गरीब देशात एसीची कंपनी चालणार नाही असं म्हटलं जायचं, ब्ल्यूस्टारने ते खोटं ठरवलं

१९६९ साली बॉंबे स्टॉक एक्स्चेंजमध्ये रजिस्टर होणारी पहिली वातानुकूलित [ ac ] आणि रेफ्रिजरेशन कंपनी म्हणजे ब्ल्यू स्टार लिमिटेड. हॉस्पिटल, फार्मसी, फूड सप्लाय चेन, नाशवंत वस्तूंचे गोदाम अशा ठिकाणी सगळ्यात जास्त सेवा हि ब्ल्यू स्टार लिमिटेड कंपनी देते. पण या कंपनीचा सुरवातीचा प्रवास कसा होता याबद्दल जाणून घेऊया.

१९४३ मध्ये मोहन टी अडवाणी यांनी दोन कर्मचारी आणि सुरवातीचं भांडवल २००० रुपयांच्या जीवावर ब्ल्यू स्टारची सुरवात केली. सुरवात झाली ती रेफ्रिजिरेटर आणि एअर कंडिशनरच्या पुनर्निर्मितीपासून. पुढे काही वर्षातच आईस कँडी मशीन, बाटली कुलर आणि वॉटर कुलर तयार करणारी ब्ल्यू स्टार हि इंटरनॅशनल कंपनी बनली. मग हळूहळू इंटरनॅशनल स्तरावर मान्यताप्राप्त कंपन्यांशी त्यांनी पार्टनरशिप केली. 

१९५४ मध्ये हनीवेल वितरक म्हणून ब्ल्यू स्टारची निवड करण्यात आली ज्यामुळे त्यांना व्यावसायिक इलेकट्रोनिक क्षेत्रात प्रवेश करता आला. व्यावसायिक एसीमध्ये त्यांची चांगली प्रगती झाली आणि लोकांकडूनसुद्धा ब्ल्यू स्टारला चांगला प्रतिसाद मिळू लागला. १९६० पर्यंत ब्ल्यू स्टारचे उत्पन्न हे १ कोटीच्या घरात गेलं होतं. पुढच्या काही दशकात ब्ल्यू स्टारने अत्यंत यशस्वी उपक्रम राबवले.

ब्ल्यू स्टार हेवलेट पॅकार्डचे वितरक बनले आणि मुंबईतील नरिमन पॉईंट येथील एअर इंडिया बिल्डिंग, एक्स्प्रेस टॉवर्स आणि हॉटेल ओबेरॉयचे एसीचे करारसुद्धा ब्ल्यू स्टारने मिळवले. ब्ल्यू स्टार १९९० आणि २००० साली बऱ्याच उपक्रमांमध्ये सहभागी होती.

२००१ पर्यंत ब्ल्यू स्टार एसी क्षेत्रात कार्यरत होते आणि त्याची निर्यातसुद्धा करत होते. पण कंपनीने लवकरच इलेकट्रीकल काँट्रॅक्टिग, प्लम्बिंग आणि फायर फायटिंग सेगमेंटच्या व्यवसायात प्रवेश केला. सेंट्रल एअर कंडिशनर आणि रूम एअर कंडिशनर या दोन प्रकारात ब्ल्यू स्टार कार्यरत आहेत. सोबतच एसी क्षेत्रात सगळ्यात मोठा ब्रँड म्हणून ब्ल्यू स्टारचं नाव आहे. हॉटेल्स, शॉपिंग मॉल, विमानतळ, रुग्णालये, चित्रपटगृहे, बँका अशा बऱ्याच ठिकाणी ब्ल्यू स्टारचे एसी आपल्याला पाहायला मिळतात आणि यावरूनच ब्ल्यू स्टारची लोकप्रियता कळून येते. 

२०११ नंतर ब्ल्यू स्टारने ग्राहकांना घरपोच एसीची सेवा देण्यास सुरवात केली. ब्ल्यू स्टारने व्यावसायिकदृष्ट्या स्वयंपाक घर उपकरणे आणि हेल्थकेअर रेफ्रिजरेशन क्षेत्रात प्रवेश केला पण एसी हीच त्यांची मेन ओळख झाली. त्याच्या उत्पादनाच्या श्रेणीमध्ये रूम एअर कंडिशनर्स, एअर प्युरिफायर्स, एअर कूलर – कॅसेट, मेगा स्प्लिट आणि व्हर्टिकूल एअर कंडिशनर्स, वॉटर प्युरिफायर्स, वॉटर कूलर, सेंट्रल एअर कंडिशनिंग सिस्टम्स, कोल्ड स्टोरेज, कमर्शियल रेफ्रिजरेशन आणि मॉर्च्युअरी चेंबर्स सारखी विशेष उत्पादने समाविष्ट आहेत.

ब्लू स्टारची नाविन्यपूर्ण आणि ऊर्जा-कार्यक्षम उत्पादन श्रेणी सुमारे २९०० चॅनेल भागीदार आणि ७६५ सर्व्हिस असोसिएट्सच्या मजबूत नेटवर्कद्वारे उपलब्ध आहे, ८०० पेक्षा जास्त शहरांमधील ५००० स्टोअरमध्ये ग्राहकांना सेवा देत आहे. उत्पादन, विपणन आणि विक्रीचा पाठपुरावा करण्यासाठी त्याच्याकडे विक्रीनंतरचे विश्वसनीय कर्मचारी आहेत. यामुळे त्याच्या विभागातील एक मार्कर लीडर म्हणून त्याचे स्थान पक्के झाले आहे. 

ब्लू स्टारने विमानतळ, मेट्रो स्टेशन आणि संसद भवन, राष्ट्रपती भवन आणि साउथ ब्लॉकमधील सरकारी प्रतिष्ठानांवर अनेक महत्त्वाचे आणि जटिल वातानुकूलन आणि शीतकरण प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. हे सार्क, आशियान प्रदेश आणि उत्तर आफ्रिकेतील बाजारपेठांमध्ये आपली उत्पादने निर्यात करते. त्याची वार्षिक कमाई ५ हजार ४०० कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते.

ब्लू स्टारच्या जाहिरात आणि जाहिरात धोरणात टेलिव्हिजन, प्रिंट मीडिया, होर्डिंग्ज आणि इंटरनेटचा समावेश आहे. क्रिकेटर विराट कोहली २०१९ मध्ये त्याचा ब्रँड अम्बेसेडर बनला. तो ग्राहकांच्या भेटींमध्ये गुंतवणूक करतो, व्यापार कार्यक्रमांना प्रायोजित करतो आणि प्रदर्शनांमध्ये भाग घेतो. 

२००८ मध्ये फोर्ब्ज आशियाच्या २०० बेस्ट अंडर अ बिलियनच्या यादीत समाविष्ट असलेल्या २० भारतीय कंपन्यांपैकी ब्ल्यू स्टार एक होती. आज घडीला बऱ्याच लोकांना रोजगार देण्याचं कामसुद्धा ब्ल्यू स्टार करत आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.