ताडमाडी गाळणारा भंडारी समाज स्वराज्याच्या आरमाराचा कणा कसा बनला?

कोकण किनारपट्टीपासून ते गोव्या पर्यंत अरबी किनाऱ्यावर भंडारी समाज आढळतो. पोर्तुगीज इंग्रज येण्याच्याही आधी पासून मुंबई ही आगरी कोळी आणि भंडारी समाजाची होती.

मध्यंतरी इंग्रजांच्या काळात या भंडारी समाजावर फक्त ताडी माडी बनवणारा समाज म्हणून शिक्का मारण्यात आला पण भंडारी समाजाचा इतिहास पराक्रमाचा आहे.

असं सांगितलं जातं की,

खजिन्याचे ( भंडाऱ्याचे) रक्षण करण्याचं परंपरागत काम त्यांच्या कडे होते म्हणून भंडारी अस या समाजाचं नाव पडलं. राजाच्या विरुद्ध जे लोक बंड करत, त्यांच्याशी लढून त्यांना हरवणारे आणि बंड मोडून पडणारे ते बंडहारी. ज्याचा अपभ्रंश पुढे भंडारी असा झाला अशीही भंडारी समाजाची उत्पत्ती सांगितली जाते.

पण एक मात्र खरं पूर्वीपासून हा समाज लढाऊ बाण्याचा राहिला आहे.

भंडारी जात कशी निर्माण झाली याविषयी पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी एक पुराणातील कथा सांगितली आहे. त्या कथेनुसार,

पूर्वी तिलकासुर नावाचा एक दैत्य अतिशय माजला होता. त्यामुळे भगवान शंकरांनी क्रोधीत होऊन त्याला घाण्यात टाकले आणि नंदीला तो घाणा फिरविण्याची आज्ञा दिली. घाणा फिरवताना नंदीला होणारे कष्ट पाहून शंकरांना घाम आला. शंकरांच्या कपाळावर त्यावेळी जो घर्मबिंदू होता, त्यापासून एक पुरुष निर्माण झाला. ज्याला भंडाऱ्यांचा मूळ पुरुष मानले जाते.

या मूळ पुरुषाला शंकरांनी झाडावरील नारळ तोडून आणायची आज्ञा केली होती. ते पाणी पिऊन भगवान शंकर तृप्त झाले आणि त्या पुरुषाला भांडारप्रमुख म्हणून नेमले. असेही म्हटले जाते की या आख्यायिकेमध्ये नारळाच्या पाण्याने शंकर भगवान तृप्त झाले,

त्यामुळे जिथे ताड-माड तिथे भंडाऱ्यांची वस्ती असते. यावरूनच ‘जिथे माड तिथे भंडारी’ असे म्हटले जाते.

पण फक्त ताडी माडीशी जोडणे भंडारी समाजाला जोडणे म्हणजे अन्यायकारक ठरेल.

राजपुतान्यातील क्षत्रिय गणले जाऊ लागले. ते उत्तम रक्षक , राजनिष्ठ , लढवय्ये व स्वामिनिष्ठ असल्यामुळे त्यांना भांडाराचे रक्षक व सैनिक म्हणून सैन्यदलात घेण्यात आले. ज्या ज्या वेळी निरनिराळे रजपूत राजे बाहेरच्या राज्यात गेले त्या त्या वेळी भंडा-याचे आगमन इतर राज्यांत झाले.

दहाव्या व अकराव्या शतकापासून भंडा-याचे वास्तव्य राजपूताना , गुजरात , उत्तरप्रदेश , मध्यप्रदेश  इत्यादी राज्यांत होते.

कालांतराने हा समाज दक्षिणेकडे सरकला आणि मुंबई पासून कारवार (कर्नाटक) पर्यंत स्थिरावला.

क्षत्रिय भंडा-यांनी मुंबई बेटावर नुसती वस्ती केली नाही तर मुंबई , माहिम व लगतच्या बेटावर तसेच उत्तर कोकणावर त्या काळात राज्य केल्याचे पुरावेही इतिहासात आढळून येतात.

इतकेच नव्हे तर पोर्तुगीज वसाहतीच्या काळात, त्याचप्रमाणे इंग्रज सरकारच्या अमदानीत मुंबई बेटाची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था भंडारी समाजाकडे होती. “छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या” वेळी बहुसंख्येने भंडारी समाजाने आरमारात महत्त्वाची कामगिरी केली आहे. तत्कालीन आरमाराचे प्रमुख हे वसईचे ‘मायाजी भाटकर ‘ ऊर्फ ‘मायनाक भंडारी’ होते.

