मुख्यमंत्री मोदींचा GM च्या प्रोजेक्टवर डोळा होता, पण समोर विलासराव होते..!!!

टाटा एअरबसचा प्रचंड मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्रात नागपूरमध्ये होणार अशी जोरदार चर्चा होती. नागपूरला प्रोजेक्ट होणं कसं फायद्याचं आहे, हे सुद्धा वारंवार सांगण्यात येत होतं, मात्र प्रकल्प होतोय गुजरातला. आता त्याच्यावरून वादविवाद होतायत आहे आरोपही.

मात्र टाटा एअरबस असेल किंवा वेदांता फॉक्सकॉन अशा प्रकारे महाराष्ट्रातील प्रकल्प पळवण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील महाराष्ट्रासाठी फायनल झालेले प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याची उदाहरणे आहेत.  

जर्मन कार निर्मिती कंपनी BMW ला भारतात कार निर्मीतीचा प्रकल्प सुरु करायचा होता. ते सालं होते २००४.

तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे BMW चा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी आग्रही होते. तसे प्रयत्न देखील त्यांनी सुरु केले होते. त्यासाठी पुण्याशेजारील तळेगावची जागा सुद्धा देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. 

BMW कंपनीला भारतात प्रकल्प सुरु करायचा होता.

यासाठी कंपनीच्या वतीने ८ जणांची टिम भारतात पाठवण्यात आली होती. BMW च्या वतीने पहिल्यांदाच अशा प्रकारची टिम भारतात पाठवण्यात आली होती. या टिमच्या वतीने अनेक ठिकाणची पाहणी करण्यात आली.

 BMW च्या या प्रकल्पासाठी ५० ते ७० एकर जागा लागणार होती. दरवर्षी दिड हजार कार असेम्बल करण्यात येणार होत्या. त्यानंतर वर्षाला १५ हजार कार असेम्बल करण्याची इच्छा कंपनीची होती. त्यावेळी या प्रकल्पातून साधारण ३०० लोकांना रोजगार मिळणार होता.  या प्रकल्पासाठी BMW कंपनी साधारण १८० कोटी रुपये खर्च करणार होती. BMW कंपनी सुट्टे भाग जर्मनीतून आयात करेल आणि कार असेम्ब्ल इथल्या प्रकल्पात करणार होती. तसेच कंपनीच्या वतीने भविष्यात गुंतवणूक वाढवण्यात येईल असे सांगितले होते.  

शेवटी BMW कंपनीच्या वतीने पाठवण्यात आलेल्या टिमने कार असेम्ब्लचा प्रकल्प तामिळनाडू किंवा महाराष्ट्रात उभा करता येऊ शकतो असा अहवाल तयार केला होता. 

विलासराव देशमुख BMW चा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी प्रयत्नशील होते. अहवालात तामिळनाडूचे सुद्धा नाव होते. तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता या सुद्धा BMW चा प्रकल्प त्यांच्या राज्यात यावा म्हणून आग्रही होत्या. 

कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक आणि सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोई सुविधा पाहता BMW ने आपला प्रकल्प तामिळनाडूत नेण्याच्या निर्णय घेतला. यासाठी चेन्नई जवळील महिंद्रा इंडस्ट्रियल पार्कची जागा निवडण्यात आली. 

BMW चा प्रकल्प राज्यात येता- येता राहिल्याने विलासराव देशमुख यांच्यावर बरीच टिका सुद्धा झाली होती. 

जरी २००४ साली BMW प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकला नाही. त्यानंतर दोन वर्षांत जनरल मोटर्सचा एक प्रकल्प देशात येणार होता. तो प्रकल्प गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पळवतील अशी भीती महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना होती. 

१९९५ पासून महाराष्ट्र्र वाहन निर्माती कंपन्या राज्यात याव्यात म्हणून प्रयत्नशील होत्या. फियाट आणि अशा काही कंपन्या राज्यात आल्या होत्या. तर फोर्ड, ह्युंडई, मित्सुबुशी आणि BMW चा प्रकल्प तामिळनाडूला पसंती दिली जात होती. मात्र राज्याला म्हणावे असे यश मिळत नव्हते. काही प्रकल्प तर हातचे पळवण्यात येत होते.  

२००६ मध्ये जनरल मोटर्सच्या वतीने लहान कारच्या निर्मीतीसाठी प्रकल्प सुरु करायचा होता. त्यासाठी देशात अनेक ठिकाणी जागा सुद्धा कंपनीच्या वतीने पाहण्यात येत होती. २००५ मध्ये महिंद्रा महिंद्रा कंपनीच्या वतीने चाकण येथे तर टाटा फियाट कंपनीचा प्रकल्प रांजणगाव येथे प्रकल्प सुरु करण्यात आला होता. 

जनरल मोटर्सचे उपाध्यक्ष निक रिली यांच्या संपर्कात राज्यातील अधिकारी तर होतेच स्वतः मुख्यमंत्री विलासराव देशमुख या प्रकल्पावर लक्ष ठेऊन होते. त्यानंतर निक यांनी घोषणा केली कि जनरल मोटर्सचा प्रकल्प महाराष्ट्रातील तळेगाव येथे होईल. यासाठी कंपनीच्या वतीने ३ हजार कोटींची गुंतवणूक केली. 

या गुंतवणुकीनंतर विलासराव देशमुख म्हणाले होते की,

जनरल मोटर्स महाराष्ट्रात येत असल्याचा मला आनंद होत आहे. राज्य सरकार प्रकल्पासाठी लागणाऱ्या सगळ्या परवानग्या लवकरात लवकर देईल असेही सांगितले होते.  जनरल मोटर्स लहान कार बनवणार होते. या प्रकल्पातून दरवर्षी १ लाख ४० हजार कार तयार होणार होत्या. 

मात्र प्रकल्प साइन होण्यापूर्वी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना एक वेगळीच भीती वाटत होते. झाले असे की, निक यांनी प्रकल्प साइन करण्यापूर्वी गुजरात भेट दिली होती. त्या भेटीत निक हे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी जनरल मोटर्सचा प्रकल्प कसा असेल याची माहिती मोदी यांना दिली होती.

त्यामुळे महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना भीती होती की, गुजरातचे मुख्यमंत्री शेवटच्या क्षणाला जनरल मोटर्सचा प्रकल्प गुजरात नेतील. हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते. मात्र विलासराव देशमुख यांना तो शेवटी महाराष्ट्रात हा प्रकल्प आणला.

२००८ मध्ये जनरल मोटर्सचा प्रकल्प तळेगाव येथे सुरु झाला होता. २०२० पर्यंत तो सुरु होता. त्यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळाला. सध्या असाच प्रकारे राज्यातील प्रकल्प पळवण्यावरून राजकारण सुरु आहे. 

हे ही वाच भिडू 

 

  

 

Leave A Reply

Your email address will not be published.