कापूस खरेदीपासून सुरुवात करत माणूस किती मोठा होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे बिर्ला

भारतात अनेक मोठे उद्योजक आहेत ज्यांनी जागतिक स्थरावर आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी स्वातंत्र्यानंतर आपल्या कंपन्या जगातील कानाकोपऱ्यात पोहचवील्या. बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.

यात टाटा आणि इतर कंपन्या बरोबर एक नाव नेहमी घेतलं जात ते म्हणजे बिर्ला ग्रुप.

१८५७ साली राजस्थान मधील पिलानी गावात एका लहानशा खोलीतून त्यांचं बिझनेस एम्पायर उभं राहील. तिथे कापूस खरेदी केली जातं असे. शिव नारायण बिर्या यांनी हे कापूस खरेदी करत.आज याच बिर्ला ग्रुप ३६ देशांमध्ये बिझनेस करत आहे. अँपल, जॉन्सन अँड जॉन्सन, एयर बस सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांपेक्षा जास्त कामगार बिर्ला कंपनीत कामाला आहेत.

सुरुवातील बिर्ला कुटुंब कापूस उद्योगात होते. त्यानंतर एक-एक करत उद्योग क्षेत्रात येत गेले. जी. डी बिर्ला हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी यांच्या सोबत होते. 

२० व्या शतकात जी. डी. बिर्ला यांच्याकडे ग्रुपची कमानं आणि त्यानंतर जगभर ही कंपनी विस्तारली गेली. स्वातंत्र्य नंतर १० दिवसात जी. डी. बिर्ला यांनी हिंदाल्को आणि ग्रासिम या कंपन्या सुरु केल्या. 

यानंतर बिर्ला समूह आदित्य बिर्ला यांच्या हाती आला. तेव्हा त्यांचे वय अवघे २४ वर्ष होते. जागतिक बाजारात कंपनी मोठी करण्यात आदित्य बिर्ला यांचा वाटा मोठा आहे. १९६९ साली त्यांनी दक्षिण पूर्व आशिया देशांमध्ये मुक्त बाजारपेठ होती. त्यांनी अशा देशांमध्ये प्लॅन्ट, फॅक्ट्री उभे करण्याची धाडस केले.

त्यांच्या कार्यकीर्दीत भारताबाहेर म्हणजेच थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया सारख्या १९ देशांमध्ये बिर्ला कंपनी पोहचली होती. भारतात राहूनही व्यवसाय जागतिक करता येतो यावर त्यांचा विश्वास होता. त्यांच्या कार्यकाळात जगातील सर्वाधिक फायबर उत्पादन करणारी कंपनी, पाम तेलाची रिफायनरी उभ्या राहिल्या. 

१९९५ मध्ये त्यांचे अकाली निधन झाले. त्यावेळी कंपनीच्या नावे ९ हजार कोटींहून अधिक संपत्ती झाली होती. तसेच ७५ हजार कर्मचारी संख्या होती.       

त्यानंतर कुमार मंगल बिर्या यांच्याकडे समूहाची सगळी जबाबदारी आली. त्यांचा जन्म १४ जून १९६७ रोजी मुंबईत झाला. अर्थशास्त्रात पदवी घेतल्यानंतर त्यांनी चार्टर्ड अकाउंट बनले आणि त्यानंतर लंडन बिझनेस स्कूलमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले.

१९९५ मध्ये वडिलांच्या निधनानंतर कुमार मंगलम बिर्ला यांना कंपनीचे अध्यक्ष करण्यात आले तेव्हा त्यांचे वय अवघे २८ वर्ष होते. कुमार मंगलम अध्यक्ष झाले तेव्हा कंपनी वस्त्रोद्योग कापड, सिमेंट, अल्युमिनियम क्षेत्रात पुढे होती. कुमार यांनी दूरसंचार, सॉफ्टवेअर आणि बीपीओ क्षेत्रात कंपनीचा विस्तार केला.

कुमार यांनी कंपनीची जबाबदारी हाती घेतली होती कंपनीचे एकूण उत्पन्न २ बिलियन डॉलर एवढेच होते. आज कंपनीचे उत्पन्न ४१ कोटी बिलियन झाले आहे.

