चरमसुखाच्या पल्याड पोचवणाऱ्या पॉर्नला आपल्याकडे ‘बीपी’ का म्हणतात ?

मनाने उठाव केला, मेंदू गदागदा हल्ला की आतमध्ये स्पंदन निर्माण होतात आणि त्यांना हिंदोळे देत लोक चरमसुखाच्या पल्याड पोहोचतात. 

पण ही कृपा असते कोणाची माहित आहे का ?

ब्लु फिल्मची…

ज्यामुळे तुम्हाला मोकळं होता येत, ज्यात स्वतःचा हात जगन्नाथाबरोबर कोणीतरी थर्ड पार्टी कम्पॅनियन असत, जिच्यात बसल्या ठिकाणी तुमच्या श्वासाची गती वाढवण्याचं सामर्थ्य असत अशी ब्लु फिल्म. पण आज हे नाव तुम्हाला थोडं ऑड वाटेल कारण सगळीकडे त्याचा बोलबाला पॉर्न असाच आहे.

तुम्ही जर आता २५ एक वर्षांचे असाल तर तुमच्या काकांच्या जमान्यात, काका लोक वाचत असतील तर त्यांच्याच जमान्यात आणि आजोबांच्या वयाचे वाचत असतील तर त्यांच्या मुलांच्या म्हणजे साधारण ६० ते ७० च्या दशकात ज्यांचा जन्म झालाय अशांच्या जमान्यात ज्या काही अडल्ट फिल्म्स आल्या त्यांना ब्लु फिल्म्स म्हणण्याची प्रथाच होती.

आज ती प्रथा का पडली याचीच गोष्ट भिडू तुम्हाला सांगणार आहे. 

हिंदुस्तान, पाकिस्तान, नेपाल, बांग्लादेश या पूर्ण दक्षिण आशियाई देशांच्या पट्ट्यात पॉर्नला अजूनही सहसा ब्लु फिल्मच म्हंटल जात.

याची सुरवात होते ब्लु फिल्म पासून. अहं खरोखरची ब्ल्यू फिल्म. १९६९ साली याच नावाची एक फिल्म आली होती. खऱ्या अर्थाने मान्यता प्राप्त पहिली अडल्ट फिल्म समजली जाते. पॉर्न चा पायंडाच या सिनेमाने पाडला.

या सिनेमाचं चित्रीकरण ईस्टमनच्या निळ्या शेड मध्ये झालं होतं. अँडी वॉरहॉल दिगदर्शक होता तर लुई वॉल्डन आणि व्हिवा हिरो हिरोईन होते. या सिनेमाचं कौतुक क्रिटिक्सने देखील केल. आजवरचे अनेक गैरसमज, टॅबु ब्ल्यू फिल्मने मोडले. तो चांगला चालला देखील.

तर अडल्ट कंटेंटच मिश्रण बनवलेल्या असं म्हटल जात की १९७२ मध्ये पॉर्न फिल्म आली तीच नाव होतं ‘डीप थ्रोट’. ही फिल्म अमेरिकेत सुपर डुपर हिट झाली. न्यूयॉर्क मध्ये या फिल्मचे पुसी कॅट थिएटरमध्ये दिवसाला १० – १० शो लावले जायचे.

चित्रपटाच्या जगातील पहिल्या वहिल्या लेडी पॉर्नस्टारच नाव लिंडा सुजॅन बोरमन म्हणजेच लिंडा लव्हलेस होतं. या अभिनेत्रीने पहिल्यांदाच असा अडल्ट कंटेंट असलेल्या चित्रपटात काम करायचं धाडस दाखवलं.

या फिल्मने कमावलेली माया खूपच जास्त होती. अस म्हणतात की या फिल्म ने जवळपास ६०० मिलियन डॉलर कमावले होते. म्हणजे आजच्या काळातले जवळपास ४ हजार करोड. पण या फिल्मच्या ऐक्ट्रेस लिंडा ला फक्त ७० हजारच मिळाले होते.

आता पैसे जास्त मिळतायत म्हंटल्यावर अशा चित्रपटांची संख्या वाढू लागली.

