boAt म्हणजे दर्जा ! हा हेडफोन भारतीय आहे हे अनेकांना सांगून पटत नाही

चांगले संगीत ऐकणे हा स्वतःवर उपचार करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि त्यासाठी परवडणारी  हेडफोन्स मिळत असतील तर उत्तमच आहे.

आजकाल प्रत्येकाच्या गळ्यात अडकवलेला ब्लूटूथ हेडफोन असो वा वायरवाला जुन्या स्टाईल चा हेडफोन असो त्यात एक हेडफोन ब्रँड लोकांच्या आवडीचा ब्रँड बनला आहे. boAt ! सर्वांनाच परवडणारा, स्टायलिश आणि चांगल्या दर्जाची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी.

अनेक दशकांपासून भारत हे सॉफ्टवेअरचे पॉवरहाऊस म्हणून ओळखले जातेय, ज्यामध्ये कंपन्या आणि स्टार्टअप्स जागतिक दर्जाची उत्पादने आणि सेवा देत असतात. पण आता, भारतीय कंपन्या हार्डवेअरमध्ये देखील आपली क़्वालीटी प्रोडक्ट देत आहेत. त्यातलाच एक म्हणजे boAt हेडफोन ब्रँड होय. जे कि एक भारतीय कंपनी आहे.

इयरफोन, हेडफोन आणि स्मार्ट घड्याळे विकणारी दिल्लीतली boAt लाइफस्टाइल कंपनी जगातील पाचव्या क्रमांकाची वेअरएबल ब्रँड बनली आहे.

आयडीसी इंडियाचे क्लायंट डिव्हाइसेसचे सहयोगी संशोधन व्यवस्थापक जयपाल सिंह नेहेमीच म्हणतात कि, “वायरलेस इअरवेअर श्रेणीतील संधी ओळखणाऱ्या आणि योग्य किंमतीमध्ये उत्पादने बाजारात आणणाऱ्या भारतीय विक्रेत्यांमध्ये प्रथम होते.” तथापि, IDC ने नमूद केले की BoAt ची उपस्थिती भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आहे आणि कंपनीकडे Apple, सॅमसंग आणि हुआवेई सारख्या मोठ्या कंपन्यांची जागतिक उपस्थितीचा आणि पुरवठा साखळीचा अभाव आहे. पण तरी देखील कंपनी जगातली टॉप हेडफोन कंपनी बनली आहे.

boAt ब्रँड ने आपल्याला हेडफोन्स, इयरफोन, स्पीकर्स, ट्रॅव्हल चार्जर आणि प्रीमियम केबल्स सारखे   प्रोडक्ट्स देऊन आपल्या लाइफस्टाइल मध्ये क्रांती आणली आहे. बाजारात अनेक उत्कृष्ट ब्रॅण्ड्स आहेत ज्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादने ऑफर केली आहेत परंतु त्यांची समस्या अशी आहे की ते एकतर खूप महाग होते किंवा डोळ्यांना भयानक दिसतात. आणि boAt ने स्टायलिश उत्पादने देऊन  इथेच आपले वेगळेपण सिद्ध करत ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे.

BoAt सुरु करण्यामागे काय कल्पना होती?

boAt या कंपनीचा दिल्लीस्थित स्टार्टअप आहे जे २०१६ मध्ये अमन गुप्ता आणि समीर मेहता यांनी सुरू केली होती. कंपनी स्वतःला एक लाइफस्टाइल ब्रँड म्हणून ओळखते जी फॅशनेबल ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित आहे.

याचे वैशिष्ट म्हणजे, boAt जीवनशैली परवडण्यायोग्य, टिकाऊ आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे, ‘फॅशनेबल’ ऑडिओ उत्पादने आणण्याच्या एकमेव उद्देशाने हि कंपनी सुरू केली गेली आहे.

 सुरुवातीला कंपनी केबल उत्पादक आणि विक्रेता म्हणून सुरू केली होती.

पण आज या दोघांनी आपला कॅटलॉग वाढवला आहे. आता हे ट्रॅव्हल चार्जर आणि प्रीमियम केबल्सपासून हेडफोन, इयरफोन, स्पीकर पर्यंत विविध प्रकारच्या फॅशनेबल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करतात.

कंपनी वरचेवर वाढत आहे आणि आपली सेवा कोट्यावधी ग्राहकांपर्यंत वाढवत आहे. कंपनीला सुरुवात होऊन फक्त चार वर्षे झाली आहेत परंतु आज कंपनीकडे ८००,००० हून अधिक आनंदी ग्राहक आहेत. 

boAt या कंपनीचे संस्थापक अमन गुप्ता इलेक्ट्रॉनिक्स व्यापारात आधीपासूनच होते. त्यांनी आपल्या कौटुंबिक व्यवसायात २००७ ते २०१० असे तीन वर्षे काम केले. व्यवसायात सामील होण्यापूर्वी, त्यांनी  चार्टर्ड अकाउंटन्सी पूर्ण केली आणि २००३ ते २००६ दरम्यान सिटी बँकेत नोकरी देखील केली होती.

