अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं मोनिका लेविन्सकी प्रकरण कसं बाहेर आलं ?

जगात अनेक मॅटर होत असतात. पारावर बसून प्रत्येक लफड्याचा हिशोब होत असतो. पण एक मॅटर एवढं मोठं होतं ज्याची चर्चा वॉशिंग्टन ते वडगावबुद्रुक सगळी कडे झाली. सरकारे हादरली, तिसरं महायुद्ध होता होता राहिलं ,अमेरिकेच्या  राष्ट्राध्यक्षाला राजीनामा द्यावा लागला असता. काय झालं काय विचारता?

लडकी का चक्कर बाबू भैया लडकी का चक्कर

अमेरिकेच्या राष्ट्रपतीला वेड लावणाऱ्या मुलीच नाव मोनिका लेविन्सकी.

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात लॉस एंजलिस गावात मोनिका बाई वाढल्या. लॉस  एंजलिस  म्हणजे सुप्रसिद्ध हॉलिवूडच शहर. वडील तिथले मोठे डॉक्टर तर आई लेखिका. अतिशय श्रीमंत कुटूंब. मोनिका तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आली.

अमेरिकेतले सर्वात फेमस सेलिब्रिटी जिथे राहतात त्या बेव्हरली हिल्स परिसरात तिचं  बालपण गेलं. फिल्मस्टारच्या मुलामुलींच्या हायफाय शाळेत ती शिकली. जात्याच हुशार होती. दिसायला देखणी होती.

पण ती अवघी चौदा -पंधरा वर्षाची असताना तिच्या आईवडिलांचा डिव्होर्स झाला. त्यांनी वेगळी लग्ने केली. याचा वाढत्या वयाच्या मोनिकावर मोठा मानसिक परिणाम झाला.अगदी लहानपणा पासून बंडखोरपणा तिच्यात निर्माण झाला.

मोनिकाला लहानपणी सिनेमात जायचं होतं . त्यामुळे तिला ड्रामा स्कुल मध्ये घातलं होतं  पण तिथल्या इंस्ट्रक्ट्ररबरोबर अफेअर झालं आणि त्यात झालेल्या ब्रेकअप नंतर मोनिकाने actingला रामराम ठोकला आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, सायकॉलॉजीमध्ये डिग्री घेतली.

मोनिकाचे नवे सावत्र वडील पीटर स्ट्रॉस हे मीडिया प्रोप्रायटर होते. एकेकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या सोबत काम केलं असल्यामुळे त्यांच राजकीय वर्तुळात वजन होतं . असेच अनेक लागे बांधे वापरून मोनिकाने अमेरिकेच्या सुप्रसिद्ध व्हाईट  हाऊस  या राष्ट्राध्यक्षांच्या निवास स्थानात इंटर्न शिप मिळवली.

ते साल होता १९९५. तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते बिल क्लिंटन.

डेमोक्रॅटिक पक्षाचे बिल क्लिंटन तरुण होते, तुफान पॉप्युलर होते. त्यांची मिस्टर क्लीन अशी इमेज होती. अभ्यासू, सुसंस्कृत, तडफदार राष्ट्रपती आपल्याला लाभला याचा अमेरिकन लोकांना अभिमान होता. त्याच्या सौ.हिलरी क्लिंटन देखील आपल्या समाजकार्या मुळे  देशवासीयांच्या लाडक्या होत्या.

पण आतली गोष्ट अशी की  बिल क्लिंटन यांच्या पॅंटचा नाडा ढिला होता. त्यांनी अनेकदा यापूर्वी आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलींचा गैरफायदा घेतला होता पण ते प्रकरण कधी समोर आलं नव्हतं. बिल भाऊ याच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होते.

अशातच अवघ्या वीस -बावीस वर्षांची मोनिका व्हाईट हाऊसला जॉईन झाली.

बिल क्लिंटनने आपल्या फ्लर्टी स्वभावानुसार हे पाखरू बरोबर हेरलं. मोनिका व्हाईट हाऊसमध्ये बिल क्लिंटन यांच्या ओव्हल ऑफिस मध्ये काम करत होती. तिथे दोघांचे प्रेम प्रकरण शिजले. जवळपास वयाने वीस वर्षे मोठ्या असलेल्या बिल क्लिंटन यांनी तिला आपल्या जाळ्यात ओढलं होतं .

हे असच वर्षभर चालत राहिलं. अमेरिकेच्या संरक्षणदलाचे हेड ऑफिस असलेल्या पेंटागॉनला काही तरी शंका आली आणि मोनिकाची ट्रान्सफर करण्यात आली. पेंटागॉन मध्ये काम करत असताना मोनिकाने आपली एक सहकारी लिंडा ट्रिप हिच्याशी चांगली मैत्री झाली.

भोळ्या मोनिका लेविन्स्कीने व्हाईट हाऊस मधल्या गंमती जंमती सांगता सांगता आपल्या खाजगी गोष्टी सुद्धा सांगून टाकल्या. यात राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन देखील आपल्या मागे कसे वेडे आहेत त्याच आपल्या सोबत कसे शरीर संबंध आहेत हे सांगितलं.

लिंडा ट्रिपने गोड बोलून तिच्याकडून सगळी माहिती काढून घेतली, वर तिला सांगितलं की  स्वतःच्या सिक्युरिटी साठी काही तरी पुरावे गोळा करून ठेव.