२०१७ मध्ये त्यांच्या कार्यकाळात व्होडाफोन आयडिया मध्ये मर्ज करण्यात आलं. जगातील प्रत्येक दुसरा टायर हा बिर्ला ग्रुप मध्ये तयार होणाऱ्या कार्बन ब्लॅक पासून तयार होतो.  देशातील सर्वाधिक सिमेंट तयार करणारी अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला ग्रुपच्या मालकीची आहे.

पीटर इंग्लंड, ल्युई फिलिप्स, अॅलन सोली  सारख्या कपड्यांच्या ब्रँडची मालकी बिर्ला कडे आहे. देशभरात कंपनी मार्फत तब्बल ४ हजार डिपार्मेंट स्टोर आणि अडीच हजार ब्रँड आऊटलेट चालविले जातात. याच बरोबर मायनींग, फर्टिलायजर, केमिकल प्लॅन्ट, म्युचअल फंड, इन्शोरन्स, टेक्स्ट टाईल्स मिल्स,  होम अप्लायन्स बनविणाऱ्या ओरियंटची मालकी सुद्धा आदित्य ग्रुपकडे आहे. 

बिर्ला परिवाराने फक्त मोठं मोठ्या कंपन्याच बांधल्या नाही तर संस्थात्मक जाळे सुद्धा उभे केले आहे.

यात मुंबईतील एम. पी. लायब्रेरी, बिरला ग्लोबल युनिव्हर्सिटी, बिट्स पिलानी, दिल्लीत बिर्ला हाऊस, टेक्स्टाईल इन्स्टिट्यूट, गांधी स्मृती सारख्या संस्था उभ्या केल्या आहेत. 

त्याच बरोबर देशभरात १५ पेक्षा जास्त ठिकाणी मंदिर बांधली आहे. बिर्ला कुटुंब २० पेक्षा जास्त हॉस्पिटल चालविते. देशातील ग्रामीण भागात दर वर्षी ५ हजार हेल्थ कॅम्प घेते ते ही मोफत. देशभरात ५६ शाळा असून त्यात २० हजार विद्यार्थांना मोफत शिक्षण दिले जाते. 

 हे झालं भारतातलं. आदित्य बिर्ला ग्रुप ३६ देशांमध्ये काम करते

आदित्य बिर्ला ग्रुप जगातील सर्वात मोठे कार्बन ब्लॅक मॅन्युफॅक्चर करणारी कंपनी आहे. टायर, इंक तयार करण्यासाठी कार्बन ब्लॅक महत्वाचा असतो. कंपनीचे प्लॅन्ट अमेरिका, ब्राझील, साऊथ आफ्रिका, इजिप्त, स्पेन, इटली आणि कॅनडा या देशांमध्ये आहेत. 

अल्युमिनियम रोल तयार करणारी अमेरिकेतील सर्वात मोठी कंपनी म्हणून बिर्ला कंपनी ओळखली जाते. आदित्य बिर्ला ग्रुपने अलेरीस ही अल्युमिनियन बनविणारी कंपनी २.६ बिलियन डॉलरला विकत घेत आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे. यानंतर आदित्य बिर्ला ग्रुप अल्युमिनियम मॅन्युफॅक्चर करणारी जगातील दुसऱ्या नंबरची कंपनी बनली आहे. 

 एकट्या नॉर्थ अमेरिकेत बिर्ला कंपनीत १२ हजार पेक्षा जास्त कामगार आहेत. फिलिपिन्स मध्ये येथील सगळ्यात मोठी असणारी टेक्स टाइल मिल ही आदित्य बिर्ला ग्रुपच्या मालकीची आहे. थायलंड, सिंगापूर, चीन, व्हिएतनाम, कोरिया सारख्या देशात मीठ मोठ्या कंपन्यांची मालकी आदित्य बिर्ला ग्रुपकडे आहे. 

आशिया खंडातील श्रीमंत कुटुंबापैकी एक बिर्ला कुटुंब समजले जाते. अल्युमिनियम रोल आणि कार्बन ब्लॅक ग्लोबल लिडर म्हणून आदित्य बिर्ला ग्रुप ओळखला जातो. कुमार मंगलम बिर्ला १९९५ पासून कंपनीचे अध्यक्ष आहेत.

राजस्थान मधील एका खेड्यात सुरु झालेला कंपनी आज ३६ देशांमध्ये पोहचली आहे. कुमार मंगलम बिर्ला यांचा भारतातील पहिल्या १० श्रीमंत उद्योगपती मध्ये नंबर लागतो. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.