प्रदूषणावरचा उपाय सोडा, भाजप खासदाराच्या मते यज्ञाच्या धुरामुळं आजार बरे होतात

राजकीय नेते कधी काय बोलतील त्याचा भरोसा नाही. म्हणजे याचा प्रत्यय दिल्लीमध्ये आला आहे. म्हणजे राज्यसभेत एखाद्या विधेयकावर असो वा एखाद्या मागणीवर किंव्हा वक्तव्यावर वादावादी होत असते पण अलीकडे प्रदूषणाच्या मुद्द्यावरून वादावादी झाली.

त्याच निमित्त होतं ते म्हणजे, १० डिसेंबर रोजी काँग्रेसचे अमी याज्ञिक यांनी राज्यसभेत देशातील जल, वायू आणि जमीन प्रदूषणाच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याचा ठराव मांडला होता. 

सुश्री याज्ञिक यांनी सभागृहात ठराव मांडताना सांगितले की, प्रदूषणाशी संबंधित सर्व संबंधितांशी काम करण्यासाठी आणि देशातील हवा, पाणी आणि जमीन प्रदूषणाच्या सद्यस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी एक संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात यावी आणि या समितीने निर्धारित वेळेत अहवाल सादरकेला जावा. तसेच सरकारने प्रदूषणाच्या कारणांचे स्वतंत्रपणे विश्लेषण करून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर कायदे केले पाहिजेत…इत्यादी गोष्टी या ठरवत नमूद होत्या..

प्रदुषणावर संसदेची समिती गठीत करण्याचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर साहजिकच यावर सभेत चर्चा होणार, कुणी दिल्ली सरकारवर टीका करणार तर कुणी केंद्र सरकारवर टीका करणार. यात सगळेच खासदार सामील होते. 

पण नेमकं या चर्चेदरम्यान भाजपचे खासदार रामचंद्र जांगडा यांनी एक असा दावा केला कि, सर्वानीच त्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तसेच जांगडा यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा चांगलेच संतापले..पण जांगडा यांनी असं काय वक्तव्य केलं ???

जांगडा यांचं म्हणणं आहे कि, “जनता कर्फ्युत १४ तास यज्ञ केल्यामुळे पत्नीचे डोळे बरे झाले”,

भाजपा खासदार रामचंद्र जांगडा म्हणाले, “गावांमध्ये आजारांचा प्रकोप होत असताना लोक हवन आणि यज्ञ करतात. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे वेगवेगळे आजार बरे होण्यास मदत होते. आपले पूर्वज आपल्यापेक्षा मोठे वैज्ञानिक होते. माझ्या घरात मागील वर्षी जनता कर्फ्युच्या काळात १४ तास यज्ञ करण्यात आले. माझ्या पत्नीला डोळ्यांच्या एलर्जीचा त्रास होता. डॉक्टरांनी तिला धुरापासून दूर राहण्यास सांगितलं होतं. असं असतानाही पत्नी अनुष्ठानासाठी बसली. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण यज्ञाने माझ्या पत्नीचे डोळे बरे केले.”

जांगडा यांच्या दाव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. दिल्लीच्या प्रदुषणावर बोलताना खासदार जांगडा यांनी जनता कर्फ्युच्या काळात यज्ञ केल्यामुळे पत्नीचे डोळे बरे झाल्याचा दावा केला.

“गायत्री मंत्रामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होते,आजच्या काळात देखील अमेरिकेचे वैज्ञानिक देखील गायत्री मंत्रामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होत असल्याचं मान्य करतात. पण तेच आपल्या देशात असं काही म्हणलं तर, आपल्या देशातील काही लोकांच्या धर्मनिरपेक्षतेला धक्का लागतो. अशा वक्तव्याला ते लोक धार्मिकता म्हणतात. त्यामुळे आपल्याला या मानसिक प्रदुषणाला दूर करण्याची गरज आहे. तरंच आपण वायू प्रदुषणाशी लढू शकू,” असंही खासदार जांगडा यांनी म्हणलं आहे.

आता त्यांच्या या दाव्यानंतर खासदार मनोज झा यांनी त्यांना चांगलंच सुनावलं,

खासदार मनोज झा यांनी त्यांना चांगलंच सुनावत आपली डोकी साफ करण्यावर विचार करायला हवं, असं मत व्यक्त केलं.

” प्रदूषणाबरोबर आपल्याला डोकं पण साफ करायला हवं, प्राधिकरणाचे तर्क प्रदुषणाचा सामना करण्यासाठी त्यांच्यात गांभीर्य नसल्याचं दाखवत आहे. विषारी हवेमुळे समाजातील गरीब घटक सर्वाधिक प्रभावित होतो. मला वाटतं आपल्याला आपलं डोकं साफ करण्यावरही विचार करायला हवा. आपलं राजकीय जीवन किती प्रदुषित आहे हे पाहता हे करावं लागेल.” असं म्हणत खासदार मनोज झा यांनी जांगडा यांचा चांगलाच समाचार घेतलाय”. 

 भाजपचे राज्यसभा खासदार रामचंद्र जांगडा हे नेहेमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहेमीच चर्चेत असतात. मागेच त्यांनी किसान आंदोलनातील शेतकऱ्यांना अनेकदा दारूबाज, गावातील सर्वात निरुपयोगी आहेत, तसेच हे आंदोलक काँग्रेसवाले आहेत, शेतकरी देशद्रोही आहेत असं म्हणत वारंवार चर्चेत आले आहेत.  तेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषीविषयक कायदे मागे घेतल्याच्या घोषणेनंतर मात्र जांगडा आता शेतकऱ्यांच्या भूमिकेवर नरमले आहेत. पण आता यज्ञाच्या धुरामुळं आजार बरे होतात. या वक्तव्यामुले ते पुन्हा चर्चेत आले आहेत.  

 

Leave A Reply

Your email address will not be published.