मोनिकाने तिच्या सांगण्या अनुसार बिल क्लिंटन यांनी दिलेलं गिफ्ट, त्यांच्या सोबत नाजूक प्रसंगी घातलेले कपडे वगैरे न धुता तसेच ठेवले ज्याचा वापर पुढे डीएनए टेस्टिंग साठी झाला. चाप्टर लिंडा ट्रिपने मोनिका सोबत बोलतानाचे टेलिफोन रेकॉर्ड सुद्धा जपून ठेवले. लिंडाने हि माहिती आपल्या काही मैत्रिणींना सांगितली.

याच दरम्यान बिल क्लिंटन गव्हर्नर असताना पॉला जोन्स या मुलीची छेड काढली होती या बद्दल केस सुरु झाली. अमेरिकेत खळबळ उडाली मात्र बिल क्लिंटन पुराव्या अभावी सहज सुटतील अशीच शक्यता होती. अनेकांना तर हे आपल्या  राष्ट्राध्यक्षाच्या विरोधातले षडयंत्र आहे असे वाटले.

अशातच २१ जानेवारी १९९८ रोजी अमेरिकेच्या एका वर्तमानपत्रात मोनिका लेविन्सकी प्रकरण फोडले.

लिंडा ट्रिपने मॅटर बाहेर काढला होता. हा मात्र अख्ख्या अमेरिकेसाठी धक्का होता. मोनिकाने मात्र आपला शरीर संबंध आल्याचा इन्कार केला.  बिल क्लिंटन  यांनी तर टीव्हीवर दमदार भाषण ठोकत सांगितलं कि,

“मी आयुष्यात एकदाही खोटं बोललो नाही आणि संपूर्ण देशाला मला विश्वास द्यायचा आहे कि माझा मिस लेव्हीन्स्की यांच्याशी कसलाही संबंध आलेला नाही.”

बिल क्लिंटन यांनी शपथपूर्वक हे विधान केलं पण पुढच्या काहीच महिन्यात सगळ्या गोष्टी गंडत गेल्या. हिलरी क्लिंटन यांच्या भावाची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली. बिल क्लिंटन सगळ्या साईडने अडकतच गेले.

हि घटना घडली तोपर्यंत बिल क्लिंटन दुसऱ्यांदा निवडणूक जिंकून राष्ट्राध्यक्ष बनले होते. त्यांची लोकप्रियता एवढी होती कि मोनिका लेविन्सकीला आपल्या आईच्या घरात लपून बसावं लागलं होत.

पुढे मोनिकाने सगळे पुरावे सादर केले ज्यात हे सांगितलं होतं की बिल क्लिंटन यांनी आपल्या राष्ट्राध्यक्ष असण्याचा फायदा उठवून तिच्याशी अनैतिक नाते जोडले, तिच्याशी शरीर संबन्ध प्रस्थापित केला नाही मात्र काही ओरल सेक्स सारख्या गोष्टी करायला भाग पाडल्या.

हा प्रकार तब्ब्ल ९ वेळा झाला या पैकी काही वेळा तर थेट राष्ट्राध्यक्षांच्या केबिनमध्ये देखील हि घटना झाली होती.

याचा परिणाम असा झाला कि अमेरिकेच्या पार्लमेंट मध्ये बिल क्लिंटन यांच्या विरुद्ध महाभियोग चालवलं गेलं. राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना आपली चूक मान्य करावी लागली. त्यांचं म्हणणं होत की

देश चालवण्याच प्रेशर माझ्यावर होत. कामाच्या दबावामध्ये माझ्या कडून चुका होत गेल्या. मी मोहात पडलो.

बिल क्लिंटन यांनी आपल्या बायको ला देखील जे घडलं ते सांगितलं. तिची माफी मागितली. संपूर्ण देशाची माफी मागितली. २१ दिवस चाललेल्या महाभियोगानंतर बिल क्लिंटन यांची सुटका करण्यात आली. बिल क्लिंटन याना राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यकाळ पूर्ण करता आला मात्र तिथून पुढे कधी ताठ मानेने त्यांना जगता आले नाही.

मोनिका लेविन्सकी मात्र या निम्मिताने हिरो झाली. तिच्या आयुष्यावर पुस्तके निघाली. स्वतःवरील अन्यायाला वाचा फोडणारी स्त्री मुक्तीच्या आंदोलनाचा चेहरा म्हणून तिला ओळखलं जाऊ लागलं. मोनिका टीव्ही चॅनलच्या चॅट शो मध्ये येऊ लागली. कमर्शियल ऍडव्हर्टाइजमध्ये तिचा चेहरा झळकू लागला.

थोडक्यात काय तर मोनिका लेविन्सकी अमेरिकेत सेलिब्रिटी बनली होती.

जवळपास ५ वर्षे मोनिका अमेरिकेत लाईमलाईटमध्ये राहिली. अनेक टीव्ही शो केले, रियालिटी शो केले. अखेर या सगळ्याचा उबग येऊन ती थेट इंग्लंडला गेली. तिथे तिने सायकोलॉजीमध्ये  मास्टर्स केलं. आजही मोनिकाला अमेरिकेत सेलिब्रिटीचाच दर्जा आहे.

हिलरी क्लिंटन या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी  मोनिकाच्या नावाचा प्रचारात बराच वापर करण्यात आला.

त्यांना हरवणारे डोनाल्ड ट्रम्प आता राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्या बद्दल म्हणतात की  हा अमेरिकेचा आजवरचा मनमौजी राष्ट्रपती आहे, कधीही काहीही बेधडक बोलणे, वागणे हि त्यांची खासियत आहे मात्र एक गोष्ट खरी की बिल क्लिंटन यांनी घातलेल्या घोळा एवढा फालतू पणा अजून तरी ट्रम्प तात्यांनी केला नाही एवढं नक्की .

हे हि वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.