२०१६ पूर्वीचं चित्र बदललं आणि एक-एक करत ईशान्य भारतातील सर्व राज्ये भाजप जिंकत गेली..

आमदारांची संख्या कमी असतांना सुद्धा मणिपूर मध्ये भाजपने लहान पक्षाला सोबत सत्ता स्थापन केली होती. मंगळवारी मणिपूर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंददास कोंथौजम आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता ते समर्थक ८ आमदारांसोबत भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत.

एक-एक करत भाजपने संपूर्ण ईशान्य भारतातील राज्यात भाजपची सत्ता आणली आहे.     

भाजपची लुक नॉर्थ इस्ट पॉलीसी

आसाम सोडले तर ईशान्य भारतातील इतर राज्यातून लोकसभेत येणाऱ्या उमदेवारांची संख्या कमी आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचे या राज्यांकडे लक्ष कमी होत गेलं. २०१४ मध्ये केंद्रात भाजपची सत्ता स्थापन झाल्या पासून ईशान्य भारतातील राज्याकडे विशेष लक्ष दिले आहे.

या राज्यांना देशाजवळ आणण्यासाठी भाजपने रस्ते आणि विमान सेवेचा विस्तार केला. तिथे होणाऱ्या कामावर विशेष लक्ष दिले आहे. 

लुक नॉर्थ इस्ट नावाची पॉलीसी तयार करून भाजपने ईशान्य भारतातील सातही राज्यात सत्ता स्थापन केली आहे. तर नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात ईशान्य भारताच्या वाट्याला २ कॅबिनेट तर ३ राज्यमंत्री पद दिले आहे. त्यामुळे लक्षात येत की, भाजप ईशान्यकडील राज्याला किती महत्व देत आहे.

ईशान्य भारतात भाजपला यश मिळवून देण्यामागे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांचा मोठा वाटा आहे. २०१५ मध्ये ते कॉंग्रेस सोडून भाजप मध्ये आले होते. त्याचबरोबर भाजपचे माजी राष्ट्रीय महासचिव राहिलेले राम माधव गेली अनेक वर्ष ईशान्य भारतात भाजपची सत्ता यावी म्हणून प्रयत्नशील होते.

 

आसाम

भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाने इतिहास रचत २०१६ मध्ये पहिल्यांदाच आसाम मध्ये सरकार  स्थापन केली. भाजपचे सर्वानंद सोनोवाल यांनी तरुण गोगोई यांच्याकडून १५ नंतर सत्ता खेचून आणली होती. आता हेमंत बिस्वा शर्मा हे मुख्यमंत्री पदी आहेत.

मणिपूर

मणिपूर विधानसभेची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. त्यात ६० पैकी सर्वाधिक २८ आमदार कॉंग्रेसचे निवडून आले होते. तर भाजपाचे २१ आमदार विजयी झाले होते. अपक्ष आणि पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. सध्या एन बिरेन सिंह हे मुख्यमंत्री आहेत.

मेघालय

२०१८ मध्ये मेघालय विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक आमदार कॉंग्रेसचे निवडून आले होते. तर भाजपचे केवळ २ आमदार निवडून आले आहेत. सर्व लहान पक्षाला एकत्र करत कॉंग्रेसला मेघालयाच्या सत्तेपासून लांब ठेवले आहे.

भाजपने एनपीपी पक्षाचे नेते कॉनराड संगमा यांना भाहेरून पाठींबा देत सरकार स्थापन केले आहे.

त्रिपुरा

भाजपकडून आसाम नंतर त्रीपुरावर विशेष लक्ष देण्यात आले होते. यासाठी सुनील देवधर यांना प्रभारी करण्यात आले होते. २५ वर्षपासून सत्तेत असणाऱ्या मार्क्सवादी पक्षाला बाजूला करत २०१८ मध्ये  भाजप आणि इंडीजीनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराने सरकार स्थापन केल आहे. भाजपचे बिप्लव देव मुख्यमंत्री आहेत.

नागालैंड

२०१८ मध्ये झालेल्या नागालैंड विधानसभा निवडणुकीत भाजपचे ९ आमदार निवडून आले आहेत. नेशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पक्षाला पाठींबा देत भाजपने सत्ता स्थापना केली आहे. सध्या नेफियू रियो नागालैंड मुख्यमंत्री आहेत.

सिक्कीम

सिक्कीम विधानसभेची २०१८ मध्ये निवडणूक झाली त्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. मात्र निवडणुकी नंतर सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटच्या (एसडीएफ) १० आमदारांनी भाजप मध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपचे आमदारांची संख्या १० वर पोहचली आहे.

एसडीएफच्या पवन कुमार चामलिंग हे भाजपच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री पदी आहे. त्यांच्यात पक्षाचे १० आमदार भाजपने आपल्या पक्षात घेतले आहे. आता सत्तेत मांडीला मादी लावून बसले आहे. 

मिजोरम

मिजोरम विधानसभेत भाजपचा १ आमदार आहे. मिजो नॅशनल फ्रंटचे सरकार असून त्याला भाजपने पाठींबा दिला आहे. सध्या जोरामथंगा हे मुख्यमंत्री आहेत.

अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेश मध्ये पहिल्यांदा २०१९ मध्ये सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपने पेमा खंडू यांनी मुख्यमंत्री पदी निवड केली आहे. त्यांनी २०१६ मध्ये भाजप मध्ये प्रवेश केला होता. पूर्वी ते कॉंग्रेस मध्ये होते. अरुणाचल प्रदेश मध्ये ६० पैकी ४१ जागेवर भाजपचे उमदेवार निवडून आले आहेत. २०१६ मध्ये पेमा खंडू यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.

सेवन सिस्टर संबोधल्या जाणाऱ्या या राज्यांमध्ये एक तर भाजपची सत्ता आहे किंवा भाजप सत्तेत सामील तरी आहे. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.