आता या फिल्म्स सर्वसामान्य कुटुंबासोबत बघता येण्यासारख्या नव्हत्याच. म्हणून या फिल्म्सचे पोस्टर ब्लु रंगात छापायला सुरुवात झाली. आता तुम्ही म्हणाल निळा रंगच का ? त्यावेळी अस म्हंटल जायचं की निळा रंग आकर्षक असतो तो लोकांना अपल्याकडे लगेच आकर्षित करतो. पण या निव्वळ पोकळ गप्पा ठरतात कारण सायन्स म्हणत की, डोळ्यांना सर्वात जास्त आकर्षित करणारा रंग म्हणजे, लाल आहे. पण त्यावेळी बरेच अडल्ट फिल्म्सचे पोस्टर ब्लुच रंगात छापले जात होते.

रंग कोणता का असेना, पण एवढं मात्र नक्की की यामुळे या फिल्म्स कोणत्या कॅटेगरी मध्ये येतात हे समजायला मदत झाली.

अजून एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे, त्या काळात ज्या पॉर्न फिल्म्स तयार व्हायच्या, त्याच पॅकिंग कव्हर हे ब्लु कलर मध्येच असायचं. आता पोस्टर्स ब्लु म्हणून त्याच्या रील्सचे पॅकिंग पण ब्लुच व्हायला लागले. बेसिकली या खूपच लो बजेट असायच्या पण पैसा बक्कळ कमवून द्यायच्या. यात ना अभिनय करावा लागायचा ना डान्स. फक्त एकच काम करून पैसे मिळवण्याच जे उत्तम साधन होत.

आता तिसर कारण म्हणजे,

सुरुवातीच्या काळात अशा फिल्म्स या चोरून वैगरे बनवल्या विकल्या जायच्या. त्यात आणि यांचं बजेट खूपच कमी असायचं. या सगळ्या विंटेज पॉर्न फिल्म्स बऱ्याच काळापर्यंत ब्लॅक अँड व्हाइटच होत्या. म्हणजे जेव्हा कलर पिक्चर आले तेव्हा ही या फिल्म्स ब्लॅक अँड व्हाईट मध्येच दाखवल्या जायच्या.

पुढं या फिल्म्स बघणारे लोक दबाव टाकू लागले की आता तुम्ही आम्हाला वेगळा रंग दाखवा. इतक्या लो बजेट मध्ये कुठून रंगरंगोटी करणार, म्हणून या चित्रपट निर्मात्यांनी एक शक्कल लढवून त्यात ब्लु कलर टाकला. आणि मग या झाल्या ब्लु फिल्म्स.

त्यात आणि अस ही म्हंटल जायचं की या फिल्म्स साठी ब्लु स्पॉट लाईटचा वापर केला जायचा म्हणून पण यांना ब्लु फिल्म्स म्हंटल जायचं.

आता चौथ आणि शेवटचं कारण म्हणजे,

पश्चिमी म्हणजेच युरोपियन देशांमध्ये १०० वर्षांपूर्वी एक ब्लु लॉ नावाचा धार्मिक कायदा होता. हा कायदा चर्चद्वारे मान्यताप्राप्त होता. या कायद्यानुसार रविवारच्या दिवशी काही विशेष कार्यक्रमांवर ( म्हणजे आपले उपवास असले की बायको तुम्हाला जो कार्यक्रम करू देत नाही तो ) बंदी घालण्यात आली होती. असं म्हणतात की, इंग्रज जेव्हा भारतावर राज्य करत होते तेव्हा भारतात पण हा कायदा पाळण्यात येत होता. आता त्या दिवशी तुम्हाला फिल्म्स पण पाहू देण्यात येत नव्हत्या. पण जे लोक रविवारच्या दिवशी पण फिल्म्स बघायचे त्यांना ब्लु म्हंटल जाऊ लागलं. आणि त्या फिल्मसना ब्लु फिल्म्स..

वर्षा मागून वर्ष जाऊ लागली, ब्लु कायदा रद्द झाला पण वरच्या बऱ्याच कारणांनी जो, ब्लु फिल्म्स शब्द अस्तित्वात आला तो मात्र अजूनही तसाच आहे. अशी होते या ब्लु फिल्म्सची, साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.