कधीकाळी २ पिझ्झा घेतले की १० हजार बिटकॉईन मिळायचे, आज १ बिटकॉईन ३३ लाखाला आहे

इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने मागच्या आठवड्यात १.५ अब्ज डॉलर्स किमतीचे बिटकॉईन विकत घेतले आणि जगाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा काही तरी वेगळं पाहायला मिळालं, हे वेगळं काय होतं तर बिटकॉइनचे वाढलेले दर. या आभासी चालनाने पुन्हा एकदा उचल खाल्ली, आणि एका बिटकॉइनने आपला भाव थेट ३३ लाख रुपयांवर नेवून ठेवला.

पण भिडुनो या बातमी मागची गोष्ट सांगायची म्हणजे आजपासून बरोबर ११ वर्षांपूर्वी २ पिझ्झा घेण्यासाठी तब्बल १० हजार बीटकॉईन मोजावे लागले होते.

थांबा. आता हिशोब करत बसू नका. त्यावेळी एका बिटकॉइनची किंमत ५-६ रुपये अशी होती. आणि आज ती थेट ३३ लाख रुपयांवर गेली आहे. त्यामुळे किती पट किंमत वाढली याची टोटल करायला बसलं तर दिवस कमी पडायचा.

सुरुवातीला जागतिक स्तरावरचं आभासी चलन म्हणून ओळख मिळवलेलं बीटकॉइन हे पहिलं चलन ठरलं होतं.

आता बीटकॉईनला आभासी चलन का म्हंटल जात?

तर बीटकॉईन ही एक प्रकारची क्रिप्टोकरंसी आहे, इंग्लिशमध्ये ‘क्रिप्टो’ म्हणजे गुप्त असा अर्थ होतो. ही एक प्रकारची गुप्त असलेली डिजिटल करंसी आहे, ज्याला क्रिप्टोग्राफीच्या नियमांच्या आधारे बनवलं जातं आणि संचालित केलं जातं.

यात फक्त आणि फक्त ऑनलाइन व्यवहार केलं जण शक्य आहे. याच्या साह्याने कोणतंही सामना खरेदी केलं जावू शकत. 

बऱ्याच ऑनलाइन मार्केट प्लेस वरून बिटकॉईनची खरेदी किंवा विक्री केली जाऊ शकती. जसं डिजिटल पद्धतीने पैसे ट्रान्सफर करता येतात अगदी त्याच पद्धतीने बीटकोईनचा देखील व्यवहार करता येतो.

हे चलन जसं आभासी तसाचं याचा निर्मिती करणारा देखील आभासी.

ऑक्टोबर २००८ मध्ये बिटकॉइन.ऑर्ग नावाच्या वेबसाइट वर एक पेपर प्रकाशित झाला. पण त्यावेळच्या बहुतांश माध्यमांच्या दाव्यानुसार हा लेख सॅतोशी नाकामोटोच्या नावाने प्रकाशित झाला होता. त्याने हे चलन बनवण्यासाठी सगळ्यात आधी सुरुवात केली ती २००७ मध्ये.

नाकामोटो यांचं लक्ष आपल्या सोबत आणखी डेव्हलपर्सना जोडणं होतं असं सांगितलं जात. यासाठी ९ जानेवारी २००९ मध्ये त्यांनी आपलं पाहिलं सॉफ्टवेअर लॉन्च केलं होतं. ते सोर्सफॉरगे नावाच्या वेबसाईटवर अपलोड केलं होतं. याच व्हर्जन ०.१ होतं, आणि याच सॉफ्टवेअरच्या पहिल्या क्रिप्टोकरंसीच्या पहिल्या आवृत्तीला बीटकॉईन हे नाव दिल गेलं. 

त्यावेळी या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ५० बिटकॉइनचे व्यवहार सुरू झाले होते, आणि त्याची किंमत ५-६ रुपये प्रति बीटकॉईन होती. हॅल फिन्नेने हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून त्याच दिवशी १० बिटकॉइन कमाविल्याचे मानलं जातं.

यानंतर या प्रक्रियेत सहभागी झालेला व नंतर बिटकॉइन फाऊंडेशन स्थापन करणाऱ्या गॅव्हीन अ‍ॅण्डरसनने ही प्रक्रिया विकेंद्रित केली.

बीटकॉईन मायनींग म्हणजे काय? 

