आणि बिकिनी किलरने तिहार जेल फोडला !!

१६ मार्च १९८६. तिहार जेलच्या गेटवर एक पोष कपड्यामधला एक इंग्रज गृहस्थ आला. गेटवरच्या पोलिसांना त्याने मिठाई आणि फळांचे मोठमोठाले बास्केट दिले. त्यांना काही कळेना. तेव्हा तो फिरंगी अस्सल हिंदी मध्ये म्हणाला,

“चार्ल्स साहिब का बड्डे है. उन्होने सभी के लिये मिठाई मन्गाई है.”

जेलरच्या ऑफिसमध्ये गप्पा मारत बसलेल्या चार्ल्सला हा निरोप पोचवण्यात आला. आता आपल्याला वाटू शकते जेलरच्या ऑफिसमध्ये बसलाय म्हणजे हा एखादा मोठा अधिकारी असेल तर तस नाही. तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुविख्यात गुन्हेगार होता.

नाव चार्ल्स शोभराज उर्फ बिकिनी किलर !

खून, फसवणूक, दरोडे, चोऱ्या, तस्करी, गॅम्बलिंग अशा नाना प्रकारच्या गुन्ह्यामध्ये गुंतलेला चार्ल्स शोभराज पूर्व युरोप आणि आशियातील अनेक देशांसाठी ‘मोस्ट वॉन्टेड’ होता. काही गुन्ह्यांच्या प्रकरणात त्याला अटक झालेली होती आणि बिहारच्या तिहार तुरुंगात त्याला बंदिस्त करण्यात आलेलं होतं.

तो त्या तिहार जेलमध्ये आपल्या गोड बोलण्याने पोलीस, कैदी सगळ्यांचाच प्रचंड लाडका बनला होता. त्याची किस्से सांगायची स्टाईल खुद्द जेलरला देखील आवडायची. म्हणूनच त्याला खास ट्रिटमेंट मिळायची.

त्याने वाढदिवसाची मिठाई सगळ्यांना वाटली, ते खाऊन एकामागोमाग एक सगळे सुरक्षारक्षक बेशुद्द होऊन पडले. त्यातीलच एका सुरक्षारक्षकाला त्याने पोलीस गाडीत बसवले, त्याचा एक हात बाहेर काढला.

जे शुद्धीत होते त्यांना वाटले की चार्ल्सला दुसऱ्या जेल मध्ये नेत आहेत.

आणि इकडे चार्ल्स आपल्या इंग्लिश साथीदाराबरोबर जेल फोडून पळाला होता. तिहार म्हणजे भारतातला सर्वात कठोर जेल समजला जातो, तो फोडणे म्हणजे मोठी घटना होती. चार्ल्स शोभराजने सहाव्यांदा

फक्त भारतातच नाही तर जगातल्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन होती की चार्ल्स शोभराज पळाला.

या घटनेनंतर आठच दिवसांत मधुकर झेंडे या मराठी पोलीस अधिकाऱ्याने सापळा रचून चतुराईने शोभाराजला  गोव्यात अटक करण्यात यश मिळवलं.

शोभाराजने तुरुंगाधिकारी-कर्मचाऱ्यांशी कसं संगनमत साधलं होत; तुरुंगात कसा एशोआराम उपभोगला; अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ‘बडा-खाना’ आयोजित करून आणि नशेच औषध देऊन फरार होण्यात कसं यश मिळवलं, याबद्दलच्या अनेक रम्य कहाण्या त्या आठ दिवसांत वृत्तपत्रांतून, नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्या

आणि संपूर्ण देश त्याच्या पुनःअटकेपर्यंत ‘शोभाराजमय’ झाला.

या निमित्ताने शोभाराजचं पूर्ण जीवनच कसं कृष्णकृत्यांनी भरलेलं आणि दंतकथामय होतं ते पुढे आलं. अनेकदा त्याला शिक्षा झाली होती; पण चतुराई आणि बिलंदरपणाच्या बळावर तो अनेकदा तुरुंगामधून फरारही झाला होता आणि त्याची गुन्हेगारी कृत्यं सुरूच राहिलेली होती.

