बिक गई है गोरमिंट वाल्या आंटीचं पुढं काय झालं ?
#YehBikGayiHaiGormint हा हॅशटॅग आठवलाय का ? हा हॅशटॅग २०१७ मध्ये Twitter वर टॉप ट्रेंडमध्ये होता. म्हणजे ट्विटर वर कितीही हॅशटॅग येऊ देत अन जाऊ देत मात्र हा ट्रेंड कुणीच विसरू शकत नाही.
एका व्हिडिओत पाकिस्तानातल्या एक आंटी सरकारवर भलत्याच पेटल्या होत्या, इतक्या की त्यांनी आपली सगळी भडास काढून टाकली. त्या म्हणाल्या, “ये बिक गई हैं गोरमिंट. अब गोरमिंट में कुछ नहीं है. ये भें* सारे मिलके हमको पागल बना रहा है, मा*द के बच्चे, इतने गां* फटी के है ये भडवे…”
मग काय बात उठी है तो दूर तक जाएगी।
या मॅडमांनी सरकारवर टीका करताना मनातली सगळी भडास काढली अन व्हायचं तेच झालं सगळीकडेच या व्हिडीओने धुमाकुळ घातला होता. तेंव्हापासून सोशल मीडियावर या पाकिस्तानी आंटीचा डायलॉग सर्वांच्याच तोंडात असतो आहे, ज्यात ती ‘गोरमिंट’ म्हणजेच सरकारला शिव्याशाप घालतेय.
सोशल मीडियावर हा हॅशटॅग बराच तुफान चालला आणि अजूनही चालतो…अनेक जोक्स देखील तयार झाले, एखाद्या गुळपाड्या दादाने मुलीच्या इनबॉक्समध्ये जरी मेसेज केला, प्लीज ते मॅजिकल वर्ड्स बोल ना…तर पोरीने उत्तर दिलेलं.. Bik Gayi Gormint !!! तर असा सगळीकडेच हा डायलॉग फेमस झालेला.
नेमकं काय झालेलं तेंव्हा?
२०१४ मध्ये पाकिस्तान सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले होते. या संदर्भात एका पाकिस्तानी चॅनलने नागरिकांच्या बाइट्स घ्यायला सुरुवात केली होती. दारूगोळ्याने भरलेल्या कराची येथे जेंव्हा हे चॅनल वाले पोहचले तेंव्हा या आंटी त्यांना भेटल्या, इतरांप्रमाणेच त्यांनाही प्रश्न केलं असता या महिलेने सांगितले होते की तिच्या भागात वारंवार वीज खंडित होते…आणि बोलता बोलता काकूंची जीभ घसरली अन त्यांनी सरकारला शिव्याच घालायला सुरुवात केली.
मग काय काहीच वेळात हा व्हिडीओ जगभरात पोहचला, भारतात तर याचा ट्रेंड सुरू आहे. लोकांनी या काकूंबद्दल आणि त्यांच्या डायलॉगवरून बरेच मजेदार पोस्ट/मीम्स/व्हिडिओ बनवले. सोशल नेटवर्किंग साइट्सवर ती गोरमिंट आंटी म्हणून प्रसिद्ध झाली. गोर्मिंट मावशीच्या चेहऱ्याने मीम्स आणि ट्रोलने पाकिस्तान आणि भारतातले लोकं अक्षरशः वेडे झाले.
त्यानंतर फेमस कॉमेडी ग्रुप AIB इरफान खानकडून या आंटीची ऍक्टिंग केली अन या आंटी भारतात आणखी फेमस झाली.
आता काकूंनी सरकारवर टीकेवर प्रत्येकजण मनापासून हसला होता, पण असं नाही कि प्रत्येकालाच याचा हसू आलं असं नाहीये काही काहींना याचा परिणाम देखील भोगावा लागलं त्यातलेच एक म्हणजे खुद्द या आंटी आणि त्यांचं कुटुंब.
गोरमिंट आंटीच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की या व्हिडिओ क्लिपमुळे त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते.
समा टीव्हीच्या रिपोर्टनुसार, कराचीमधील या गोरमिंट आंटी ज्या परिसरात त्या राहतात त्या परिसरातलय लोकांनी या महिलेला आणि तीच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला. कमर नावाची ही महिला कराचीतील मार्टिन क्वार्टर्समध्ये राहते. बातमीची क्लिप व्हायरल झाल्यानंतर कुटुंबाला येणाऱ्या समस्यांबद्दल बोलताना, समा टीव्हीने तिच्या मुलाचा हवाला देत म्हटले, “माझी आई खूप शॉर्ट टेंम्पर्ड स्वभावाची आहे. जेव्हा तिचा रक्तदाब वाढतो तेव्हा ती शिवीगाळ द्यायला लागते. ती काय बोलत आहे हे तिला देखील समजत नाही. त्या दिवशी आमच्या भागात टीव्ही वाला आला तेंव्हा तिच्या मनात जे आले ते बोलून दाखवले कारण ती प्रचंड चिडलेली होती आणि तिचा रक्तदाबही खूप वाढला होता.” टीव्ही रिपोर्टरने फुटेज हटवायला हवे होते, असेही त्या व्यक्तीने सांगितले होते…पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
“प्रत्येकजण माझ्या आईची चेष्टा करतो. आम्ही कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे बंद केले आहे कारण लोक कौटुंबिक कार्यक्रमांचा आनंद घेण्याऐवजी त्यांचे लक्ष माझ्या आईकडे जात असते. या मुद्द्यावरून आमचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी बरेच वाद झाले आहेत. परिणामी आता आमच्या घरी कोणी येत नाही आणि आम्हीही कुठं जात नाही. शिवाय त्याच्या बहिणींना योग्य स्थळं देखील मिळत नव्हती. तसेच त्या मुलाने, “आता आम्ही कुठे जाऊ? समाज आम्हाला शांततेत जगू देत नाही. माझे वडील, भाऊ बाहेर कुठे गेलेच तर त्यांच्यावर जोक्स केले जातात. जे घडलं त्यावरून माझी आई अजूनच चिडून गेली आहे असं देखील त्या महिलेच्या मुलाने माध्यमांना बोलताना सांगितले होते”.
हे हि वाच भिडू :
- ओ भाई मुझे मारो, म्हणणारा भिडू सध्या काय करतोय?
- पूनम ढिल्लो होती म्हणून पद्मिनी कोल्हापूरेंना पळून जाऊन लग्न करता आलं….
- ज्या माकडामुळे मराठवाड्यात गॅंगवॉर चालू झालं त्याला शेवटी अटक झालीच !