बीटकोईनची निर्मीती ही मायनींगच्या माध्यमातून होतं असते. आता मायनींग म्हणजे काय तर कॉम्पुटरवर गणिताचे अत्यंत किचकट प्रश्न सोडवणे. आणि ते सिद्ध करण्यासाठी लाखो कॅलक्युलेशन प्रति सेकंड करावी लागतात. त्यानंतरच ट्रानझॅक्शन कन्फर्म होतं. या पद्धतीने बिटकॉइन मिळवण्याच्या पद्धतीला बिटकॉइन माइनिंग म्हंटल जात.

प्रथम प्रश्न सोडविणाऱ्यास २५ बिटकॉइन्स मिळतात. ही सारी प्रक्रिया अतिशय किचकट असते पुढच्या टप्प्याकडे जाताना ती आणखीन किचकट होत जाते. दर चार वर्षांनी आधीच्या टप्प्याच्या निम्मे बिटकॉइन्स तयार होतील याची काळजी घेतली जाते.

सुरुवातीला बिटकॉइन याच पद्धतीने बनवण्यात आलं होतं. आज देखील अनेक लोकं बिटकॉइन माइनिंग करून क्रिप्टोकरेंसी मिळवतात.

बीटकॉइन वॉलेट : 

बीटकॉइन एका डिजिटल वॉलेटमध्ये स्टोर असतात. या डिजिटल वॉलेटलाच बिटकॉइन वॉलेट म्हंटल जातं. हे बीटकॉईन वॉलेट यूजरच्या कॉम्प्युटर्स किंवा ऑनलाइन क्लाउडवर कुठेही सेव्ह असू शकत. हे एक प्रकारचं वर्चुअल बँक अकाउंट सारखं असतं. आणि याला विशिष्ट एका पासवर्डनेच उघडलं जाऊ शकतं.

जर एखादा वापरकर्ता त्याचा पासवर्ड विसरला तर त्याचे बिटकॉइन देखील हाताला लागत नाहीत. 

वापरकर्त्यांविषयी कोणतीही अधिकृत माहिती नाही.

बिटकॉइनच्या वापरणाऱ्यांची जगभरातील संख्या सध्या ६० लाखांच्या वर असल्याचे सांगितले जाते. २०१३ मध्ये ही संख्या १३ लाख होती. वॉलेट म्हणून बिटकॉइनचे जवळपास १०,००० वापरकर्ते असल्याचा दावा आहे. त्यातुन १० कोटी डॉलरच्या बिटकॉइनचे व्यवहार होत असतात.

मात्र बिटकॉइन वापरणाऱ्यांची संख्या, या आभासी चनलामार्फत होणारे व्यवहार आणि त्या व्यवहारांची संख्या याबाबत कुठेही अधिकृत माहिती नाही. आणि जे व्यवहार करतात त्यांची संपूर्ण माहिती गुप्त ठेवली जाते. 

ट्रेडिंग कसं करता येतं? 

क्रॅकेनच्या साहाय्याने बीटकॉईन मध्ये ट्रेडिंग केलं जाऊ शकत. क्रॅकेन हे क्रिप्टो करंसीचे एक्सचेंज आहे. २०११ मध्ये याला बनवण्यात आलं होतं.

यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक अकाउंट बनवावं लागतं. यानंतर इमेलच्या माध्यमातून हे अकाउंट कन्फर्म केलं जावू शकत. अकाउंट व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्ही ट्रेडिंग मेथड सिलेक्ट करू शकता.

ट्रेडिंगसाठी एक चार्ट उपलब्ध असतो. ज्याच्यामध्ये बिटकॉइनच्या किमतीचा संपूर्ण इतिहास आणि त्यावेळची जी किंमत असते ते सगळं दिलेलं असते. त्या वेळेला जी किंमत असेल आणि ती जर योग्य वाटत असेल तर ऑर्डर देऊन तुम्ही बिटकॉइन खरेदी करू शकता. 

बिटकॉइनच्या किमतीमध्ये बदल खुपच अनिश्चित आणि जलद होत असतो. पण गुंतवणूक करण्यासाठी लोकांना हे खूपच आकर्षक वाटतं.

बिटकॉइनचे फायदे – तोटे

फायदे 

आपल्या एंट्री सोबतच बिटकॉइनचा रिटर्न अगदी गगनचुंबी मिळतो. मागच्या ७ वर्षात बिटकॉइनमध्ये १० रुपयांच्या गुंतवणुकीला ६.२ लाख रुपयांपर्यंत नेऊन ठेवलं होतं. २०१७ या वर्षात बिटकॉइनने जानेवारी ते नोव्हेंबर या दरम्यान ९०० टक्के रिटर्न दिले होते.

