आमच्या ज्ञानात भर टाकण्यात बिपाशाने बराच ‘हातभार’ लावला होता.

आमच्या शाळेत बॉलीभाई होता म्हणजे त्याच नाव बॉलीभाई नव्हतं पण त्याच्या सगळ्या बॉलीवूड बातम्याच्या खजान्यामुळे आम्ही त्याला त्या नावाने हाक मारायचो.

तर झालं असं तर आम्ही तेव्हा वयात आलो होतो.  पुस्तकांच्या अभ्यासामधून आमच्या ज्ञानात वाढ होत होतीच शिवाय इंटरनेट कॅफे वगैरे मदतीला उगवले होते . तर बॉलीभाईने आम्हाला एक नवीन पिक्चर बघायला नेलं. नाव होत अजनबी.

अजनबीचे डायरेक्टर होते अब्बास-मस्तान. बॉली म्हणाला पिक्चर फुल्ल सस्पेन्स असणार.

त्यात बॉबी देओल होता.अक्षय कुमार, करीना कपूर यांच्या बरोबर बॉबी देओलला खपवून घेऊ असा विचार करून आम्ही सिनेमाला आलो होतो. पिक्चर सुरु झाला.अगदी दहा मिनिटात बॉबीने करीनाला पटवली, लग्न केलं आणि दोघे गाण म्हणत हनिमून ला पण गेले. दोघे लग्नानंतर स्विझर्लंडला सेटल झाले. आम्ही म्ह्टल सगळ सस्पेन्स तर संपल.

पडद्यावर बॉबी मस्त गाण गुणगुणत ऐपतीपेक्षा भारी कार हाणत स्विझर्लंड मध्ये फिरत असतो तेव्हा त्याच्या गाडीसमोर एक हॉट मुलगी सायकलवरून आडवी येते. बॉब्याला ब्रेक मारायला लागल्यामुळे ते चिडत आणि हिंदी मध्ये शिव्या द्यायला लागत. पोरगी गोड हसून निघून जाते.

आम्हाला वाटलं कि स्विस लोकांना बॉबीची हिंदी समजते हा सस्पेन्स असेल. पण खरा सस्पेन्स पुढ होता.

आपला बॉबी हळूच शेजारच्या घरात डोकावून बघत असतय. तेव्हा तिथं मगाशीचीच हॉट ललना पियानो वाजवत असते. वाजवते म्हणजे काय त्याच्यावर सेक्सी पद्धतीने लोळत आपले पियानो वादन कौशल्याचं प्रदर्शन करत असते. बघून आमच्या दांड्या उडाल्या . बॉब्याच्या पण उडालेल्याच असणारेत.

खरा सस्पेन्स हळूच त्याच्या मागन येतो. अक्षय कुमार. बॉबीला विचारतो क्या देख रहे हो? आम्हाला वाटलं आता हे धर्मेंद्रच नालायक पोरग रंगेहाथ सापडल्यामुळ कुत्र्यासारख मार खातय. पण काहीच नाही ओ. दोघे एकदम हसत हसत एकमेकांची आपापल्या वैयक्तिक बायकांची ओळख करून घेतात. सगळ निवांत.

आम्ही थेटरमध्ये बॉलीला अंधारात हळूच विचारलं कोण रे ही? बॉलीभाई म्हणाला “बिशाप्पा बासू” नंतर कळाल खर नावं बिपाशा बसू.

पूर्ण पिक्चरने मस्त आमच्या माहितीत वाढ करून दिली. वाइफ स्वॅपिंग म्हणजेच बायकोची एका रात्रीसाठी अदलाबदल. नुकताच येणारी आमच्या मिशी मध्ये जाळ झाला.

MV5BMjEzOTkzNDM0Nl5BMl5BanBnXkFtZTgwMzI0NjgwNjE@. V1

बाकी सिनेमाचं सस्पेन्स आम्ही काय सांगत बसत नाही. ते काय तर अक्षय कुमार १०० मिलियन डॉलरचा बँकेला गंडा घालतो. बॉबीला आपल्या बायकोच्या खुनाच्या आरोपात अडकवतो. “EVERYTHING IS PLANNED” काय नी काय. तुम्ही काय बघितला असेलच. मेहबूबा मेहबूबा गाण सगळयांना पाठच होत की.

