‘भारत मला भविष्यकाळासाठी आशा देतो’ बिल गेट्स यांच्या या वक्तव्यामागे कारणं आहेत…

बिल गेट्स हा जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेला व्यक्ती. त्यानं त्याच्या ब्लॉगमध्ये म्हटलंय की, ‘इंडिया गिव्ज मी होप फॉर द फ्यूचर’. भारत मला भविष्यकाळासाठी आशा देतो. आता त्यानं असं का म्हटलंय? याचं कारणही स्वत: बिल गेट्सने त्याच ब्लॉगमध्ये स्पष्ट केलंय. भारतानं आजवर केलेली प्रगती आणि मुख्यत: भारताने संकंटांवर कश्याप्रकारे मात केलीये याबाबत लिहीत त्यांनी असं लिहीलंय.

संपुर्ण जगानेच हवामानातलं बदल आणि गरिबी यांसारख्या विषयांवर काम केलं पाहिजे असं त्यांचं मत असल्याचं त्यांनी या ब्लॉगमध्ये म्हटलंय.

त्या ब्लॉगमध्ये पुढे त्यांनी म्हटलंय,

“भारत हा एक देश म्हणून मला भविष्यकाळासाठी प्रचंड आशा देतो. म्हणजे, भारतासारखा देश जिथे इतकी जास्त लोकसंख्या आहे, त्या देशात कोणतीही समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करावं लागतं. सामुहिक पातळीवर काम करावं लागतं. असं असतानाही देशानं आजवर अनेक समस्यांवर मात केलीये. पोलियोवर नियंत्रण मिळवणं, एचआयव्हीच्या प्रसारावर नियंत्रण आणणं या सगळ्या बाबतीत भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गरिबीवर नियंत्रण आणलंय, भृणहत्याही कमी झाल्यात.”

भारत हा नावीन्य आणि संशोधनाला प्रोत्साहन देणारा देश आहे असंही त्यांनी लिहीलंय. यासंदर्भात पुढे त्यांनी लिहीलंय, रोटाव्हायरस हा असा व्हायरस आहे की, ज्यामुळे डायरीया सारखे धोकादायक रोग होतात. त्या व्हायरसची लस खूप महाग होती तेव्हा भारताने ती स्वत: बनवण्याचं ठरवलं.
त्यांनी भारताचं कौतूक करत असतानाच त्यासंदर्भात साजेशी उदाहरणंही दिलीत.

हवामान बदलाच्या बाबतीत भारत हा जगातल्या देशांच्या तुलनेत आघाडीवर आहे हे खरं असलं तरी, आरोग्याच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती ही मोठी आहे. त्यामुळे भारतीयांना या बदलत्या हवामानाशी कसं जुळवून घ्यायचं हे सहज लक्षात येईल असं लिहीलंय.

भारताच्या विकासाचा वेग, मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबविण्याचे कौशल्य आणि तेथील लोकांचं नाविन्यपूर्ण बौद्धिक क्षमता याचा अर्थ असा आहे की भारत आजच्या सर्वात मोठ्या आव्हानांवर प्रगती करण्याचा प्रमुख भाग बनू शकतो. असं लिहीत बिल गेट्स यांनी जागतिक पातळीवर भारत आजच्या घडीला नेतृत्व करू शकतो असंही अप्रत्यक्षपणे म्हटलंय.

जगातल्या इतर सर्व देशांप्रमाणेच भारताकडेही मर्यादित संसाधनंच आहेत. परंतू, भारत त्या मर्यादित संसाधनांमध्येही ज्याप्रकारे प्रगती करतोय त्यामुळे तो जगाला दाखवून देतोय की, मर्यादित संसाधनांमध्ये प्रगती कशी केली जाऊ शकते.

एकंदरीत बिल गेट्स यांच्या या ब्लॉगकडे पाहिलं तर, त्यांनी भारताने आजवर संकटांवर केलेली मात, इथल्या नागरिकांची संशोधन वृत्ती, संशोधनाला दिलं जाणारं प्रोत्साहन आणि मर्यादित संसाधनांमध्ये काम करण्याची तयारी या सगळ्या कारणांमुळे भारताला ‘भविष्यकाळासाठीची आशा’ असं संबोधलंय.

तर, पुढल्या आठवड्यात बिल गेट्स हे भारतात येणार आहेत असंही त्यांनी म्हटलंय. गेट्स फाऊंडेशन या त्यांच्या संस्थेचं काम कसं सुरू आहे हे पाहण्यासाठी ते येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यांनी लिहीलंय की, भारतात कचऱ्यातून जैवइंधीन आणि खतं कशी बनवता येतील यावर एक टीम काम करतेय तर दुसरी टीम नागरिकांना वाढत्या तापमानाशी जुळवून घेत यावं यासाठी काय करता येईल हे पाहतेय.

तर, दुसरीकडे कोरोना महामारी आल्यापासून ते भारतात आले नव्हते त्यामुळं, भारतात तेव्हापासून किती प्रगती झाली आहे, किती बदल झालेत हे पाहण्यासाठीसुद्धा ते उत्सूक आहेत असंही त्यांनी या ब्लॉगमध्ये म्हटलंय.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.