मास्कच्या कचऱ्यापासून विटा बनवणाऱ्या या भिडूला पद्मश्रीसुद्धा मिळालाय
जगात दररोज वाढणारा कचरा आणि त्या कचऱ्याची लावावी लागणारी विल्हेवाट हे प्रश्न आजही कायम आहेत. त्यावर उपाय काय, अजून कुठली टेक्नॉलॉजी वापरून या प्रकरणाचा बंदोबस्त करता येईल या विचारात प्रशासन असतं, पण आज ज्याचा किस्सा आपण जाणून घेणार आहोत त्या भिडूने रिसायकलिंगचा फंडा वापरून या प्रश्नाला कायमचं बंद केलं आहे. तर जाणून घेऊया या गुजराती भिडुची यशोगाथा.
जगभरातले अनेक शहर हे बायोमेडिकल आणि सामान्य कचऱ्याच्या प्रोब्लेममुळे त्रस्त आहे. यावर एकच उपाय तो म्हणजे रिसायकलिंग. पण त्याला आत्ताच्या परिस्थितीमध्ये अमलात आणून आणि हा प्रयोग जास्त काळ कसा चालेल यावर तोडगा काढलाय तो आंत्रप्रेन्योर आणि इनोव्हेटर असलेल्या डॉ. बिनीश देसाई यांनी आपल्या इको इलेकट्रीक या कंपनीच्या माध्यमातून. आताच्या करोनाच्या काळात त्यांच्या कंपनीने पीपीई किट्स आणि मास्क यांची रिसायकलिंग करून त्यापासून विटा बनवल्या होत्या.
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी बिनीश देसाई यांनी वेस्ट मॅनेजमेंट लॅब सुरु केली होती आणि आज २८ वर्षाचे असताना त्यांची ओळख हि रिसायकलमॅन ऑफ इंडिया अशी झाली आहे. २०१८ च्या ३० अंडर ३० च्या लिस्टमध्ये बिनीश देसाई यांचं नाव होतं. भारत सरकारने पदमश्री देऊन त्यांचा सन्मान केला आणि अनेक आंतरराष्ट्रीय अवॉर्डसुद्धा त्यांना मिळाले.
या सगळ्या प्रकरणाची सुरवात कशी झाली त्याकडे एक नजर टाकूया. वय वर्षे ११ असताना वर्गात एकदा त्यांनी च्युईंगम खाल्लं आणि कागदात गुंडाळून ते खिशात तसंच ठेवून दिलं. दोन तीन दिवसानंतर जेव्हा बिनीश यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याचा दगडासारखा आकार झालेला बघितला. यावरून त्यांना ऍडव्हान्स विटा बनवण्याची आयडिया आली. यावर काम करत असताना त्यांनी २०१० साली इको इलेकट्रीक टेक्नॉलॉजी सुरु केली.
पेपर मिलचं वेस्टेज मटेरियल वापरून त्यांनी पी ब्लॉक विटा बनवायला सुरवात केली. मागच्या वर्षी बिनीश यांनी २.० विटा बनवायला सुरवात केली होती. या विटा उत्तम तर होत्याच शिवाय यात वाया गेलेले कागद आणि बाईंडर यांच्या सोबत वापरून झालेली पीपीई किट आणि मास्क यांची रिसायकलिंग होऊ लागली. प्रत्येक राउंडवेळी या गोष्टी सॅनिटाईज केल्या जातात.
हि कंपनी मुख्यता सामाजिक तत्वावर आणि उत्पादनावर बनलेली आहे आणि आता तिला जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळत आहे. गुजरातचे राहणारे असलेले बिनीश देसाई सांगतात कि कुठलीही गोष्ट हि वाया जाणारी नसते. तुमच्याकडे निरीक्षण, अपयश त्यातून मिळालेला बोध आणि समाधान असेल तर जगात तुम्ही सगळं काही करू शकतात.
सुरवातीला कुटुंबाकडून या गोष्टीला सपोर्ट मिळाला नाही म्हणून बिनीश देसाई नाराज झाले नाही त्यांनी आपल्या पॉकेटमनीमधून फर्म सुरु केलं. एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स आणि सोबतच एन्व्हायर्नमेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये पीएचडी इतकं उच्च शिक्षण बिनीश यांचं झालं आहे. शोध कार्यासाठी जेव्हा त्यांनी सरकारी अनुदान मिळवलं तेव्हा अनेक लोकं बिनीश यांच्या मदतीला आले.
आजवर १०४ इंडस्ट्रियल वेस्टची माहिती घेऊन आणि त्याची रिसायकलिंग करून त्यापासून १९३ पर्यावरणपूरक स्वस्त प्रॉडक्टची निर्मिती केली आहे. भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात ते कायम आघाडीवर असतात. बिनीश देसाई यांच्या कंपनीत बनलेल्या विटांचा उपयोग भारताच्या ग्रामीण भागात केला जात आहे. २००३ मॅट्रिक टन कचरा बिनीश सिंग यांनी रिसायकलिंग केलेला आहे. भविष्यातील योजना म्हणजे रिसायकलिंग मधून बनलेल्या प्रोडक्टने ते थ्रीडी स्वस्तातलं घर बनवणार आहे.
डॉ.बिनीश देसाई यांची इलेकट्रीक इको कंपनी आज या कचऱ्याला रिसायकल करून त्याला पुन्हा वापरात आणत आहे हि खूप महत्वाची गोष्ट आहे.
हे हि वाच भिडू :
- नागपूरचा भिडू तुमच्या घरातल्या कचऱ्याला देखील बक्कळ पैसे देतो…
- आता वापरलेल्या मास्कपासून बनणार डबल लेनचा रस्ता
- आईचं लाडकं ‘टपरवेअर’ फेमस होण्यामागे देखील बायकांची किटी पार्टी होती..
- महिला आणि पुरुष हॉकी टीमच्या यशामागे ओडिसा सरकारचा देखील मोठा वाटा आहे…