बिहारच्या पकडोआ शादीच्या दहशतीमुळं बिहारची पोरं घराबाहेर पडत नाहीत

तसं तर म्हटलं जातं की जोड्या स्वर्गात बनतात. पण बिहार मधले लोक धर्तीवर जोड्या बनवतात आणि ते सुद्धा जबरदस्तीने. 

याचं उदाहरण द्यायचं झालं तर जसं की समस्तीपुर मधल्या मोरवा ना मग गावात एका मुलाचं लग्न झालं. आता हा पोरगा या गावाला आपल्या बहिणीला तिच्या सासरी सोडवायला गेला होता पण त्याला काय माहित की त्याच्या बहिणीचा सासर हेसुद्धा त्याच सासर होणार आहे. म्हणजे सगळे असे एकूण विषय आहे इथे आपल्याला पोरी पाहायला मिळाना आणि बिहारमध्ये लग्नामुळे पोरांना लपवून ठेवण्याची वेळ आली आहे.

इथे आमचा खंडेराव एमपीएससी यूपीएससी च्या नादात वर्षाच्या वर्ष घासतोच आहे. पण ठीके त्याच जुळेल कुठेतरी पण ही बिहारची पकडोआ शादी नक्की काय आहे ते जाणून घेऊया.

आता पुन्हा त्या पोराच्या लग्नाच्या विषयावर परत येऊ, खर तर ते पोरगं आपल्या बहिणीला सोडवला बहिणीच्या सासुरवाडीला गेल होत. पण तिथं गेल्यावर त्याच्यावर गेम फिरली आणि घरातल्या बहिणीच्या नंदे सोबत या भिडूच लग्न लावून देण्यात आलं. खरतर बहिणीच्या सासरचे आपल्या मुलीच्या लग्नासाठी स्थळ शोधत होते. स्थळ काय मिळत नव्हतं आणि ते वैतागले होते सगळ्या ठिकाणांहून हुंड्याची मागणी केली जात होती. यावेळी सासरच्या माणसांनी सुनेच्या भावाच्या रूपात वर शोधला आणि त्याला पकडून नेऊन मंदिरात जबरदस्तीने त्याचं लग्न लावून देण्यात आल.

ही घटना झाली दलसिंह सराय चे स्थानिक निवासी तरुण विनोद कुमार यांच्या सोबत. विनोद कुमार यांच्या सोबत हा तर खूप मोठा विनोद झालाय. बहिणीला सोडवायला गेले आणि बळजबरीने लग्न करून घरी आले.

विनोद कुमार यांची परवानगी सुद्धा घेण्यात आली नाही आणि समोरच्या मुलीने त्यांच्या गळ्यात वर माला टाकली आणि भांगात कुंकू भरून घेतलं.

लग्नानंतर विनोद कुमार यांचे म्हणणे आहे की त्यांचं लग्न बळजबरीने केलेला आहे त्यांच्या मर्जीने नाही.

या घटनेचा व्हिडीओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे व्हिडिओमध्ये बळजबरीने मुलाचा हात पकडून वर माला टाकण्यात आलेली आहे मुलगी त्याच्या बाजूला गपचूप उभी आहे आणि याच घटनेत नवरा मुलगा हे लग्न आपल्या गैरमर्जी न झाल्यास सांगतो तर दुसर्‍या बाजूला सासरचे लोक सांगतात की हा मुलगा आमच्या मुलीला भेटण्यासाठी लपून छपून यायचा आणि या दोघांचं अफेअर होतं त्यामुळे दोघांचे लग्न लावून देण्यात आले. आता पहा तुम्हाला काय वाटतं बघा.

या प्रकारच्या लग्नाला बिहार मध्ये पकडोआ शादी म्हणून ओळखलं जातं. एक काळ होता बिहार मध्ये बळजबरीने लग्न लावून देणे साधारण गोष्ट होती. पकडोआ विवाहामध्ये अगोदर मुलाला सतत करण्यात यायचं त्याने ऐकलं तर ठीक नाहीतर मग त्याला बळजबरी करून लग्नाला उभं केलं जायचं. बीबीसीच्या रिपोर्टनुसार ऐंशीच्या दशकात बिहारच्या बऱ्याच भागांमध्ये अशाप्रकारच्या लग्नाचं पेव फुटलं होतं. यावरच भेटलेला अशा लग्नाचा सिनेमा म्हणजे अतरंगी रे हा होय सोबतच भाग्यविधाता नावाची सिरीयल सुद्धा होती.

रिपोर्टच्या मते असे लग्न लावून देण्यासाठी काही टोळ्या बनल्या होत्या या टोळ्या तरुण मुलांचे शिक्षण त्यांचं लग्न करण्याचं वय त्याच्यावर पाळत ठेवून असायचं त्यामुळे तरुण मुलांनाही कळायचं की आता घराच्या बाहेर पडत धोकादायक आहे बिहारच्या पोलीस मुख्यालयाच्या आकड्याच्या मते 2014 साली 2526, 2015 साली 3000, 2016 साली 3070 आणि नोव्हेंबर 2017 मध्ये 3405 तरुणांना लग्नासाठी अपहरण करून आणण्यात आलं होतं.

अशा घटना आपल्या जिवाभावाच्या मित्रांसाठी सुद्धा होवो हीच आशा…..

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.