श्रीमंतांचा फोन अशी ओळख असलेला ब्लॅकबेरी अचानक गायबचं झाला…

कॅनडाची स्मार्टफोन कंपनी ब्लॅकबेरी एकेकाळी मार्केटमध्ये सगळ्यात मोठी मार्केट डीलर कंपनी होती. एक काळ होता जेव्हा ब्लॅकबेरीचा फोन असणे म्हणजे तो माणूस श्रीमंत समजला जायचा. श्रीमंतांची ओळख ब्लॅकबेरी फोनवरून ठरायची. कॉर्पोरेट प्रोफेशनल्स मध्ये ज्याच्या हातात ब्लॅकबेरीचा फोन असेल त्याच एक वेगळंच मार्केट असायचं.

ब्लॅकबेरी फोनची ओळख त्याचा  QWERTY की-पॅड आणि एक लाल लाईट होती जी त्याला इतर फोनपासून एक वेगळा स्पेशल ब्रँड म्हणून ओळख मिळवून द्यायची. पण ज्या वेगाने आणि जितकी क्रेझ या फोनची होती नंतर नंतर या फोनला मार्केटमधून गाशा गुंडाळावा लागला. एक काळ होता जेव्हा जगातला प्रत्येक श्रीमंत माणूस सेक्युरिटीच्या कारणास्तव ब्लॅकबेरी वापरायला प्राधान्य देत असे. 

अमेरिकेचे ओबामा तर २०१७ पर्यंत ब्लॅकबेरीचाच फोन वापरत होते. पण अचानक या फोनचा ग्राफ ढासळला. तर जाणून घेऊया या ब्लॅकबेरीची यशोगाथा आणि ग्राफ उतरण्याची गोष्ट. १९९० चा काळ होता. मोबाईल जगतात नवनवीन शोध लागायला सुरवात झाली होती. जगभरातल्या कंपन्या याच कामात होत्या.

पण कॅनडाच्या ब्लॅकबेरी कंपनीच्या मनात एक वेगळाच प्लॅन सुरु होता. ब्लॅकबेरी मोबाईल जगात असा शोध लावू पाहत होतं ज्यात लोकांना फक्त फोनच लावता येन नाही तर इंटरनेट सुद्धा चालवता येईल. पण त्याकाळात हा खूप मोठा निर्णय होता आणि रीस्कीसुद्धा होता. काही वर्षांच्या मेहनतीनंतर २००० साली ब्लॅकबेरीने आपला पहिला मोबाईल फोन RIM ९५७ लॉन्च केला.

RIM ९५७ ने मार्केटमध्ये इतर मोबाईल कंपन्यांचा बाजार उठवला. लहान स्क्रीन, कि पॅड आणि ईमेल फंक्शन यामुळे ब्लॅकबेरी वेगळा ठरत होता. कंपनीने लॉन्च झाल्याझाल्या त्यात इंटरनेट सुरु केलं. या फोनमध्ये असलेल्या ईमेल फंक्शनमुळे लोकांना कॉम्प्युटरची गरज पडत नव्हती. २००० साली ब्लॅकबेरीने एअरटेलसोबत कोलॅब्रेशन करून भारतीय बाजारपेठांमध्ये आपलं आगमन नोंदवलं. 

ब्लॅकबेरीने सगळ्यात आधी बिझनेस क्लासवाल्या लोकांनाच आपलं ग्राहक बनवलं. २००३ साली ब्लॅकबेरीने आइकॉनिक BlackBerry Quark 6210 मोबाइल फ़ोन लॉन्च केला जो त्या काळातला सगळ्यात प्रभावी गॅजेट बनला. ब्लॅकबेरी हा त्याकाळातला स्मार्टफोन होता. कारण यामध्ये ईमेल, वेब ब्राऊजर, एसएमएस, आणि ब्लॅकबेरी मॅसेंजर असे टॉप फीचर्स होते. या सगळ्या फीचर्समुळे बिझनेस युजर्स यावर फिदा होते.

यानंतर कंपनीने २००७ मध्ये मल्टिमीडिया आणि मेसेजिंग फीचर्स असलेला ब्लॅकबेरी पर्ल फोन मार्केटमध्ये उतरवला आणि या फोनने कहर केला. यानंतर ब्लॅकबेरीने भरपूर कमाई आणि नाव कमावलं. लोकांमध्ये ब्लॅकबेरी चांगलाच लोकप्रिय झाला होता.

२०१३ साली ब्लॅकबेरीने  पहिल्यांदा BB१० ऑपरेटिंग सिस्टीमसोबत BlackBerry Z10 स्मार्टफोन लॉन्च केला. यादरम्यान कंपनीने आपला पॉप्युलर QWARTY कीबोर्ड हटवला आणि फुल टच स्क्रीन मोबाईल लॉन्च केला. कंपनीचा अंदाज होता कि हे प्रॉडक्ट हिट जाईल पण हे बेक्कार फ्लॉप झालं. या काळात कंपनी अँपल आणि सॅमसंगच्या अँड्रॉइड फोनला टक्कर देण्यास तितका समर्थ वाटला नाही. 

यानंतर ब्लॅकबेरीने BlackBerry ने Q10, BB10, BB DTEK 50, BB Priv आणि BB Passport असे अनेक फोन लॉन्च केले. पण तशी जादू पुन्हा ब्लॅकबेरीला जमली नाही. यातून मोठा घाटा कंपनीला झाला. आणि ब्लॅकबेरी हळूहळू मार्केटमधून गायब झाली. पुढे ब्लॅकबेरीची जागा आता ऍपलने घेतलेली आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.