हाराजांचे समुद्रसेनापती म्हणून त्यांना सुवर्णदुर्ग जिंकण्याची जबाबदारी दिली होती. मोहिमेमध्ये भंडाऱ्यांचा पुतण्या धारातीर्थी पडला. मात्र मायनाक भंडाऱ्यांनी सुवर्णदुर्ग अखेर स्वराज्यात दाखल केला.

मायनाक भंडारी यांची समाधी रत्नागिरी जिल्ह्यातील भाटे येथे आहे.

स्वराज्याच्या आरमाराचा कणा भंडारी समाज होता. एवढंच काय तर जेव्हा मुंबईवर इंग्रजांचं राज्य सुरू झालं तेव्हा त्यांनी

मुंबईच्या संरक्षणासाठी ‘बॉम्बे मरीन’ नावाचे आरमार उभारले आणि बंदोबस्तासाठी भंडाऱ्यांच्या मदतीने शिपायांची फलटण उभारली. ती मुंबई पोलिस दलाची सुरुवात होय. मुंबई शहराची उभारणी सुरू झाली तेव्हापासून भंडारी मुंबईत पोलिस दलांत आहेत.

भंडारी पोलिसांची फलटण कित्येक वर्षे ‘भंडारी मिलिशिया’ या नावाने ओळखली जाई.ज्यामध्ये सर्व जवान भंडारी हाते, सन १६०० ते १८०० हा काळ भंडारी मिलिशियांचा होता. त्या काळात मुंबईत ब्रिटिशांची सत्ता असली तरी मुंबईच्या संरक्षणची मोठी जबाबदारी या भंडारी मिलिशियांच्या खांद्यावर होती.

या भंडारी कुटुंबाच्या ताब्यात मुंबईतील महत्वाच्या जागा होत्या. काळबादेवी परिसरात भंडारी स्ट्रीट आहे, तेथे आजही भंडारी समाजाचे मोठय़ा प्रमाणावर वास्तव्य आहे.

दर्यावर्दी भंडारी समाज दक्षिणेकडे सागरी टोकापर्यंत पोहचला. सागराशी संबंधित कामांमध्ये भंडारी समाजातील नागरीक निष्णात होते. त्यामुळे विविध साम्राज्यांनी जहाज बांधणीपासून ते बंदरांच्या रक्षणापर्यंत अनेक जबाबदाऱ्या सोपविलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. मचवे व तारवे चालविणे, गलबते हाकणे यामध्ये भंडारी समाज कुशल होता.

पुढे इंग्रज कंपनी सरकारचे राज्य जाऊन ब्रिटिश राणीचे सरकार आले. तिने संपूर्ण देश ताब्यात घेतला. भंडारी समाज हा ज्या राजांच्या पदरी सैनिक म्हणून काम करत होता, ती राज्ये नष्ट झाली. त्यानंतर भंडारी समाजाचे लक्ष शेती करणे व ताडी- माडी काढणे या क्षेत्राकडे वळले.

नाडर भंडारी या तामिळनाडूतील व्यापारी आणि संपन्न असलेल्या नाडर समाजावरही कधीकाळी ताडी माडी गाळणारा म्हणून शिक्का होता.

पुढे या कष्टकरी समाजाने शेतीतही प्रचंड प्रगती केली. कोकणात अनेक ठिकाणी पाणी आणण्याचे, उघड्या बोडक्या डोंगरावर वणीकरणाचे काम भंडारी समाजाने केले आहे.त्यांनी त्यांच्या बागेत आंबा, काजू, चिकू या फलवृक्षाबरोबरच नारळी पोफळीच्या सुंदरबागा समुद्र किनाऱ्यालगत फुलवलेल्या गोव्यात तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यांत पाहावयास मिळतात.

इतकेच नाही तर या भंडारी समाजात कलांचा वारसा आहे. सिनेस्टार नाना पाटेकर पासून ते रमेश भाटकर महेश मांजरेकर यांच्या पर्यंत आणि  विजय मांजरेकर यांच्यापासून प्रवीण आमरे, रमाकांत आचरेकर यांच्या पर्यंत अनेक कलाकार, खेळाडू या भंडारी समाजातील आहेत.

संदर्भ- प्रा.अशोक रामचंद्र ठाकूर यांचा ब्लॉग

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.