माल्याला ज्या VIP सुविधा मिळतात त्याच मलाही द्या म्हणून सुधा भारद्वाज यांनी मागणी केली होती.

सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज. हे भीमा कोरेगाच्या दंगलीपासून लक्षात राहणारे नाव आहे. शहरी नक्षलवादाच्या आरोपाखाली गेल्या तीन वर्षांपासून त्या मुंबईच्या भायखळा तुरुंगात होत्या.  सुधा भारद्वाज आत्ता पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तब्बल तीन वर्षांनंतर त्या तुरुंगातून बाहेर आल्या आहेत. एनआयए कोर्टाने त्यांची तुरुंगातून जामीनावर सुटका करण्यातआली आहे. 

त्यांना तुरुंगातून सुटका तर मिळाली पण कोर्टाने त्यांना अनेक प्रकारच्या अशा एकूण १५ अटी लादल्या आहेत. तसेच त्यासाठी त्यांच्याकडून ५० हजार रुपयांचा बॉन्ड भरुन घेतला आहे.

त्यातल्या काही अटी म्हणजे, न्यायालयाच्या परवानगीशिवाय सुधा भारद्वाज यांना मुंबईच्या बाहेर जातं येणार नाही, तसेच सुधा भारद्वाज यांच्या जवळच्या तीन नातेवाईकांचा पत्ता आणि सर्व माहिती जमा करावा असा आदेशही सुधा भारद्वाज यांना देण्यात आला आहे. 

तसेच या प्रकरणाचा निर्णय येईपर्यंत त्यांनी माध्यमांसमोर बोलू नये, 

भीमा कोरेगाव प्रकरणानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आली होती.  

पण नेमकं प्रकरण काय आहे ?

पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद झाली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी  १ जानेवारी २०१८  रोजी भीमा कोरेगावामध्ये हिंसाचार झाला, दंगल झाली. तपासादरम्यान एल्गार परिषदेत जेवढे कार्यकर्ते सहभागी झाले तेवढ्या सामाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून सुधा भारद्वाज यांना पुणे पोलिसांनी रात्री उशिरा सूरजकुंड येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती तेंव्हापासून सुधा भारद्वाज पुणे आणि नंतर भायखळा येथील महिला कारागृहात होत्या. 

पण त्या जेंव्हा या पुण्यातील येरवडा जेल मध्ये होत्या तेंव्हा त्यांनी एक अशी आगळीवेगळी मागणी केली होती ज्याची बरीच चर्चा झाली होती. 

त्या दरम्यानच आर्थिक गुन्हेगार विजय माल्या बराच चर्चेत होता. २०१६ तो भारतातून फरार झाला आणि लंडन ला जाऊन सेटल झाला होता. त्यानंतर त्याच्या अटकेचे अनेक वॉरंट निघाले होते.   

त्यानंतर जेंव्हा हि भीमा कोरेगाव च्या प्रकरणावरून सुधा भारद्वाज याना अटक झाली होती.  सुधा भारद्वाज यांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यांनी पुण्याच्या सत्र न्यायालयात एक अर्ज केला होता.  त्यात असं त्यांनी लिहिलं होतं कि, ज्याप्रमाणे विजय मल्ल्याला जेलमध्ये व्हीआयपी सुविधा देण्यात येईल असे वचन केंद्र सरकारने दिलं होतं.

अनेक बँकांचे सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून भारताबाहेर पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्याला फरार घोषित करण्यात आले आहे. भारतात प्रत्यार्पण केल्यास तुम्हाला कारागृहात चांगल्या म्हणजेच VIP प्रमाणे सुविधा देऊ असे आश्वासन दिले होते. मलाही त्याच प्रमाणे कारागृहात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सुधा भारद्वाज यांनी केली होती. त्या मागणी अर्जात लिहिलं होतं कि, जेल मध्ये झोपण्यासाठी चांगला पलंग, बसण्यासाठी खुर्ची आणि स्वच्छ बाथरूमची सुविधा करण्यात यावी  मात्र पुण्यातील न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला होता.

जसं कि, व्हीआयपी व्यक्तींप्रमाणे माल्याला ज्या सुख-सुविधा दिल्या जाणार होत्या त्याच सुविधा आम्हालाही देण्यात याव्यात असं त्यांनी त्या अर्जात लिहिलं होतं.

भारद्वाज यांच्या वकिलाने न्यायालयासमोर मागणी केली होती, कि योग्य आहार, औषधोपचार, आंघोळ आणि शौचालयाच्या सुविधा पुरविल्या पाहिजेत ज्या राज्य आणि केंद्र सरकारने विजय मल्ल्याला देण्याचे आश्वासन दिले होते.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.