बिटकॉईन, इथेरियम की निफ्टी ; इन्व्हेस्टमेंटमध्ये नक्की कोण फायदा देतय…?

मागच्या महिन्यात टेस्लाने बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट केलेली. त्यानंतर एका महिन्यात बिटकॉईन ढगात गेला. आत्ता बिटकॉईन नेमकं काय आहे हे सांगण्यासाठी हा लेख नाही. त्यासाठी तुम्ही खाली दिलेली जूनी लिंक पाहू शकता.

तर या तिन इन्व्हेस्टमेंटच्या प्रकारात सर्वाधिक रिटर्न देणारा मार्ग सांगायचा झाला तर गेल्या महिन्यात तो बिटकॉईनच ठरलाय. बिटकॉईनने ४० टक्के प्रॉफिट दिलेला आहे. 

२०१० साली बिटकॉईन आला. त्यानंतर लोकांच्यात संभ्रमाचं वातावरण होतं. पण गेल्या वर्षभरात चांगल्या चांगल्या बिझनेसमॅन लोकांनी बिटकॉईनचं कौतुक केल्यानं लोकांनी इकडे देखील इन्व्हेस्टमेंट करण्यास सुरवात केली. ८ फेब्रुवारीला अलॉन मस्कने विश्वास दाखवला आणि बिटकॉईन ५० हजार डॉलरच्या घरात गेला. 

फेब्रुवारीच्या पूर्वीचे तीन महिने पाहिले तरी बिटकॉईन वाढतच गेलेला दिसतोय. जानेवारी महिन्यात तो अडीच टक्के वाढला, डिसेंबर महिन्यात ९४ टक्के इतका प्रचंड वाढला आणि नोव्हेंबर महिन्यात तो २७ टक्यांनी वाढला. 

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मात्र ही वाढ कमी झाली. ५८ हजार ३५४ डॉलरची वाढ झाल्यानंतर २६ टक्क्यांनी बिटकॉईन डाऊन झाला. 

टोटल चार महिन्यांचा हिशोब सांगायचा झाला तर बिटकॉईन २५७ टक्यांनी वाढलेला आहे. 

आत्ता इथेरियमचं गणित पाहूया. 

क्रिप्टो करन्सीच्या मार्केटमध्ये इथेरियमचा हिस्सा १२.५ टक्के इतका आहे. बिटकॉईन नंतर इथेरियम चा नंतर लागतो. गेल्या ४ महिन्यात इथेरियन ने देखील चांगला रिटर्न दिलेला आहे. फेब्रुवारी महिन्यात इथेरियमच १३.४२ टक्के वाढला आहे.

या काळातला हा रिटर्न बिटकॉईनपेक्षा कमी राहिला आहे. जानेवारी महिन्यात ३३.६० आणि डिसेंबर महिन्यात १०२ टक्के तर नोव्हेंबर महिन्यात ३५ टक्के वाढ झालेली आहे. इथेरियम हा २०१५ पासून अस्तित्वात आलेला आहे. 

गेल्या ४ महिन्यात इथेरियम चार पट वाढलेला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ४३८ डॉलरला असणारा भाव हा आज १८०० च्या घरात पोहचला आहे.. 

NSE च्या निफ्टीचं काय चाललं आहे.. 

वरच्या क्रिप्टो करन्सीपेक्षा जास्त विश्वासहार्य म्हणून निफ्टीकडे पाहीलं जातं. नोव्हेंबर पासून आजपर्यन्त निफ्टीचा रिटर्न २१.१६ टक्के राहिलेला आहे. मागच्या ३० दिवसात निफ्टी इंडेक्स १.०५ टक्के डाऊन झालेला आहे. गेल्या तीन महिन्यात ५० कंपन्यांचा इंडेक्स असणाऱ्या निफ्टीने साडेपाच ते साडेसात टक्के रिटर्न दिलेले आहे. 

वरच्या गोष्टीनुसार मागच्या चार महिन्यात सर्वांधिक रिटर्न देणाऱ्यात इथेरियम पुढे आहे, त्याने ३१४ टक्के रिटर्न दिलेत.

बिटकॉईनने २५७ टक्के रिटर्न दिलेत. पण लोकांच्या मते बिटकॉईन ओव्हरव्हॅल्यू झालेला आहे.  मार्केटचा हिस्सा सांगायचा तर क्रिप्टोकरंन्सीमध्ये बिटकॉईन २००३ मध्ये ९४ टक्के हिस्सा होता तो आत्ता ६०.४ टक्के इतका झालेला आहे, त्यामुळे इतर क्रिप्टोकरन्सीकडे लक्ष द्यायला हवं अस लोकांच म्हणणं आहे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.