भोपाळच्या राजाने राज्यावर संकट आलं म्हणून राणीचा शिरच्छेद केला होता…..

भारताचा इतिहास हा राजे रजवाड्यांशिवाय अपूर्ण आहे. भारतभरात अनेक राजे होऊन गेले. आजही त्यांच्या शौर्याचे गुणगान गायले जातात. पराक्रम, स्वाभिमान, अभिमान, शौर्य या सगळ्या गोष्टींच्या जोरावर त्यांनी अनेक विरोधक नामोहरम केले.

पण आजचा किस्सा अशा एका राजाचा आहे ज्याने आपल्या राणीचं शीर कापून टाकलं होतं, काय घडली होती घटना जाणून घेऊया.

भोपाळचा एक किल्ला आहे त्याच नाव आहे रायसेनचा किल्ला. हा रायसेनचा किल्ला आज घडीला भारतातला सगळ्यात जास्त रहस्यमय आणि भीतीदायक असलेला किल्ला मानला जातो, त्याला कारणीभूतही त्याचा इतिहासचं आहे. इसवी सन १२०० च्या काळात बलुआ नावाच्या दगडात हा किल्ला बांधण्यात आला आहे.  जो एका मोठ्या उंचीवर आहे. प्राचीन काळात बनलेला हा किल्ला आजही त्याच ऐटीने उभा आहे. 

मोठमोठ्या मजबूत भिंती, ९ दरवाजे, १३ बुरुज असा हा भक्कम किल्ला. या किल्ल्यावर बऱ्याच लोकांनी राज्य केलं. त्यापैकीच शेरशहा सुरीनेसुद्धा या किल्ल्यावर राज्य केलं होतं. पण हा किल्ला जिंकण्यासाठी शेरशहाची चांगलीच दमछाक झाली होती. चार महिन्यांचा वेढा टाकूनसुद्धा शेरशहा सुरीला लवकर किल्ला मिळाला नाही.

इसवी सन १५४३ मध्ये शेरशहा सुरीने तांब्याच्या पैशांना उकळवून त्यातून तोफा बनवल्या होत्या. या तोफांच्या जोरावर शेरशहा सुरीने किल्ल्यावर विजय मिळवला. पण असं सांगण्यात येतं कि शेरशहा सुरीने धोका देऊन हा किल्ला जिंकला होता. चार महिने या किल्ल्याला वेढा पडलेला होता. 

या काळात राजा पुरणमल किल्ल्याचे शासक होते. ज्यावेळी त्यांना या अनामिक युद्धाची जाणीव झाली आणि धोका झाल्याची बातमी समजली तेव्हा त्यांनी राणी रत्नावलीवर कोणीही हात टाकू नये म्हणून या संकटसमयी राजा पुरणमल यांनी आपल्या राणीचं डोकं छाटलं होतं.

याच किल्ल्याशी संबंधित एक गोष्ट आहे कि याच किल्ल्यावर अजून एक राजे होते त्यांचं नाव होतं राजा राजसेन. राजा राजसेन यांच्याकडे एक पारस दगड होता. या पारस दगडाचं वैशिष्ट्य होतं कि या दगडाचा स्पर्श ज्या गोष्टीला होईल ती वस्तू सोन्याची होईल. या किल्यावर ज्या वेळी युद्ध झाले तेव्हा राजा राजसेनला समजलं कि आता आपला पराभव होणार आहे तेव्हा त्यांनी तो पारस दगड किल्ल्यातल्या एका तलावात फेकून दिला.

पुढे अनेक राजांनी या दगडाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण सगळ्यांच्याच हाती निराशा आली. याच घटेनमुळे हा किल्ला रहस्यमय बनला. हॉंटेड फोर्ट म्हणून लोकं या किल्ल्याकडे बघू लागले. काही लोकं तर रात्री या किल्ल्यात येतात तेही तांत्रिकाला घेऊन पण कोणालाही काहीच मिळत नाही. असंही सांगण्यात येतं कि जो या दगडाचा शोध घ्यायला येतो त्याच मानसिक संतुलन बिघडलं जातं कारण या दगडाची रक्षा कुठलातरी जीन करतो. 

पुरातत्व विभाकडून हे सगळं खोटं असल्याचं सांगण्यात येतं पण लोकांच्या नजरेत आजही पारस दगड असल्याचं दिसतं. या किल्ल्यावर असलेलं शंकराचं मंदिर, हवा महल, राणी महल, झाँजिरी महल. वारादरी, शिलादत्यची समाधी, धोबी महल, कचेरी, चमार महल, बालेकिल्ला, मदागन तलाव अशा अनेक जागा पाहण्यासारख्या आहेत.

पण हा किल्ला जास्त प्रसिद्ध झाला तो राजा पुरणमल यांनी आपल्या राणीचं छाटलेलं शीर आणि इथे हरवलेला पारस दगड. पण हा किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.