दुसरी गोष्ट म्हणजे यातील संपूर्ण व्यवहार गुप्त राहतात.

तोटे – 

बिटकॉइन करंन्सीचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे जर तुमचा कॉम्पुटर हॅक झाला तर हे बिटकॉइन रिकव्हर होत नाहीत. इतकच काय याची चोरी झाल्यास तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार देखील करू शकत नाही.

याची कोणतीही माहिती उघड राहत नसल्याने सरकारसाठी हि मोठी डोकेदुखी ठरू शकते. याच कारण म्हणजे या चलनाचा वापर अवैध उद्योगांसाठी केला जाण्याची शक्यता असते. यात अगदी ड्रग्सच्या खरेदीचा देखील समावेश असू शकतो. 

या चलनाचं नियमन नसल्यामुळे जगभरातील बँक यामुळे चिंताग्रस्त आहेत. तसंच व्यवहारांसाठी थर्ड पार्टीची म्हणजेच बँकांची गरज लागत नाही. त्यामुळे कर चोरीची शंका देखील आहे. कोणताही देश अधिकृत रित्या बिटकॉइनला मान्यता देताना दिसत नाही, त्यामुळे अर्थव्यवस्थेसाठी हे एक प्रकारचं संकट उभं राहू शकत,

अस्थिर आणि जलद बदलणारी किंमत : 

बिटकॉइनच्या किमतीमध्ये कोणतीही स्थिरता नाही. २००९ साली बाजारात आल्यानंतर २०१० पर्यंत बिटकॉइनने प्रचंड लोकप्रियता मिळविली होती. त्यावेळी बिटकॉइनच्या प्रवर्तकाने २.१० कोटी आभासी चलन जारी केले होते. त्यावेळी त्याची ५ ते ६ रुपये एवढीच किंमत होती.

यामार्फत खऱ्या अर्थाने पहिला खरेदी व्यवहार झाला तो पिझ्झाचा. त्यावेळी पापा जॉन्सच्या दालनातून दोन पिझ्झा १०,००० बिटकॉईच्या बदल्यात विकले गेले होते. 

२०११ मध्ये एका बिटकॉइनची किंमत ३२ डॉलर झाली होती. २०१२ आणि २०१४ मध्ये त्याच्या किमतीने पुन्हा गटांगळीही खाल्ली होती. २०१७ च्या सुरुवातीपर्यंत या आभासी चलनात प्रचंड अस्वस्थता होती.

लंडनच्या बाजारातील सोने, अमेरिकेच्या भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक यांच्या तुलनेत तर या आभासी चलनातील गटांगळी सात ते १८ पट अधिक होती.

२०१७ च्या अखेरीस बिटकॉइनचे मूल्य पुन्हा झेप घेऊ लागले. त्या वर्षांच्या सुरुवातील १,००० डॉलरचे बिटकॉइनचे मूल्य १३,००० डॉलपर्यंत गेलं होतं. त्या वर्षातच बिटकॉइनचे व्यवहार जवळपास दीड कोटींनी वाढले होते. 

तेव्हापासून वर-खाली होत असलेलं बिटकॉईन मूल्य सध्या इलॉन मस्कने खरेदी केल्यापासून ३३ लाखांपर्यंत गेलं आहे. आणि सध्याची परिस्तिथी बघता वाढता-वाढता वाढे असचं काहीस आहे.

पण शेवटी या आभासी चलनाच वर्णन करताना अर्थतज्ञ असं म्हणतात,

“आकाशात उडत जाणारा हैड्रोजन चा फुगा आणि हवा कमी झाल्यावर खाली येणार फुगा म्हणजे याची पद्धत”

भारतात अजूनही बिटकॉइनला परवानगी नाही : 

जग बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असताना भारतात मात्र बिटकॉइनला अजून परवानगी दिलेली नाही. मागील आठवड्यात या विषयावर राज्यसभेत झालेल्या चर्चेमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सध्या आपल्या देशात क्रिप्टोकरन्सी संदर्भातले कायदे हे अपूर्ण असल्याचं सांगितलं होतं.

क्रिप्टोकरन्सी संदर्भात संसदेत लवकरच विधेयक आणणार असून त्या विधेयकाला सध्या अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. 

या आधी रिझर्व्ह बँकेने बिटकॉइनसारख्या व्हर्च्युअल करंन्सीच्या वापरावर २०१८ मध्ये बंदी घातली होती. मात्र अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.