बिलंदर ‘शरीफ’ बदमाष  व नाट्यमय ‘जेल-ब्रेक’

मूळचा फ्रेंच नागरिक असलेल्या शोभाराजची आई व्हिएतनामी आणि वडील भारतीय होते. १९६०च्या दशकात त्याने गुन्हेगारी जीवनाला सुरुवात केली. अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व, बिलंदरपणा व उच्च जीवनशैली या बळावर तो कुणावरही छाप टाकण्यात यशस्वी होत असे.

याच बळावर तो पॅरिसमधील उच्चभ्रूंच्या वर्तुळात प्रतिष्ठित नागरिकाचा मुखवटा पांघरून सामील झाला. तिथे अनेक फसवणुकीचे प्रकार केल्याचे आरोप त्याच्यावर होते. या घोटाळ्यासंदर्भात पोलीस त्याच्या मागे लागल्यावर तो बायकोसह खोट्या कागदपत्रांच्या आधारे १९७० मध्ये मुंबईत दाखल झाला.

भारतात आल्यावर त्याने स्मगलिंग व गॅम्बलिंगच्या व्यायसायात जम बसवला. १९७३ मध्ये एका हॉटेलवरील सशस्त्र दरोड्याच्या प्रकरणात त्याला अटक झाली, पण अटकेत असताना आजारी पडल्याचा बहाणा करून त्याने पलायन केले. मात्र लगेचच त्याला पुन्हा अटक केली गेली. जामिनावर सुटका झाल्यावर चोरलेल्या पासपोर्टच्या बळावर तो अफगाणिस्तान, इराण व नंतर पूर्व युरोप आणि मध्य आशियात गेला.

तिथेही देशी-परदेशी पर्यटकांची लुबाडणूक करण्याचे प्रकार केले. पुढे त्याला अथेन्समध्ये अटक झाली.

अथेन्समधून पळाल्यावर तो भारतात परतला. परतल्यानंतर त्याने विशेषतः स्त्रियांचं खून सत्र सुरु केलं. स्त्रियाच लक्ष्य असल्याने ‘बिकिनी किलर’ असं त्याचं वर्णन केलं जाऊ लागलं.

स्त्रियांना विष देऊन, बुडवून, पेटवून खून करण्याचा त्याने धडाका लावला.

१९७६ मध्ये १२ खुणांच्या आरोपाखाली त्याला शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्याची रवानगी तिहार तुरुंगात केली गेली. पुढे जेव्हा हे ‘जेल ब्रेक’ प्रकरण होऊन इन्स्पेक्टर मधुकर झेंडेंनी त्याला पकडलं. तेव्हा त्याला पुन्हा दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा भोगून झाल्यानंतर १७ फेब्रुवारी १९९७ रोजी त्याची सुट्का झाली. त्यानंतर तो फ्रान्सला रवाना झाला.

फ्रान्समध्ये त्याने पुन्हा एकदा ग्लॅमरच्या जगात प्रवेश केला.

नंतर त्याच्या जीवनावर अनेक पुस्तकं निघाली आणि एक चित्रपटही निघाला. त्याबदल्यात त्याला सुमारे दीड कोटी डॉलर रॉयल्टी मिळाल्याचं म्हटलं जातं. अशा रीतीने फ्रान्समध्ये तो मजेत जगत असताना तो जेव्हा नेपाळमध्ये गेला तेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं. पूर्वी केलेल्या गुन्ह्यांबद्दल त्याच्यावर खटला चालवला गेला आणि २० सप्टेंबर २००४ रोजी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

आताच कंडीशन म्हणाल तर चार्ल्स शोभराजची सगळी मस्ती उतरली आहे. वेगवेगळ्या जेल मध्ये वेगवेगळ्या पोलिसांचा मार खाऊन त्याच्यातला बिकिनी किलर संपून गेलाय. मध्यंतरी त्याने लग्न देखील केलं. सध्या त्याला हार्टचा वगैरे प्रोब्लेम सुरु आहे.

बाकी त्याच्या बद्दलची उत्सुकता कमी होत नाही. त्याच्यावर अनेक पिक्चर निघाले, अनेक सिरीयल आल्या, अजूनही वेब्सिरीज येत आहेत. बिकिनी किलरची उत्सुकता कमी होत नाही.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.