भाविनाबेनच्या टेबल टेनिसमधील यशात एका क्रिकेटरचा देखील मोठा वाटा आहे…
आज नॅशनल स्पोर्ट्स डे. दिग्गज खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या ११६ च्या जयंतीनिमित्त देशभरात हा दिवस उत्साहाने साजरा होतोय. त्यातचं ‘सोने पे सुहागा’ म्हणजे आज सकाळी भारताला टोकियो पॅरालॉम्पिकमध्ये सिल्वर मेडल मिळालं आहे. याआधी झालेल्या ऑलम्पिक २०२१ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत तब्बल ७ मेडल्स आपल्या देशाच्या नावे केलेत.
पॅरालॉम्पिकच्या टेबल टेनिस विभागात भाविनाबेन पटेलने हे सिल्वर मेडल जिंकून नवा इतिहास रचलायं. या स्पर्धेच्या टेबल टेनिसच्या वुमन सिंगल क्लास -४ कॅटेगरीत भारताने पहिले पदक जिंकलेय. अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चिनी खेळाडू झोउ यिंगशी होता. भाविनाने ११-७, ११-५ आणि ११-६ असा मार्कांनी सिल्वर आपल्या नावे केलं.
दरम्यान, या सिल्वर मेडलचा प्रवास सोपा नव्हता. पोलिओने ग्रस्त असलेल्या भाविनाबेन पटेलने आपल्या आयुष्यात खूप मेहनत घेतली. जन्मानंतर ती जेव्हा चालायला फिरायला शिकत होती तेव्हाचं पोलिओनं तिच्यावर झडप घातली.
गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील सुंडिया गावात शिक्षण पूर्ण केल्यानंतर, भाविनाबेन कम्प्युटर सायन्समधून आयटीआय करण्यासाठी अहमदाबादला आली. लहानपणापासूनच तिला टेबल टेनिसची आवड होती. हीच आवड जोपासत तिने ट्रेनिंग सेंटर जॉईन केलं. मात्र, यासाठी आधी दोन बस बदलायच्या, मग ऑटो करायची आणि मग पायी जाऊन ट्रेनिंग सेंटर गाठायला लागायचं.
या प्रवासात, तिला अनेक वेळा माजी क्रिकेटपटू निकुल पटेलकडून लिफ्ट मिळायची. निकूल हा २००२ मध्ये अंडर १९ क्रिकेटमध्ये खेळलेला खेळाडू आहे. जो तिला तिच्या डेस्टिनेशनवर घेऊन जायचा. पुढे हाच निकूल तिच्या लाईफचा डेस्टिनी बनला, त्या दोघांनीही लग्न केले.
ट्रेनिंग सुरू झाल्याच्या तीन वर्षांनंतर २००७ मध्ये, भाविनाने बंगळुरू येथे पॅरा टेबल टेनिस नॅशनलमध्ये आपले पहिले गोल्ड मेडल जिंकले होते. भाविनाचे पहिले इंटरनॅशनल मेडल २०११ मध्ये थायलंड ओपनमध्ये जिंकले, जिथे तिने सिल्वर मेडल आपल्या नावे केलं. यानंतर, तिने २०१३ मध्ये पहिल्यांदाच आशियाई विभागीय अजिंक्यपद स्पर्धेत सिल्वर मेडल जिंकले.
भावना एक सरकारी कर्मचारी आहे, पण ती आपल्या कामाबरोबरच तिच्या ध्येयाकडेही तितकेच लक्ष केंद्रित करते. मात्र, टेबल टेनिसचा सराव करण्यासाठी दररोज प्रवास करणे तिच्यासाठी सोपे नव्हते, तिला पोलिओ असल्याने आधाराची गरज असायची. पण जिद्दीने भरलेल्या भाविनाबेनने २५-ते ३० देशांमध्ये प्रवास केला.
#Paralympics debut ✅#IND's first #ParaTableTennis medal ✅
Bhavina Patel's maiden appearance ends with a #Silver medal! #Tokyo2020pic.twitter.com/tINiLxkRL0
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 29, 2021
निकुल पटेलले एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले कि,
‘तिच्या या प्रवासात युरोप हे चॅलेंजींग होत. तिथे खूप थंडी होती आणि भाविनला खूप ताप होता. तिला बर्फातून सुमारे दीड किलोमीटरपर्यंत स्वतःची व्हीलचेअर घेऊन जावं लागायचं.
निकूलनं सांगितलं कि, एका वर्षात त्यांना प्रवासासाठी सुमारे १२ ते १३ लाख रुपये खर्च करतो. मिळणार फंडिंग त्याच्यासमोर काहीच नाही. लोकांना वाटते की, टेबल टेनिस हा एक स्वस्त खेळ आहे, पण चांगल्या दर्जाच्या टेबल टेनिस बॅटची किंमत ७०,००० रुपये आहे.
निकुलने सांगितले की, कोरोनामुळे लादलेल्या लॉकडाऊन दरम्यान त्यांनी आपले घर भाविनासाठी ट्रेनिंग सेंटर बनवलं. एका खोलीत टेबल लावला आणि भाविनाने तिथेच सराव सुरू केला. ६ महिने तिने घरीचं सराव केला आणि प्रशिक्षकाला असेही सांगितले की जर इतर खेळाडूंना येथे येऊन सराव करायचा असेल तर ते येऊ शकतात. या दरम्यान, जर आमच्या घरी कोणी आले, तर आम्ही टेबल फोल्ड करून जमिनीवर झोपायचो.
दरम्यान, भाविनाबेनच्या या आनंदात संपूर्ण देश सहभागी असताना तिच्या गावात मोठा आनंद साजरा केला जातोय, फटाक्यांची आतिषबाजी सोबतच गरबा करून भाविनच कुटुंब आणि परिसरातले लोक आनंद साजरा करतायेत.
#WATCH Family members and friends of Para-paddler Bhavina Patel in Mehsana perform 'garba' to celebrate her bringing home a Silver medal in her maiden Paralympic Games pic.twitter.com/h55CAAycOG
— ANI (@ANI) August 29, 2021
हे ही वाचं भिडू :
- एकमागून एक इंटरनॅशनल स्पर्धा भरत गेल्या आणि नजफगड खेळांचा बालेकिल्ला बनला
- भारताच्या नीरज चोप्रान गोल्ड जिंकलंय खरं जल्लोष तिकडं जर्मनीतल्या एका गावात सुरूय.
- गरीब देशाचा श्रीमंत खेळाडू ज्याने सुवर्णपदक मिळवून देशाच्या अपमानाचा बदला घेतला.