भंवरीदेवी हत्याकांडामुळं राजस्थानच्या राजकारणात वादळ निर्माण झालं होतं…

भंवरी देवी हत्याकांड राजस्थानातलं सर्वात चर्चित प्रकरण. या हत्यांकांडाची स्टोरी कोणत्या थ्रिलर चित्रपटापेक्षा कमी नाही. राजस्थानच्या आरोग्य विभागातील एक नर्स जी सुरुवातीला व्हाईट कॉलर असणाऱ्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचे साधन बनली, पण नंतर तिने ‘हक्क’ मागायला सुरुवात केली. ज्यानंतर २०११ ला ती अचानक गायब होते आणि काही दिवसांनी तिचा मर्डर झाल्याचं समोर येतं.

त्यावेळी अश्या बातम्या सुरू होत्या कि, ती राज्याचे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी मंत्री महिपाल मदेरना आणि काँग्रेसचे आमदार मलखान सिंह बिष्णोई यांना ब्लॅकमेल करायची. या दोघांसोबत तिच्या अवैध लैंगिक संबंधांची व्हिडिओ सीडी तिच्या ताब्यात असल्याचं सांगितल होतं. पुढे ती सार्वजनिक झाल्यानंतर भंवरीदेवी बेपत्ता झाली होती.

सीबीआयने हे प्रकरण हाती घेताच या दोघांनीच तिची हत्या केल्याचं समोर आलं. ज्यानंतर मदेरनाला सरकारमधून काढून टाकलं आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे आमदार मलखान यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं.

या स्टोरीला सुरवात झाली ती २००२ ला, जेव्हा भंवरी आपल्या प्रमोशनच्या संदर्भात मलखानला भेटली. त्यांच्यातील अवैध शारीरिक संबंध प्रेमात बदलले. मलखान हा रामसिंह बिष्णोई यांचा मुलगा, जे त्या भागातील सुप्रसिद्ध नेते आणि  माजी मंत्री होते. भंवरीला मलखानकडून एक मुलगीही झाली.

या दरम्यान, मलखानने आपले जवळचे मित्र आणि काँग्रेस नेते महिपाल मदेरना यांच्याशी तिची भेट घडवून दिली. मदेरना सुद्धा भंवरीबरोबर लैंगिक संबंध ठेवू लागले, हे सगळं मलखानला माहित होतं.

पण जेव्हा भंवरीने मलखानपासून जन्मलेल्या मुलीसाठी अधिकार  मागायला सुरुवात केली, तेव्हापासून गोष्टी बिघडायला सुरुवात झाली. यांनतर जेव्हा भंवरीला विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिकीट मिळाले नाही, त्यांनतर तिला आणखी भीती वाटायला लागली कि, मलखान तिला आपल्यापासून दूर तर करणार नाही ना?

ज्यामुळे भंवरीने सार्वजनिक ठिकाणी त्याच पाणउतारा करायला सुरुवात केली आणि त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. भंवरीच्या या वागण्यामुळे मलखानचे कुटुंब तिच्यावर भडकले होते आणि हळूहळू मलखाननेही तिच्यापासून अंतर बनवायला सुरुवात केली. त्याने भाऊ परसराम बिष्णोई आणि बहीण इंद्रा बिष्णोई यांना भंवरीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायला सांगितले, जेणेकरून तिला शांत करण्यात येईल.

दरम्यान, भंवरीने मलखान आणि त्याच्या कुटुंबाला धमकवायला सुरुवात केली की, तिच्याकडं एक सीडी आहे, ज्यात  मलखानचे तिच्यासोबतचे सेक्स फुटेज आहेत. ही धोक्याची घंटा वाजताच बिष्णोई कुटुंबाने हे प्रकरण मदेरनाच्या अंगावर टाकलं. तिचे कान भरवले गेले की, जर तिने मदेरनाबरोबर सेक्स संबंधाचा विडिओ बनवला तर ती खूप सारे पैसा कमवू शकते.

हे सगळं करण्यामागचा आणखी एक हेतू कि, मदरेनाला या जाळ्यात अडकवून त्याला मंत्रिपदावरून खाली आणायचं, ज्यानंतर मलखानाला मंत्री होण्याची संधी मिळेल.

