कोलकत्याला ६ नोबेलचा सन्मान आहे तसाच महाराष्ट्रातल्या या गावाला ३ भारतरत्नांचा सन्मान आहे.
काल अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार अभिजीत बॅनर्जी यांना जाहीर झाला. अभिजीत बॅनर्जी हे कलकत्त्याचे. कलकत्ता शहराशी संबधित असणाऱ्या आजवर सहा जणांना नोबेल पुरस्कार मिळाले आहेत. रविद्रनाथ टागोर, सी.व्ही. रमण, मदर टेरेसा, अमर्त्य सेन, रोनाल्ड रॉस आणि अभिजीत बॅनर्जी अशा एकूण सहा जणांच कलकत्तासोबत नातं.
कलकत्ता शहराला विद्वानांची खाण म्हणलं तर वावगं ठरणार नाही. त्याबद्दल भारतीय म्हणून आपल्याला कौतुक असायलाच हवं. पण हे सांगताना आपल्या मातीतल्या दूसऱ्या शहराबद्दल देखील आपणाला माहिती असायला हवं म्हणून हा लेख.
महाराष्ट्रात अस एक गाव आहे तिथल्या तीन जणांना भारतरत्न मिळाला आहे.
कोणतं गाव आहे याचा अंदाज लावता येतोय का?
ते गाव आहे दापोली.
दापोली शहराशी संबधित असणाऱ्या महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पाडुंरंग काणे अशा तिघांना भारतरत्न मिळाला आहे. म्हणूनच सांगू वाटलं भारतात कलकत्ता असेल तर महाराष्ट्रात दापोली आहे गाव आहे जिथून भारताला रत्न मिळाली आहेत.
महर्षी धोंडो केशव कर्वे.
१९५८ साली भारत सरकारमार्फत त्यांना सर्वांच्च असा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. समाजसेवक म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
महर्षी कर्वे म्हणजेच महाराष्ट्राचे अण्णा. त्यांचा जन्म आपल्या आजोळी शेरवली येथे झाला. पण मुरूड ही त्यांची कर्मभूमी. त्यांच प्राथमिक शिक्षण दापोली तालुक्यातल्या मुरूड येथे झालं. विधवा विवाह प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी अंमलात आणला. मुरूड, दापोलीतून अण्णांची निघालेली ज्ञानगंगा संपुर्ण भारतभर गेली. पारंपारिक चालीरितीत अडकलेल्या महिलांना शिक्षणाची दारे खुली झाली. महिलांना उच्चशिक्षण देण्याचं काम त्यांचच. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला. त्यांच्या नावे आज मुरूडमध्ये शाळा, ग्रॅंथालय आहे.
डॉ. पांडुरंग वामन काणे.
पांडुरंग वामन काणे यांचे वडिल वामन काणे हे दापोली न्यायालयात वकील होते. पांडुरंग काणे यांच शिक्षण दापोलीच्या ए.जी. हायस्कूलमध्ये झालं.
प्राचीन रुढी कालबाह्य झालेल्या असून त्या पुर्णपणे टाकून देऊन सामाजिक सुधारणा तातडीने अंमलात आणली पाहीजे असे मानणाऱ्यांचा एक वर्ग होता तर दूसरा वर्ग सनातनी विचारांचा होता. काणे मात्र समन्वयवादी म्हणून ओळखले जातं. धर्मशास्त्राचा इतिहास त्यांनी मांडला. प्राचीन काळचा इतिहास सांगत असताना भारताच्या प्रगतीसाठी भविष्याच्या संकल्पना ते मांडत. त्यांचे विद्वतेची जाण ठेवूनच भारत सरकारने त्यांना १९६३ साली भारतरत्न पुरस्काराने गौरवले. दापोलीचा परिसस्पर्श लाभलेले ते दूसरे भारतरत्न मिळवणारे दापोलीकर ठरले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दापोलीच विशेष नातं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच बालपण दापोली मध्ये गेले. त्यांच्या मातोश्री भिमाबाईंचे निधन झाल्यानंतर त्यांचा संभाळ त्यांची आत्या मीराबाईंनी केलं. बाबासाहेब वयाने लहान असल्यामुळे त्यांना कॅम्प दापोली शाळेत प्रवेश घेता आला नाही. पुढे १८९६ मध्ये त्यांनी दापोली सोडली व ते सातारा येथे आले. याशिवाय दापोलीपासून जवळ असणारे वणंद गाव हे डॉ. बाबासाहेब यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे माहेर आह.
याशिवाय साने गुरूजी, साहित्यिक ना.सी. पेंडसे, रॅग्लर परांजपे अशा कित्येक विद्वानांनी दापोलीच्या वैभवात भर घातली.
हे ही वाच भिडू.
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जाहिर झालेला भारतरत्न, त्यांच्या कुटूंबाने का नाकारला होता ?
- मुंबईचं टायटॅनिक रामदास बोट जी आजच्या दिवशी ६९० लोकांना घेवून बुडाली होती.
- मराठ्यात जन्मलो म्हणून आंबेडकरांना मनमोकळं कवटाळता येत नाही, पण आज ठरवलय..