अस आहे बिल गेट्स च सोलापूर कनेक्शन…. 

बिल गेट्स जगातला सर्वात श्रीमंत माणूस. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्वेसर्वा आणि जगातील सर्वात दानशूर व्यक्तींपैकी एक. बिल गेट्स आणि त्यांच्या श्रीमंतीचे अनेक किस्से तुम्ही आजवर ऐकले असतील.

पण आज एक वेगळी गोष्ट सांगणार आहोत. ती म्हणजे बिल गेट्स यांच सोलापूर कनेक्शन. 

आत्ता तुम्ही म्हणालं, भिडू लोक येडे झाले की काय. सकाळ सकाळी काही वाट्टेल ते काय सांगताय. तो बिल्या कशाला मरायला येतोय सोलापूरात. पण किस्साच देखील या मरायच्या विषयावरच आधारलेला आहे.

तर झालं अस की सोलापूरच्या नेटिव्ह ख्रिश्चन स्मशानभूमी ट्र्स्टने असा दावा केलाय आहे की, बिल गेट्स यांचे पणजोबा म्हणजे सॅम्युअल गेट्स हे ब्रिटीशांच्या काळात मिशनरी म्हणून भारतात आलेले. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी धर्मप्रचाराच काम करत असताना ते सोलापूरात आले. सोलापूरातच ते रमले आणि धर्मप्रचाराच काम करू लागले. यानी याच काळात त्यांचा सोलापूरात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर सोलापूरात त्यांना दफन करण्यात आलं. मोदी स्मशानभूमी लगत असणाऱ्या ख्रिश्चन स्मशानभूमीमध्ये त्यांना दफन करण्यात आलं असल्याचा दावा देखील या ट्रस्टच्या वतीने करण्यात आला असल्याच सांगण्यात येत आहे. 

आत्ता कसलेल्या हेळव्यांप्रमाणे बिल गेट्सची वंशावळ आपण अभ्यासू.

तर बिल गेट्स यांचा जन्म अमेरिकेच्या सिएटल इथला. त्यांच्या वडिलांच नाव विल्यम्स एच. गेट्स तर त्यांच्या आजोबांच नाव जे. डब्लू. मॅक्सवेल आणि पणजोबांच नाव रेव्ह. लॉरिन सॅम्युअर गेटसम. 

बिल गेट्स यांचे वडिल वकिल होते तर आजोबा एका राष्ट्रीय बॅंकेचे अध्यक्ष होते. आणि पणजोबा काय करायचे तर ते मिशनरी म्हणून कार्य करायचे. भारतात ब्रिटीशांची सत्ता होती त्या काळात म्हणजे २० व्या शतकाच्या सुरवातीच्या काळात ते भारतात आले होते. सोलापूरात असणाऱ्या लेप्रसी कॉलनी येथे त्यांनी चर्च उभा केलं. त्या चर्चच नाव गेट्स चर्च अर्थात ते चर्च त्यांच्याच म्हणजे बिल गेट्स यांच्या आजोबांच्या नावानेच ओळखले जाते. 

मिशनरीच्या कामांसंदर्भात त्यांनी या परिसरात जागा घेतल्याचं सांगण्यात येतं. ते विजापूर इथे असताना एका दंगलीत त्यांचा खून झाला. हि तारिख होती ७ सप्टेंबर १९२२. त्या वेळी गेट्स पणजोबांच वय होतं ७७ वर्ष.  खून झाल्यानंतर त्यांच शव सोलापूरात आणण्यात आलं. शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच दफन सोलापूरातील ख्रिश्चन स्मशानभूमीत करण्यात आलं. 

आत्ता यामागची गंमत अशी की हा दावा करण्यात येतोय त्यासाठी पणजोबा सॅम्युअल गेट्स यांच्याबद्दल ठोस माहिती ट्रस्टकडे आहे. पण ते बिल गेट्स यांचेच पणजोबा असावेत का ? याबद्दलचा आधार म्हणजे बिल गेट्स यांचे पणजोबा भारतात होते हि माहीती आणि भारतात फक्त एकच गेट्स होते ते देखील सोलापूरात हि माहिती. त्यापलिकडचा आधार खुद्द बिल गेट्स यांनाच माहिती. सध्या बिल गेट्स सोबत मेलव्यवहार करुन अधिक माहिती घेण्याच काम ट्रस्ट करत आहे.  

संदर्भ : पुढारी सोलापूर. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.