डिसेंबर २००८ च्या विधानसभा निवडणुकीत असचं काही झालं आणि दोन मित्रांमध्ये फाटाफूट झाली. भंवरी आणि इंद्रने आधी भंवरीची मेहुणी गुडियासोबत मदेरनाच्या लैगिक संबंधाची सीडी बनवण्याचा प्रयत्न केला पण गुडियाने नकार दिला. यानंतर भंवरीने ठरवले की, ती स्वतः मदेरनासोबतच्या तिच्या लैंगिक संबंधांची सीडी तयार करेल.

अखेर प्लॅननुसार मदेरना आणि भंवरी यांच्यातील लैगिक संबंधाची सीडी बनवण्यात आली. सीबीआयने म्हंटले कि, एक सीडी मलखान सिंहची सुद्धा होती. पण हातात पोहचण्यापूर्वीच ती नष्ट झाली.

बिष्णोईंचा एक गट पूर्वी मलखानच्या अगदी जवळ होता, पण हळूहळू सत्तेच्या या खेळात पारडं पलटल.  याच गटाने भंवरीकडून सीडी घेण्याचा डाव आखण्यात निर्णायक भूमिका बजावली. या प्रक्रियेत, त्यांनी पैसेही कमावले, सीडी आणि टेप प्रसारमाध्यमांना दिल्या आणि हळूहळू मदेरना आणि मलखानला राजी करून भंवरीची हत्या करण्यात आली.

पुढे या प्रकरणात एका मागून एक व्यक्ती जोडली जाऊ लागली. 

सोहनलाल बिष्णोई सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागात कंत्राटदार होता. भंवरीकडून सीडी मिळवण्यासाठी त्याने तिला बहीण बनवले. सोहनलालने भंवरीला देण्याच्या नावाखाली मदेरनाकडून आठ लाख रुपये घेतले. पण तिला ते कधीच दिले नाही.

भंवरीने सीडी देण्यासाठी ५० लाख रुपये रोख रक्कम मागितली आणि तिच्याकडे यापुढे कोणतीही सीडी नाही असे एका कागदावर लिहून देण्याचे मान्य केले. तिच्या सहीवर मदेरनाने १० लाख रुपये रोख आणि ४० लाख रुपये चेक देण्याचं मान्य केलं. 

एका वेळी मलखान आणि मदेरना दोघांनीही किंमत चूकवून सगळ्या सीडी मिळवून प्रकरण मिटवणे योग्य मानले. पण जेव्हा त्यांना समजलं की, व्हिडिओ सगळीकडे पसरलेेत, तेव्हा त्यांना समजलं की, आता भंवरीवर विश्वास ठेवता येणार नाही.

त्यावेळी त्यांनी भंवरीला संपवण्याच्या सोहनलालच्या सल्ल्याला सहमती दर्शवली. सोहनलाल, या प्रकरणात मदेरनासाठी विशेष असूनही, तो त्याच्या चुलत भाऊ मलखानच्या सांगण्यावरून वागत होता.

मदेरनाने त्याच्याकडून स्थानिक नेते आणि आपला खास साहिराम बिष्णोईला या कामात गुंतवले. इंद्रा इकडे भंवरी आणि इतरांमध्ये संपर्क म्हणून काम करत होती.

या लोकांनी अपहरणाच्या काही खोट्या घटनांद्वारे भंवरीला घाबरवण्याचा प्रयत्न केला. यावर त्यांनी पोलीस अधिकारी लाखारामच्या मदतीने शस्त्रांचा परवाना मिळवला. मदेरनाने भंवरीला शांत करण्यासाठी लखारामची ड्युटी लावली होती. पण शेवटी ब्लॅकमेलिंगचे हे प्रकरण भंवरीला मारूनच सोडवले गेले.

तिची हत्या करून तिचा मृतदेह जाळून टाकण्यात आला आणि तिची हाडं बेसबॉलच्या दांडक्यानी कुटून टाकली गेली. आणि इंदिरा गांधी तलावात टाकून दिली गेली. 

जोधपूरच्या विशेष सीबीआय न्यायालयात महिपाल मदेरणा आणि मलखान यांच्यासह १७ जणांविरुद्ध तपास यंत्रणेने आरोपपत्र दाखल केले होते. सुमारे १०० पानांचे आरोपपत्र तयार करताना सीबीआयने ३०० हून अधिक साक्षीदारांचे जबाब घेतले होते.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.