चेहरेपट्टी आणि शरीरावरून चेष्टा होते, मात्र या भाजप नेत्याचे विचारपण भारी आहेत
खात्यापित्या घरातील वाटावे असं शरीर, लहान डोळे, चेहऱ्यावर नेहमी हास्य, बांधलेले केस असं हे व्यक्तिमत्व. प्रथमदर्शी बघता ते नेपाळी आहेत असंच सगळे म्हणतील. मात्र गुगलवर नाव टाकून बघितलं तर समजतं हे तर आपलेच आहेत. नागालँडचे नागरिक. तेही साधेसुधे नागरिक नाही तर मंत्री. त्यांचं नाव…
तेमजेन इमना अलांग
अलीकडेच तेजमन यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात नागालँडमधील लोकांचे डोळे का लहान असतात, लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सिंगल राहणे गरजेचं आहे, दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर नागालॅन्ड पेक्षा जास्त लोक असल्याचे त्यांनी सांगितलेले किस्से बरेच गाजले आहेत.
तेमजेन इमना अलांग नागालँड भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्याच बरोबर ते २०१८ पासून नागालँडच्या सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री आहेत.
तेमजेन इमना अलांग पुन्हा एकदा चर्चेत येण्याचा कारण म्हणजे नागालँडमधील त्सुंगरेमुंग उत्सवात त्यांनी केलेला डान्स. हा व्हिडीओ पोस्ट करून त्यांनी लिहले की, बघा मी डान्स सुद्धा करू शकतो. त्सुंगरेमुंग उत्सव हा पिके कापणीला आल्यानंतर साजरा केला जातो.
तेमजेन यांचे व्हिडीओ व्हायरल होण्याची ही काही पहिले वेळ नाही. यापूर्वी तेमजेन यांनी एका कार्यक्रमात ईशान्य भारतातील लोकांचे डोळे लहान असल्याचे फायदे सांगितले होते.
त्यात तेमजेन इमना अलाग सांगतात की,
माझे डोळे खूप लहान आहेत पण मी चांगल्या प्रकारे पाहू शकतो. डोळे लहान असल्याने त्यात कचरा, धूळ काहीही जात नाही. तसेच एखाद्या कार्यक्रम खूप वेळ चालला त्यावेळी स्टेजवर झोपलो तरीही कोणाला कळत नाही.
१९९९ मध्ये तेमजेन इमना अलांग हे दिल्ली फिरायला आले होते. ते म्हणतात, जेव्हा मी दिल्लीला आलो, त्यावेळी नागालँड मधील लोकसंख्ये पेक्षा जास्त लोक तर रेल्वेस्टेशन वरच दिसले. तसेच यावेळी लक्षात आले की, दिल्लीतीत लोकांना नागालँडच्या काहीच माहिती नाही. अनेकांना माहित पण नाही की, नागालँड हा भारताचा भूप्रदेश आहे.
1999 की और एक बातें… pic.twitter.com/BZnk4lF3uZ
— Temjen Imna Along (@AlongImna) July 13, 2022
नागालँडला जायला व्हिजा लागतो का? असा प्रश्न दिल्लीतील लोक विचारायचे.
त्याचबरोबर नागालँडमधील लोक हे माणसांना मारून खातात असं दिल्लीतील लोकांना वाटत असल्याचे तेजमन यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते. याबाबतचा एक व्हिडीओ तेजमन यांनीच ट्विट केला होता. तो व्हिडीओ १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी बघितला.
दिल्लीनंतर तेमजेन ताज महल पाहायला आग्र्याला गेले होते. त्यावेळी त्यांना परदेशी नागरिक समजून त्यांच्याकडून तिकिटासाठी २०० डॉलर मागण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपण भारतीय असल्याचे सांगितले होते. आम्ही सगळे नागालँड राज्यातील असल्याचे सांगतातच तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी विचारल की, हा कोणता देश आहे.
हा किस्सा आपण कधीच विसरणार नसल्याचे तेजमन सांगतात.
४१ वर्षांचे असणारे तेमजेन इमना अलांग हे अजूनही अविवाहित आहे.
मात्र, लोक तरीही त्यांना पत्नी आहे, ती कोण आहे असे सर्च करत असतात. गुगलवर तेमजेन यांचे नाव सर्च केल्यावर त्यांच्या पत्नी बद्दल सर्च केल्याची हिस्टरी येते. तेमजेन यांनी गुगल सर्च स्क्रीन शॉट काढत गुगल सर्च मला एक्ससाईट करतो. मी अजूनही तिला शोधत असल्याचे ट्विट केले होते.
तेमजेन यांचे हे ट्विट चांगेलचे व्हायरल झाले होते. ३२ हजार लोकांनी त्याला लाईक केले होते. शादी डॉट कॉमचे फाऊंडर अनुपम मित्तल ने कमेंट करत लिहले होते की, कुछ करणा पडेगा शादी डॉट कॉम. तेमजेन यांनी कमेंट करून उत्तर दिले- भाई हम फिलहाल बिंदास है. सलमान भाई की शादी का इंतजार कर रहा हू असे.
Ayalee, @Google search excites me.😆
I am still looking for her! pic.twitter.com/RzmmgyFFeq
— Temjen Imna Along (@AlongImna) July 10, 2022
तेमजेन इमना अलांग यांचा जन्म १९८० मध्ये झाला. ते नागालँडमधील एओ नागा जमातीतुन येतात. तेमजेन हे २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत अलोंगटाकी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. ते नागालँड सरकारमध्ये उच्च शिक्षण आणि आदिवासी विभागाचे मंत्री आहेत.
जानेवारी २०२२ मध्ये त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले.
तेमजेन हे हिंदी देखील चांगल्या प्रकारे बोलतात. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होण्याचं हे देखील एक कारण आहे. जरी तेमजेन इमना अलांग हे हसत या गोष्टी सांगत असले तरीही ईशान्य भारतातील लोकांना चिनी म्हणून हिणवलं जातं. मात्र मागच्या काळात काही प्रमाणात हे प्रकार कमी झाले आहेत.
हे ही वाच भिडू
- २०१६ पूर्वीचं चित्र बदललं आणि एक-एक करत ईशान्य भारतातील सर्व राज्ये भाजप जिंकत गेली..
- मोदी – शहांच्या ईशान्य भागातील परिस्थितीवरील शांततेमागे काय कारण असू शकतात?
- ‘रॉ’ ची कारवाई करून इंदिरा गांधींनी सिक्कीमला भारतात विलीन करून घेतले.