमेरिकेत. आता सीईओ म्हटल्यावर कुणी भारतीयच असेल असं तुम्ही विचार करत असला तर तुमचं अगदी बरॊबरयं.

विशाल गर्ग जो ‘बेटर डॉट कॉम’ या कंपनीचा सीईओ आहे त्यानं ही ‘करामत’ करून दाखवली.

”मला माहितेय की, अशा प्रकारची बातमी ऐकण्याची कोणाचीच इच्छा नाही.  पण मात्र त्याला माझा इलाज नाही. तुम्ही एक अनलकी ग्रुपचा भाग आहात.  या कॉलचा भाग असणाऱ्या सर्वांना आत्ताच्या आत्ता कंपनीमधून काढून टाकण्यात येणार आहे”. असं सिरीयल किलरपेक्षा थंड डोकं ठेवून विशाल भाऊंनी जाहीर केलयं. भाऊ एवढयावरच थांबले नाहीयेत.

तुम्ही कुचकामी आणि आळशी आहेत म्हणून मी तुम्हाला काढून टाकत आहे असं म्हणत त्याने कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलय. 

“आठ तासाचा पगार घेऊन तुम्ही दोन तासाचं पण काम करत नाही. असं करून तुम्ही कंपनी आणि कंपनीच्या ग्राहकांना पण लुटत आहात “असं म्हणत त्याने वर्क फ्रॉम होम करणाऱ्या या ९०० कर्मचाऱ्यांना कायमचंच घरी बसवलंय.

हा निर्णय अवघड होता पण आपल्याला तो घ्यावा लागलाय असं म्हणून भाऊंनी स्वतःच्या हाताने स्वतःचीच पाठ थोपटलीय. एकाच वेळी अनेकांना घरी बसविण्याची भाऊंची हि  पहिली वेळ नाही.

 माझ्या कारकिर्दीत अशा प्रकारे दुसऱ्यांदा घडत आहे. मला हे करायचं  नव्हतं. शेवटच्या वेळी जेव्हा असे घडले तेव्हा मी रडलो होतो. मात्र यावेळी खूप विचार करून हे पाऊल उचलत आहे. त्यामुळे याचा त्रास होणार नाही. हे सगळं मी कुशलतेने हॅन्डल करेल अशी आशा सुद्धा गर्ग  व्यक्त केली आहे. 

९०० कर्मचाऱ्यांचा  शिव्या शाप खाणाऱ्या  भाऊंना ह्यावेळी कमी त्रास व्हावा हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. 

ह्या आधीही विशाल भाऊंनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका मेलमुळं चांगल्याचं शिव्या खाल्ल्यात. त्या मेल मध्ये त्याने म्हटलंय-

“You are TOO DAMN SLOW. You are a bunch of DUMB DOLPHINS… SO STOP IT. STOP IT. STOP IT RIGHT NOW. YOU ARE EMBARRASSING ME,” 

समजलं नाय काय लिहलंय? जास्त काही नाही! आळशी डुकरासारखं हळू काम करणाऱ्या तुमची मला लाज वाटते असं त्याने त्याच्या बोलीभाषेत म्हटलंय.

पण हि बेटर.कॉम कंपनी करते तरी काय?

बेटर .कॉम ही कंपनी बांधकाम क्षेत्राशी निगडित आहे. लोकांना घरं घेण्यासाठी ही कंपनी मदत करते. एक यशस्वी स्टार्टअप असणारी कंपनी लवकरच शेअर बाजारात एन्ट्री करणार आहे.

त्यासाठी बॅलन्सशीट वरील कर्मचाऱ्यांच्या पगारचा भार कमी करण्यासाठीही कंपनीने ९०० कर्मचाऱ्यांना कमी केलंय असही म्हटलं जातंय. 

तसेच तंत्रज्ञानातील प्रगती आणि ऑटोमेशन यामुळे अमेरिकीत कर्मचारी कपातीचा जो ट्रेंड चालूय त्याचाचं हा एक भाग असल्याचंही सांगितलं जातंय.

कारण काहीही असो पण लोकांना घर घ्यायला मदत करणाऱ्या या कंपंनीनं ९०० लोकांचे संसार उघडयावर आणलेत हे मात्र खरंय.

हे ही वाच भिडू:

हे ही बघ भिडू:

English Summary: Better.com CEO Vishal Garg fired 900 of his employees in a brutal Zoom call on Wednesday. The Indian-American CEO said market efficiency, performance and productivity were the reasons behind the mass lay-off

Web title: Better.com CEO Vishal Garg Fires 900 People Over Zoom Call

Leave A Reply

Your email address will not be published.