सत्ता येणार नाही म्हणून या माजी मुख्यमंत्र्यांनी प्रचाराकडे पाठ दाखवली ?

सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका लागल्यात. यात उत्तराखंड मध्ये भाजपला कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतोय. आता याचं कारण म्हणजे पुष्कर सिंह धामी. म्हणजे उत्तराखंड मध्ये झालंय असं की, धामी सोडले तर भाजपचे किमान अर्धा डझन माजी मुख्यमंत्री भाजपच्या पोस्टरवर झळकायसाठी आतुर झालेत.

उत्तराखंडमध्ये मध्ये भाजपने गेल्या वर्षात चार महिन्यांत दोनदा मुख्यमंत्री बदललाय. आणि आता परत निवडणुका लागल्यात. अशा स्थितीत सत्ताधारी पक्ष भाजपने पुन्हा एकदा पुष्कर धामी यांना संधी द्यायचं ठरवलंय. मुद्दा फक्त एवढाच आहे की आधीच्या नाराज नेत्यांनी धामींच नेतृत्व डावलू नये.

त्यामुळेच हे सर्व माजी मुख्यमंत्री भाजपच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणावर गैरहजर आहेत. परिस्थिती तर एवढ्यावर गेलीय की या माजी मुख्यमंत्र्यांना ना उमेदवारांकडून प्रचारासाठी बोलावलं जातयं ना त्यांना पक्षाच्या सोशल मीडिया प्रचारात विशेष स्थान मिळतंय. उत्तराखंड मध्ये तर असं पण म्हंटल जातंय कि, उत्तराखंड मध्ये सत्ता येणार नाही असं वाटतंय म्हणून हे माजी मुख्यमंत्री प्रचाराकडे पाठ दाखवतायत ?

या माजी मुख्यमंत्र्यांना फक्त त्यांच्या मतदारसंघापुरतेच मर्यादित करण्यात आलंय. थोडक्यात उत्तरखंडच्या पोस्टरवरुन हे नेते गायब आहेत.

यावर राजकिय विश्लेषकांच्या मते, हे नेते पोस्टवरून गायब आहेत कारण सेंटर ऑफ अट्रक्शन मुख्यमंत्री धामी असायला हवेत. त्याच वेळी, भाजपचे इतर काही नेते म्हणतायत की बहुतेक उमेदवारांच्या अधिकृत यादीत या माजी मुख्यमंत्र्यांचा स्टार प्रचारकांचा समावेश असूनही उमेदवारचं नेत्यांना प्रचारासाठी बोलवायला तयार नाहीत. उत्तराखंडमध्ये ७० जागा आहेत मात्र माजी मुख्यमंत्री त्यापैकी १० जागांवर सुद्धा प्रचार करताना दिसत नाहीयेत.

मग हे माजी मुख्यमंत्री म्हणजे कोण ?

तर या लिस्टमध्ये नंबर एकवर आहेत, त्रिवेंद्र सिंह रावत !

गेल्या वर्षी मार्चमध्ये राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आलेले हे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत. त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला अशी विनंती केली होती की विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊ नये. धामी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा सत्तेत येईल याची त्यांना खात्री आहे आणि आता त्यांना स्वतःच अवलोकन करण्यासाठी वेळ हवाय असं ते म्हंटले होते.

पण उत्तराखंड मध्ये चर्चा सुरुय की, पक्षानेच रावत यांना उमेदवारी दिली नाहीये. कारण पक्षाला फक्त धामीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळेच त्यांना प्रचाराला बोलावलं जात नाहीये.

आता दुसरे माजी मुख्यमंत्री आहेत तीरथ सिंह रावत !

त्रिवेंद्रसिंग रावत यांच्या जागी चार महिन्यांसाठी मुख्यमंत्री म्हणून ज्यांची वर्णी लागली होती ते हे तीरथ सिंह रावत. पुढे यांना धामीसाठी पद सोडाव लागल. तीरथ सिंह रावत हे गढवाल मतदारसंघाचे भाजपचे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांवरच त्यांच लक्ष आहे. पण चर्चा अशी आहे की,

तीरथसिंह रावत यांना सुद्धा भाजपने डावललं आहे. ते फक्त त्यांच्या लोकसभा मतदारसंघात छोट्या सभा आणि इतर निवडणूक कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काही रिपोर्ट्स आलेत त्याप्रमाणे,

७० सदस्यांच्या विधानसभेसाठी भाजपने ‘अब की बार 60 पार’ अशी घोषणा दिली तर आहे. पण पक्षातील लोकांना ज्या प्रकारे डावललं जात आहे त्यामुळे स्पष्ट बहुमत मिळवणं सुद्धा भाजपसाठी अवघड होऊन बसलंय. २०२२ ची ही निवडणूक पक्षाऐवजी वैयक्तिकरित्या लढण्यावर उमेदवारांचा भर आहे.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.