२०१० मध्ये, त्याने इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (ISB) मध्ये MBA साठी प्रवेश घेतला ज्यामुळे त्याच्या ऑडिटिंग फर्म KPMG मध्ये नियुक्ती झाली. त्याने तेथे सहा महिन्यांच्या अल्प कालावधीसाठी काम केले परंतु ते त्याच्यावर परिणाम करण्यासाठी पुरेसे होते. त्याला इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅझेट्सने आकर्षित केले आणि JBL मध्ये अर्ज केला. कंपनीने त्याला दोन वर्षांसाठी करारबद्ध केले. गुप्ता यांनी क्रोमा आणि रिलायन्स डिजिटल सारख्या स्टोअरद्वारे स्टार्ट-अपचे ऑफलाइन वितरण व्यवस्थापित केले.

थोड्या काळाने ते उत्पादन व्यवस्थापनात देखील आले. भारतीय बाजारपेठेसाठी योग्य उत्पादने ओळखणे हे त्यांचे काम होते. JBL साठी काम करताना त्यांचा अनुभव boAt च्या उत्पादनाच्या  दरम्यान उपयोगी पडला.

“आम्ही इलेक्ट्रॉनिक्समध्ये झारा ब्रॅण्डसारखे आहोत, लक्झरी ब्रॅण्डसारखे उच्च किंमतीचे किंवा चीनी उत्पादनांसारखे स्वस्त नाही” असं अमन गुप्ता म्हणतात.

२०१८ मध्ये, फायरसाइड व्हेंचर्सचे कंवलजीत सिंग यांनी कंपनीमध्ये ६० दशलक्ष गुंतवले. उत्पादनाची गुणवत्ता आणि योग्य लक्ष्यीकरण करण्याची संस्थापकांची क्षमता पाहून सिंह प्रभावित झाले होते.

कंपनी सतत बाजारात कामगिरी करत आहे. एकट्या देशांतर्गत विक्रीत १०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. फक्त दोन संस्थापकांकडून, कंपनी आता ३५ सदस्यीय टीम आहे आणि त्याची कार्यालये मुंबई आणि दिल्ली या दोन महानगरांमध्ये आहेत.

boAtची २०१७ मध्ये २७ कोटी इतकी कमाई होती ती पुढच्याच वर्षांत २०१८ मध्ये १०८ कोटी रुपये झाली.

हे दरवर्षीच्या मानाने तिप्पट वाढ होती. तरुण कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स प्लेअरचा दावा आहे की, आता दररोज ६,००० युनिट्सची विक्री होते आणि प्रत्येक मिनिटाला चार युनिट विकल्या जातात.

सुरुवातीच्या काळात, boAt ने आपली उत्पादने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरच विकली- अमेझॉन आणि फ्लिपकार्ट. आज, कंपनी ५,००० रिटेल स्टोअरमध्ये उतरली आहे, ज्याला २० वितरकांचा पाठिंबा आहे. दिवसाला १०,००० युनिट आणि वर्षाला चार दशलक्ष युनिट विकल्याचा कंपनीचा दावा आहे.

कंपनी म्हणते की, त्यांनी आतापर्यंत २० दशलक्षाहून अधिक भारतीयांना आपले उत्पादने विकली आहेत.

या ब्रँडचा अलीकडेच बाजारात प्रवेश केला आहे परंतु कंपनीने इतकी मोठी मजल मारली आहे कि,  boAt लाइफस्टाइल स्टाईलिश आणि टिकाऊ उत्पादने देते जी लोकांना अपील होतात, त्यांचा बाजारावर इतका परिणाम झाला आहे की बोएटच्या उत्पादनांच्या लोकप्रियतेमुळे जेबीएलसारख्या मोठ-मोठ्या  कंपन्यांना स्पर्धा करण्यासाठी त्यांच्या उत्पादनांच्या किंमती कमी कराव्या लागल्या आहेत.

हे इंटरेस्टिंग आहे वर सांगितल्याप्रमाणे, अमन गुप्ता जे जेबीएलमध्ये कधीकाळी काम करत होते आज त्यांचा स्वतःचा ब्रँड इतका मोठा झाला आहे कि, मोठ मोठाल्या कंपन्या त्यांच्याशी स्पर्धा करतात. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.