आ जाओ दिखा दूंगा…भावेश कावरे एवढा फेमस कसा झाला ?

Informative videos देखने है आ जाओ दिखा दुंगा. Interesting facts जानने हे आ जाओ दिखा दुंगा…ओळखलं का ? हो भावेश कावरे. या मुलाला बघून कळतं कि मराठी माणूस सुद्धा सेल्स मध्ये चांगलं नाव करू शकतो. आपल्या वेगळ्याच लकबीने, वेगळ्या बोलण्याच्या लहेजामुळे हा रियल इस्टेट एजंट भलताच फेमस झाला आहे.

एक मराठी मुलगा इतक्या कमी वयात एवढा फेमस इस्टेट एजंट कसा झाला? 

भावेशमुळे D-mart जवळच्या घरांची मागणी वाढली आहे. प्रत्येकालाच आता D-mart जवळचं घर पाहिजे आहे. एवढच नाही तर कांजुरमार्ग आणि ठाण्याला सुद्धा घरांच्या मागण्या वाढल्या आहेत. याचं कारण आहे property transaction guru भावेश कावरे.

कोण आहे हा भावेश कावरे ?

बिजनेससाठी इंस्टाग्रामचा असाही वापर होऊ शकतो हे भावेश कावरे कडून कळलं. भावेश मुळचा आळे फाट्याचा. त्याचे आजोबा गोदरेज कंपनीमध्ये नोकरी करत होते पण ९२ मध्ये जेव्हा रिसेशन आलं तेव्हा त्याच्या आजोबांची नोकरी गेली आणि ते मुंबईला आले. मुंबईला येऊन पोटापाण्यासाठी त्यांनी भाजी विकली. त्यांना चार मुलं होती. चौघांनाही ते वाशी मार्केटमधून होलसेलमध्ये भाजी आणून द्यायचे आणि चारही भाऊ ती भाजी विकून यायचे. पण हे किती दिवस चालणार म्हणून त्यांनी हाच व्यवसाय वाढवायचं ठरवलं, आणि त्यांनी त्यांच्या राहत्या घराला शटर लाऊन त्याचं दुकान बनवलं. त्यांनी दुकानात भाजी विकायला सुरुवात केली.

भाजी सोबतच चॉकलेट्स, अंडी विकायला सुरु केली. हाच धंदा वाढवत भावेशच्या वडिलांनी कोंबडीचं दुकान सुद्धा काढलं. भावेशच्या आजोबांनी घरातून दुकान सुरु केलं ते आज त्यांची एकूण आठ दुकानं आहेत. एवढंच नाही तर भावेशच्या वडिलांचा रियल इस्टेटचा सुद्धा बिजनेस आहे. या कावरे कुटुंबाला बघून वाटतं कि कोण म्हणतं मराठी माणूस बिजनेस करू शकत नाही ?

त्यामुळे भावेशच्या रक्तातच बिजनेस आहे असं म्हणायला हरकत नाही. पण भावेश अभ्यासात कच्चा होता. तीनवेळा दहावीच्याच वर्गात होता. स्वतःची आठ दुकानं आहेत म्हटल्यावर तो भविष्याबाबत तो एकदम चिल होता.

कॉलेजला कधी गेला नाही पण एका कॉलेजच्या नाक्यावर उभं राहून पटेली मारायची आणि मजा मस्ती करायची हे त्याचं रोजचं रुटीन होतं.

आणि भावेशला प्रेम झालं.

म्हणतात ना आयुष्यात प्रेम होतं मग ब्रेकअप अन् आयुष्यच बदलून जातं. भावेशच्या बाबतीत तेच झालं. तू किती कमवतोस असं म्हणत जेव्हा गर्लफ्रेंडने त्याला हिणवलं तेव्हा त्याने ठरवलं की आयुष्यात काही तरी करून दाखवायचं.

ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी. पण त्यासाठी खूप शिकून पुढे जायचं, हा भावेशसाठी मार्ग नव्हता. कारण अभ्यासात त्याला कधी रस नव्हताच.

त्याने आपल्याच दुकनापासून सुरुवात केली. रोज सकाळी ६ वाजता दुकानात जायचं आणि रात्री १० वाजता घरी यायचं. पण इतके वर्ष मित्र मैत्रिणींसोबत मजा करणाऱ्या भावेश ला हे दिवसभर एकाच कामात अडकून राहणं काही रुचलं नाही.

तेव्हा त्याने बाबांच्या construction sites वर जाऊन काम करायला सुरुवात केली. पण तेही त्याला जमलं नाही. शेवटी त्याने रियल इस्टेटमध्ये नशीब आजमावायचं ठरवलं. दुकानात राहून त्याला ग्राहकांना आपलं प्रॉडक्ट कसं विकायचं हे येत होतं. रील वेगैरे तो tiktok असल्यापासूनच बनवत होता. त्यामुळे त्याने इंस्टाग्रामवर रील्स बनवून प्रॉपर्टी विकायला सुरुवात केली.

लोकं त्याचे रील्स तर बघत होते. पण म्हणावा तितका फेमस तो झाला नव्हता. तुम्हाला सड्डा कुत्ता कुत्ता तोड्डा कुत्ता टॉमी ही व्हायरल टोन तुम्हाला आठवत असेलच. ही टोन बनवणारा यशराज मुखाटे नेहमीच अशा interesting टोन बनवत असतो. त्याची प्रत्येक टोन व्हायरल होते. अशीच त्याने एक दिवशी भावेशची घर देख रहे हो आजाओ दिखा दुंगा ही टोन बनवली आणि काही तासातच ती व्हायरल झाली.

एका दिवसात भावेश कावरे अजून फेमस झाला. मग यावर बड्या बड्या सेलिब्रेटीनी सुद्धा रील्स बनवल्या. आणि भावेशचे followers अजून वाढायला लागले. पर्यायाने त्याचा बिजनेसही वाढत असेल. मिळालेल्या संधीचं सोनं कसं करावं तर ते असं.

पण व्हायरल होऊन मिळालेलं फेम जास्त टिकत नाही असं म्हणतात. त्यामुळे पुढे भावेश आपल्या properties विकण्यासाठी अजून कोणते पर्याय काढतोय ते बघुयात.

हे हि वाच भिडू :

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.