मंत्रिपदासाठी राज्यातून ही सरप्राईजिंग नावे चर्चेत येण्यामागे भाजपचा खास प्लॅन आहे.

मोदी सरकारच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज होणार आहे.

हे सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आले, परंतु नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. काही-काही एकाच मंत्र्याकडे अनेक खात्यांचा बोज दिला गेला होता. आता या नव्या मंत्रिमंडळात जवळपास २० नव्या चेहऱ्यांचा समावेश होणार आहे.

यात नारायण राणे यांना सर्वप्रथम बोलावणे होते, कारण त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास राज्यात शिवसेनेविरोधात भाजप अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. अजून एक कारण म्हणजे आगामी मुंबई महापालिका निवडणूक येतेय. मुंबईत स्ट्रॉंग असणाऱ्या शिवसेनेला नारायण राणे हे जेरीस आणण्याचं काम करत आहेत त्यामुळे हि त्यांना हि संधी मिळाली आहे हे स्पष्टच आहे.

पण राणेंच्या व्यतिरिक्त आणखी दोन नावं सध्या चर्चेत आहेत,

ती म्हणजे, कपील पाटील आणि भागवत कराड. कारण या दोन्हीही नेत्यांना मंत्रिमंडळासाठी दिल्लीला बोलावणे आले आहे आणि ते दिल्लीत दाखल ही झाले आहेत. 

महाराष्ट्रातून इतरही नावे चर्चेत असतांना फक्त या दोन नेत्यांची वर्णी लागली. या आधी राजकीय वर्तुळात या नेत्यांची फारशी चर्चा नसते परंतु मंत्रीमंडळात हीच दोन नावे सरप्राईजिंग का ? जाणून घेऊया.

येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फायदेशीर ठरू शकतील अशा नेत्यांचा मंत्रिपद देण्याचा विचार केला जात आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रामधील अजूनही मजबूत असणारे आघाडी सरकार मुळे राज्याकडे खास लक्ष दिले जाणार आहे एकंदरीत दिसून येते.

खासदार कपील पाटील 

कपिल पाटील यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळणार हि फक्त शक्यताच नाही तर फिक्स आहे. कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबरोबरच त्यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळतंय.

थोडक्यात सांगायचं झालं तर कपिल पाटील यांच्यामुळे आगरी समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळू शकेल. 

पण यामागचं आणखी एक मुख्य कारण म्हणजे, नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्यावरून वाद निर्माण झाला. परंतु शेकाप चे दी.बा पाटील याचंच नाव द्यावं म्हणून आगरी समाज आक्रमक झालाय त्यांना बळ मिळेल आणि सेनेला टक्कर देता येईल, मतांचे धृवीकरण करणे हा हि विचार या मागे आहे.

पाटील हे भिवंडी मधून सलग दोन वेळेस भाजपकडून खासदार म्हणून निवडून आले आहेत,   त्यात यांच्याव्यतिरिक्त ठाणे शहरात भाजपकडे इतर कोणताही आश्वासक चेहरा नाही त्यामुळे सेनेच्या वाढत्या प्राबल्याला रोखण्यात पाटीलच महत्वाचे आहेत हे भाजपने जाणले.

मुंबईत राणे तर ठाण्यात पाटील असं समीकरण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी स्वीकारलं आहे.

या दोघांचा समावेश जर मंत्रिमंडळात झाला तर त्या भागात सेनेचं बळ कमी होईल आणि त्याचा थेट फायदा केंद्र घेऊ शकेल. पाटील यांच्या निमित्ताने शिवसेना विरुद्ध आगरी समाज असा संघर्ष आणखी सक्रीय करण्याच्या तयारीत आता भाजपात आहे. 

कपील पाटील यांनी त्यांच्या पॉलीटिकल करियर ची सुरुवात भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर गावचे सरपंच म्हणून सुरुवात केली. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी कामगिरी बजावली.

यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे सतत २०१०-२०११ आणि २०११-२०१२ या दोन वर्षात सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कार कपिल पाटील यांच्या कार्यकाळात प्राप्त झाला आहे.

पाटील हे राष्ट्रवादीमध्ये असतांना त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही भूषवलं. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ आणि २०१९ मधील भिवंडी लोकसभा मतदार संघातून ते विजयी झाले.

दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाची चांगली ओळख असल्याचा फायदा हा भाजपला झाला आणि खूप कमी वेळेतच त्यांनी पक्षात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

राज्यसभा खासदार भागवत कराड :

भागवत कराड हे मराठवाड्यातील वंजारी समाजाचे नेते आहेत. मागच्याच वर्षांत त्यांना खासदार संजय काकडे आणि एकनाथ खडसे यांना डावलून भाजपकडून निष्ठावंत डाॅ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी जाहिर झाली होती.

आधीच महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा वाद पेटला असल्यामुळे राणेंना मंत्रिपद देऊन त्याच  पारड्यामध्ये भागवत यांना वंजारीचे नेते म्हणून मंत्रिपद दिलं जातंय अशा चर्चा आहेत. अशाप्रकारे भाजप महाराष्ट्रात जातींची समीकरणं बांधत आहे.

जेंव्हा पंकजा मुंडे यांचा विधानसभेला पराभव झाला त्यानंतर भागवत कराड यांनाच वंजारी समाजाचे नेते म्हणून समोर करण्यात आले होते.

कराड यांनी औरंगाबादचे उपमहापौर आणि महापौरपद भुषवले आहे. तसेच, भागवत कराड हे भाजपा नेत्या व माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून देखील ओळखले जातात.

कराड यांना बोलावणे येऊ शकते तर मग प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद का नाही दिलं जात यावरही प्रश्न उभा राहिला आहे. 

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.