ब्लूटूथ नाव पडण्यामागे डेन्मार्कच्या राजाचा मोठा पराक्रम आहे…..
सध्याचा जमाना हा पूर्णपणे डिजिटल आहे. प्रत्येक फोन मध्ये ब्लूटूथ असतंच. फक्त फोनच नाही तर इतर गॅजेट्स, टीव्ही आणि गाडी या ठिकाणीसुद्धा आपण ब्लूटूथ कनेक्ट करू शकतो. ब्लूटूथमुळे फक्त मोबाईलचा वापरच सोपा झाला असं नाही तर फाईल शेअर करण्याच्या कामालासुद्धा एकदम मामुली करून टाकलं. ब्लूटूथमुळे सगळ्या जगाला वायरलेस कम्युनिकेशन म्हणजे काय असतं याचा अर्थ कळाला.
पण हे जे ब्लूटूथ उपकरण आहे त्याचं नाव ब्लूटूथ कस पडलं यामागे एक मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. १० व्या दशकातल्या एका राजामुळे ब्लूटूथ या नावाची निर्मिती झाली . १९९६ मध्ये जेव्हा काही मोठ्या कंपन्या intel, Ericson, Nokia आणि नंतर IBM ने मिळून टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीमध्ये शॉर्ट रेंज वायरलेस लिंक साठी नवीन उपकरण किंवा स्टॅंडर्ड बनवायच्या विचारात होते ज्यामुळे नवीन काम सुरु करता येईल.
यासाठी प्रत्येक कंपनीने स्वतःसाठी शॉर्ट रेंज रेडिओ टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. पण त्यांनी या टेक्निकला दिलेली नावं मात्र कुणाच्या पचनी पडली नाही. नावावर सगळा खेळ असतो त्यामुळे चांगलं नाव ठरत नव्हतं. या कंपनीचा हेतू होता कि एका शॉर्ट रेंज वायरलेस लिंक सोबत सेल्युलर आणि पीसी जोडता यायला हवा. याच वेळी एका ऐतिहासिक पुस्तकाचा उल्लेख झाला.
या पुस्तकाचं नाव होतं The Longships by Frans G. Bengtsson. हे पुस्तक मध्ययुगातल्या स्कँडिनेव्हियन Harald Gormsson वर आधारित होतं. ज्याने ९४० ते ९८६ या काळात डेन्मार्क आणि नॉर्वेवर राज्य केलं. त्या काळात इतर राजांप्रमाणे हराल्ड गॉर्मसनला सुद्धा टोपणनाव होतं BLATONN.ज्याचा अजून एक अर्थ होता ब्लूटूथ.
हा राजा आपल्या मूळ नावाऐवजी Harald Bluetooth या नावाने ओळखला जात असे.
राजा हराल्ड ब्लूटूथ आपल्या वडिलांचं अपूर्ण असलेलं स्वप्न पूर्ण करायच्या तयारीत होता. त्याच्या वडिलांची इच्छा होती कि डॅनिश समाजातील लोकांना एकत्रित करून एक भव्य डॅनिश साम्राज्य उभारलं जावं. त्यामुळे Harald Bluetooth राजाने डॅनिश योद्धयांना एकत्र केलं आणि एक कुशल राजा म्हणून त्याची इतिहासात नोंद झाली. हराल्ड ‘ब्लुटूथ’ गोर्मसॉंन राजाने डेन्मार्क आणि नॉर्वेचे यशस्वी एकत्रीकरण केलं हि सुद्धा मोठी घटना मानली गेली.
या पुस्तकातील घटनेमुळे वायरलेस लिंक वर काम करणाऱ्या कंपन्यांनी दोन प्रदेश जोडण्याच्या घटनेवरून प्रेरित होऊन ब्लूटूथ नाव फायनल केलं. या नावामागे असा उद्देश होता कि,
ज्याप्रमाणे राजाने आपल्या प्रजेचा विश्वास जिंकून घेतला आणि प्रजेला स्वतसोबत जोडून ठेवलं त्याप्रमाणेच ब्लूटूथ हे वायरलेस उपकरण सुद्धा एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसला जोडून ठेवण्याचं काम करेल.
अजून एक याबद्दल सांगण्यात येतं कि Harald Gormssonचा एक दात हा खराब झाला होता आणि त्याला निळसर झाक आली होती. त्यामुळेसुद्धा ब्लूटूथ नाव पडल्याचं बोललं जातं. ब्लूटूथचा लोगोसुद्धा हराल्ड ब्लॅटन्ड वरून बनवण्यात आला. ᚼ ᛒ या दोन चिन्हांवरून हा लोगो बनवण्यात आला होता. ᚼ म्हणजे H आणि ᛒ म्हणजे B .
आज मार्केटमध्ये इतक्या कंपन्या आहेत आणि स्पर्धा इतकी आहे कि ज्याचं नाव भारी असेल तिकडे लोकं आकर्षित होतात. प्रत्येक ब्रँडचं नाव दर्जेदार आणि अर्थपूर्ण असावं म्हणून मालकांची धडपड चालू असते, पण एका राजाच्या ऐतिहासिक आणि पराक्रमी घटनेतून ब्लूटूथचा जन्म झाला. आज प्रत्येक इलेकट्रोनिक डिव्हाइसमध्ये ब्लूटूथ असणं फार महत्वाचं मानलं जातं.
हे हि वाच भिडू :
- MORDE CHOCOLATE फॉरेनचा ब्रँड नाही; हे चॉकलेट अस्सल मराठी आहे..
- मराठी माणसाने किराणा दुकानातून सुरु केलेला विको ब्रँड आज घडीला ४५ देशांमध्ये पोहचला आहे.
- खेळाडूंनी ब्ल्यूटूथ बँडचा नियम न पाळल्यामुळे आयपीएलमध्ये कोरोनाची एंट्री झालीय….
- कोरोनाची दुसरी लाट वाढलीय आणि आरोग्य सेतूचं रेटिंग दिवसेंदिवस ढासळत चाललंय..