सत्ता जरी इतर पक्षांची असली तरी मराठवाड्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरलाय !

राज्यात ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यानंतर नगरपंचायत निवडणूक दोन टप्प्यांत झाली. ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर न्यायालयाच्या निकालानंतर खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्यात आली. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील १०६ नगरपंचायतींमध्ये कोण बाजी मारणार? याची उत्सुकता होतीच. 

या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निकालांच्या आलेल्या आकडेवारीनुसार भाजपाला २४ नगरपंचायती आणि ४१६ जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसला २५ नगरपंचायती आणि ३८७ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला १८ नगरपंचायती आणि २९७ जागा तसंच शिवसेनेला १४ नगरपंचायती आणि ३०० जागा मिळाल्या आहेत. वास्तविक बघायला गेलं तर या निवडणुकीत भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरताना दिसला असला तरी महाविकास आघाडीने सर्वाधिक जागांना कवेत घेतल्याचं चित्र आहे. पण एवढंच पुरेस नाहीये. कारण 

भाजपने मराठवाड्यात आपलं पहिलं स्थान मिळवलं आहे. भाजपने १०२, शिवसेना ७४, राष्ट्रवादी ९४, काँग्रेस ८० आणि इतर ४१ जागांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेल्या तीन्ही पक्षांना मागे टाकत भाजपने मराठवाड्यात आपलं पहिलं स्थान मिळवलं आहे. पण यात विशेष म्हणजे मराठवाड्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला असला तरी सत्ता मात्र इतर पक्षांची आली आहे. 

कोणत्या जिल्ह्यात कुणाला किती जागा?

१. बीड

बीड जिल्ह्यामध्ये एकूण पाच नगरपंचायती आहेत. आष्टी, पाटोदा, शिरूर, वडवणी आणि केज. यातल्या आष्टी, पाटोदा, शिरूर या नगरपंचायती भाजपच्या ताब्यात आल्यात. केज नगरपंचायत काँग्रेसच्या ताब्यात होती पण निसटली आणि जनविकास आघाडीच्या ताब्यात गेली. शिरूर नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांचा पराभव झाला आहे. तिथे सुरेश धस गटाने मेहबूब शेख गटाचा पराभव केला आहे. वडवणी नगरपंचायतच फक्त राष्ट्रवादीच्या ताब्यात आलीय. आता बीड म्हंटल कि पंकजा ताई आणि धनु भाऊ अशी लढत होती. मात्र पंकजा मुंडे म्हणाल्या, मुळात तुम्ही समजता तसे चित्र बीडमध्ये नाहीये. एका मतदारसंघाचं आणि संपूर्ण जिल्ह्याचं पालकत्व करणं यात फरक आहे. बीडचं जे चित्र आहे, ते लोकांनी स्पष्ट केलं आहे. बीडच्या या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

भाजप : ४७
शिवसेना : २
राष्ट्रवादी : २१
काँग्रेस : ५
इतर : १०

२. लातूर

लातूर जिल्ह्यातील चाकूर, देवणी, जळकोट आणि शिरूर अनंतपाळ नगरपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसने दोन ठिकाणी, भाजप आणि महाविकास आघाडीने एका ठिकाणी वर्चस्व मिळवले आहे. चाकूर नगरपंचायत १७ जागांपैकी महाविकास आघाडीला ८, प्रहारला ६ तर भाजपला ३ जागा मिळाल्या आहेत.
शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप ९, राष्ट्रवादी ४, शिवसेना ३ आणि १ जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.
जळकोट नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस ७, राष्ट्रवादी ४, शिवसेना २, भाजपा १ आणि अपक्ष ३ विजयी झाले आहेत. देवणी नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस १२, राष्ट्रवादी २, अपक्ष २, भाजप १ जागांवर विजयी झाले आहेत.

भाजप : १४
शिवसेना : ६
राष्ट्रवादी : १४
काँग्रेस : २३
इतर : ११

३. औरंगाबाद

सोयगाव नगरपंचायतीत आपण जिंकणार असा दावा करणाऱ्या रावसाहेब दानवेंना या निवडणुकीत राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जोराचा झटका दिला आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवेसेनेला १७ पैकी तब्बल ११ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपला अवघ्या ६ जागांवर समाधान मानावं लागलय. सोयगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता.

शिवसेना : ११
भाजप : ६

४. नांदेड

नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, नायगाव, माहूर नगरपंचायतीचा निकाल हाती आला आहे. यापैकी अर्धापूर ,नायगाव नगरपंचायतीवर काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे तर माहूर नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. 

भाजप : ३
शिवसेना : ३
राष्ट्रवादी : ८
काँग्रेस : ३३
इतर : ४

५. परभणी

भाजप : १
शिवसेना : ०
राष्ट्रवादी : १०
काँग्रेस : ०
इतर : ६

६. हिंगोली

हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ आणि सेनगाव नगरपंचायतची मतमोजणी झाली आहे. हिंगोलीतील औंढा नगरपंचायतीत शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना धक्का दिला आहे. औंढा नगरपंचायतीत काँग्रेसला ०४ जागांवर समाधान मानावे लागले. तर, शिवसेनेला एकूण ०९ जागा मिळवून आपला गड राखला आहे. तर या ठिकाणी भाजपा ०२, वंचितला ०२ जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादीला मात्र खातेही उघडता आले नाही. मात्र, सेनगाव नगरपंचायतीत त्रिशंकू वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळं नगरपंचायतीवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप : ७
शिवसेना : १४
राष्ट्रवादी : ५
काँग्रेस : ६
इतर : २

७. उस्मानाबाद

भाजप : १०
शिवसेना : १६
राष्ट्रवादी : २
काँग्रेस : ४
इतर : ३

८. जालना

राष्ट्रवादी : ३४
शिवसेना : २२
भाजप : १४
काँग्रेस : ०९
इतर : ६

 

Leave A Reply

Your email address will not be published.