शार्क टॅंकमध्ये राडा करणाऱ्या अश्निर ग्रोव्हरच्या बायकोलाही भारत पे मधून कल्टी दिली

आपण बघतोय कि गेल्या काही काळापासून लोकांचा शार्क टॅंक हा रिऍलिटी शो फेव्हरेट बनलाय. या शो ची थीमच सर्वांना आवडेल अशी आहे. ती अशी कि, ” तुम्ही शोच्या जजकडे आयडिया घेऊन जायची आणि मग तुमची आयडिया आवडली तर या शो चे परीक्षक म्हणजे शार्क्स तुमच्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करणार”. 

या आयडियामुळे हा शो फेमस झाला तसाच भारत पे चा सहसंस्थापक अश्निर ग्रोव्हर देखील फेमस झालाय. त्याच्या तापट स्वभावामुळं त्याला त्याला तुफान ट्रोल केलं जातंय. पण जसा अश्निर ग्रोव्हर शो मध्ये दिसतोय तसा तो खऱ्या आयुष्यात देखील आहे. मागे चर्चेत आलेलं त्याचं अन कोटक बँकेचं  प्रकरण चर्चेत आलेलं. पण प्रकरण इथंच थांबलं नाही.अश्निर ग्रोव्हरमुळे कंपनीची बदनामी होतेय असं म्हणत कंपनीनं अश्निरला सक्तीच्या रजेवर पाठवलं असं सांगण्यात येतंय. भारतपेचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर सध्या आर्थिक फसवणुकीच्या चौकशीत आहे. असंही म्हणलं जातंय की ग्रोव्हरला भारतपेमधून काढून टाकलं जाऊ शकतं. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका लॉ फर्मला आणण्यात आले आहे आणि तपास दोन महिने चालण्याची शक्यता आहे.

यासोबतच आता त्याची पत्नी म्हणजेच भारत पेच्या हेड ऑफ कंट्रोल्स माधुरी जैन यांनादेखील कंपनीतून काढून टाकल्याची बातमी समोर आली.

माधुरी जैनने दारूचा एक व्हिडिओ पोस्ट करत कंपनीवर आरोप केलेत त्यामुळें आता नवीनच कॉन्स्पिरसी निर्माण झाली आहे. 

फिनटेक स्टार्टअप भरतपेच्या मॅनेजमेंटमध्ये सुरू असलेला वाद संपण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललाय. आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे. नवीन विकासाअंतर्गत, कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोवर यांची पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांनी एका दारू पार्टीचा व्हिडिओ ट्विट करून कंपनीवर नवेच आरोप केले आहेत.

यापूर्वी कंपनीने आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली माधुरी जैन ग्रोव्हरला कंपनीतून काढून टाकले आहे. यासोबतच भारत पे कंपनीने माधुरी जैन यांना दिलेले सर्व ईएसओपीही जप्त केले आहेत. माधुरी जैन या कंपनीत ‘हेड ऑफ कंट्रोल’ या पदावर होत्या. 

 ‘दारू पार्टी’च्या त्या दोन व्हिडिओची नेमकी भानगड काय आहे ?

माधुरी जैन यांनी कंपनीचे इतर दोन सह-संस्थापक, सुहेल समीर आणि भाविक कोलाडिया यांच्यावर भारतपेच्या ऑफिसमध्ये ऑर्गनाईज केलेल्या कथित ‘दारू पार्टी’चे दोन व्हिडिओ पोस्ट करून नवीन आरोप केले आहेत. सुहेल समीर हे भारतपेचे सीईओ देखील आहेत. माधुरी जैनने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये लोक दारू पिऊन डान्स करताना दिसत आहेत.

अगदी कालच म्हणजेच बुधवारी फिनटेक कंपनी भारतपेने माधुरी जैन ग्रोव्हरची हकालपट्टी केली. अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, माधुरीवर कंपनीने आरोप केले आहेत.

माधुरी जैनवर काय काय आरोप आहेत ?

  • अमेरिका आणि दुबईच्या फॅमिली ट्रीपसाठी तिने कंपनीचे फंड्स वापरले.
  • एप्रिल २०२१ मध्ये माधुरीने स्वतःच्या चेहऱ्यावर उपचार केले त्यासाठी तिने पर्सनल ब्युटी ट्रीटमेंट प्रॉडक्ट्स, इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स साठी कंपनीचे पैसे वापरले. कंपनीला दाखवण्यासाठी माधुरी जैन ने या प्रोडक्टसच्या खर्चाच्या बनावट पावत्या तयार केल्या होत्या असं या आरोपात म्हणलं गेलं आहे. 
  • तसेच तिने स्वतःच्या घरासाठी दोन एलईडी टीव्ही, ६५ इंची सोनी ब्राव्हिया तसेच रेफ्रिजरेटर विकत घेतले. हि खरेदी तिने कंपनीच्या खात्यातून केली असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.
  • तसेच माधुरीने पर्सनल स्टाफला कंपनीच्या खात्यातून पैसे दिले होते आणि ओळखीच्या लोकांच्या नावाने बनावट पावत्या तयार करून घेतल्या होत्या. ऑक्टोबर २०१८ पासून भारतपेच्या आर्थिक प्रभारी असलेल्या माधुरीने स्वतः ही सगळी बिले मंजूर केली होती.  
  • माधुरी जैनने कथितरित्या गोपनीय माहिती शेअर केली, ज्याचा वापर करून तिच्या वडिलांनी आणि  भावाने घोटाळे केले.
  • BharatPe च्या स्पोकपर्सनने माधुरीच्या हकालपट्टीच्या  बातमीला दुजोरा दिला असून माधुरी जैन ग्रोव्हरच्या सर्व्हिस बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, कंपनीने माधुरी जैनने बडतर्फ करण्याचे ठोस कारण सांगितलेले नाहीये. माधुरीकडे असलेले शेअर्स रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. आर्थिक अनियमितता झाल्याचा संशयावरून तिच्यावर हि कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. 

याबाबत अद्याप माधुरी जैन ग्रोवरकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही पण ट्विट मध्ये तिने ऑफिसच्या दारू पार्टीचे व्हिडिओ पोस्ट करत ऑफिसच्या वर्क कल्चरवर निशाणा साधला आहे. आता हे प्रकरण आणखी काय वळण घेतं हे पाहणं महत्वाचं आहे. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.