पिक्चर मधलं सगळ्यात भारी सस्पेन्स बिपाशाच होती. बॉब्या काय उगच तिला कपडे बदलताना बघत नव्हता. बिपाशाने या पिक्चरसाठी फिल्मफेअरपण मिळवला.

बिपाशा एक सुपर मॉडेलिंगची स्पर्धा जिंकून इंडस्ट्रीमध्ये आली होती. कोणच गॉडफादर पाठीशी नाही तरी पोरगीन आल्या आल्या हवा केली. खर तर ती म्हणे अभिषेकबरोबर रिफ्युजीमधून डेब्यू करणार होती. पण तिच्या जागी करीना आली. दोघींची रायव्हलरी इथूनच सुरु झाली असावी.

अजनबी मध्ये करीना बिचारी तिच्यापुढे सती सावित्री दिसली. बिपाशाचा पुढचा सिनेमा आला राझ. पहिल्या शोला शाळा चुकवून आम्ही हजर झालो. हॉरर सिनेमाम्हणून बघतानाच फाटली पण पूर्ण पिक्चर भर असलेल्या सिन्सचा भरमार असल्यामुळे पिक्चर सुसह्य झाला. गाणी तर जबरदस्तच होती.

आज पण नांगर मारणाऱ्या ट्रॅक्टरवर हीच गाणी वाजतात. ‘ये शहर है आमन का’, ‘जो भी कस्मे खायी थी हमने असो’ किंवा ‘आपके प्यार में हम संवरणे लगे’ सगळ्यांच्या तोंडात राझची गाणी आणि मनात सावळी बिपाशा होती.

त्यानंतर आला जिस्म.’ जादू है नशा है मदहोशीयां ‘.

टीव्हीवर म्युजिक चॅनलवर आज पण हे गाण लागलं तर आम्ही सवयीन रिमोट हातात घट्ट पकडून बसतो. बिपाशाचा आमच्या तारुण्यात पदार्पण करण्यात बराच हातभार होता. प्रत्येक पिक्चर बरोबर आपला बॉयफ्रेंड बदलणारी बिपाशा या पिक्चरपासून जॉन अब्राहमवर सेटल झाली.

vlcsnap 2011 07 10 13h27m11s3

कपूर घराण्याची राजकुमारी असलेली करीना आणि तिच्यात भांडणे टोकाला जाऊन पोहचली. एका चॅनलने चवीन चर्चा केली की दोघींच्यात हाणामारी झाली आहे. काळी बिल्ली विरुद्ध सफेद बिल्ली असे मथळे देऊन गॉसिप गंगा वाहू लागली. कॉफी विथ करणमध्ये दोघींनी एकमेकावर तोंडसुख घेतलं.

मोठ्या पडद्यावर मात्र करीनाने बिपाशाला मागे टाकले. बिपाशा अंगप्रदर्शनाच्या भूमिकेत टाईपकास्ट झाली. करीना बिग बजेट सिनेमामध्ये काम करत खूप पुढे निघून गेली. बिपाशाने सुद्धा नो एंट्री, धूम२, रेस सारख्या सिनेमामध्ये काम केलं पण तिच्या वाटेला कमी महत्वाचे रोल येत राहिले. काही वर्षांनी ती आयटम सॉंगपुरती उरली.

एके काळी जॉन आणि तिचं कपल हे जगातल्या हॉट कपलपैकी एक मानलं जात होत पण त्या दोघांचही ब्रेकअप झालं. बिपाशा ऑफिशियली संपली होती. राज 3d सुद्धा तिची डूबती नय्या सावरू शकला नाही. हमशक्ल, क्रीचर वगैरे आणखीन पकाऊ सिनेमे करून स्वतःच्या करियरवर शेवटचा दगड तिने ठेवला.

आता ती करण ग्रोवरबरोबर संसारात मग्न झाली आहे. इंस्टाग्राम टिकटॉक च्या युगात करीनाच्या तैमुरच्या नॅपी बदलल्याच्या जेवढ्या चर्चा होतात तेवढी पण चर्चा बिपाशाच्या सिनेमा रिलीज झाल्यावर होत नाही.

बिपाशा आता चाळीशीची झालीय. तिन पिक्चरमध्ये काम करायचं सुद्धा बंद केलय. जरी मिडिया तिला विसरली असली तरी आम्ही तिला विसरणार नाही. बिपाशाच आमच्यावर भरपूर उपकार आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.