आजही पाकिस्तानी कोच बॉब वूल्मर यांचा मर्डर हा मिस्ट्रीचं मानला जातो.

क्रिकेट म्हणल्यावर चौकार, षटकार,पैसा,चिअर लिडर्स आणि बरंच काही काही असतं पण याव्यतिरिक्त क्रिकेट जितका ग्लॅमरवाला खेळ वाटतो ना त्याहीपेक्षा रिस्की जास्त वाटतो. क्रिकेटमध्ये अशा कितीतरी रहस्यमय घटना घडल्या आहेत ज्या अजूनही रहस्यचं बनून राहिल्या आहेत. ड्रेसिंग रुममधल्या अशा गोष्टी ज्या बाहेर आल्या नाहीत. ड्रेसिंग रुममध्ये आत्मा असल्याच्या गोष्टी किंवा भुताटकीच्या गोष्टी त्यासोबतच इंग्लड मधल्या अनेक हॉटेलमध्ये अशा गोष्टी घडल्या आहेत पण ती मिस्ट्री बनून राहिल्या. आजचा किस्सा अशाच एका मर्डर मिस्ट्रीचा जी क्रिकेट इतिहासात अजूनही रहस्यचं आहे.

बॉब वूल्मर

एकेकाळी पाकिस्तानला फॉर्मात आणणारे कोच म्हणून त्यांची ख्याती होती. पण त्यांच्या निधनाला कधी हार्ट अटॅकचं नाव देण्यात आलं तर कधी विष देऊन खून करण्याचं नाव देण्यात आलं. अशा अनेक शक्यता वर्तविण्यात आल्या. 18 मार्च 2007 रोजी बॉब वूल्मरचं प्रेत अनेकांच्या भुवया उंचावून गेलं. तसं बघितलं तर बॉब वूल्मर यांचं मोठं योगदान पाकिस्तान क्रिकेटसाठी आहे. कानपूर मध्ये बॉब वूल्मरचा जन्म झाला पण पुढच्या काही काळातच त्यांचं कुटुंब इंग्लंडला शिफ्ट झालं आणि बॉब वूल्मर यांचं पुढचं शिक्षण आणि करियर हे इंग्लंडमध्ये घडलं. क्रिकेटची आवड होतीच त्यामुळे क्रिकेट हेच करियर त्यांनी निवडलं.

शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केल्याने बॉब वूल्मर लवकरच इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय संघात सामील झाले. 1975 ते 1981 या काळात इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा बॉब वूल्मर महत्वाचे खेळाडू होते. 19 टेस्ट आणि 6 वनडे मॅचेसमधे बॉब वूल्मर यांचा सहभाग होता. क्रिकेट खेळायला त्यांनी रामराम ठोकला आणि ते कोच बनण्याच्या भूमिकेत शिरले. इंटरनॅशनल लेव्हलवर सगळ्यात आधी बॉब वूल्मर यांनी साऊथ आफ्रिका संघाकडून कोचिंगची सुरवात केली. बॉब वूल्मर कोच झाल्यानंतर संघाला भरभराटीचे दिवस आले.

बॉब वूल्मर हे पहिले असे कोच होते ज्यांनी क्रिकेट या खेळात बारीकसारीक चुका किंवा सजेशन देण्यासाठी मैदानात कॉम्प्युटर वा लॅपटॉप आणण्याची सुविधा केली.

त्यावरच त्यांनी कॅटलॉग बनवला आणि तीच पद्धत पुढे अनेक लोकांनी वापरायला सुरवात केली. आपली हटके शैली आणि युनिक कोचिंग यामुळे कोचिंग क्षेत्रात बॉब ऊल्मर यांनी मोठी क्रांती घडवून आणली.

१९९५ साली बॉब वूल्मर यांच्या कोचिंग अंडर आफ्रिकन टीम स्ट्रॉंग टीम म्हणून पुढे आली आणि इतर देशांना जबऱ्या टक्कर देऊ लागली.आफ्रिकन टीमने गाठलेली उंची बघता २००१ साली आयसीसीने बॉब वूल्मर यांची नेमणूक नेदरलँड, नामीबिया,केनिया, झिम्बाब्वे या टीमच्या कोच पदासाठी केली जेणेकरून त्या टीमचं क्रिकेट स्टँडर्ड वाढेल.

बॉब वूल्मर यांची मेहनत दिसून आली ती २००३ वर्ल्ड कप मध्ये. विशेषतः केनियाने जो पावर दाखवला होता वर्ल्डकपला त्याचं सगळं क्रेडिट हे बॉब वूल्मर यांनाच जातं. केनियाने चार विजयासह सगळ्यांच्या पुंग्या टाईट केल्या होत्या. जगभरात आपल्या कोचिंगने दरारा निर्माण करणारे बॉब वूल्मर नंतर पाकिस्तान क्रिकेट टीमचे हेडकोच झाले खरे पण हीच टीम त्यांची शेवटची टीम ठरली.

बॉब वूल्मर कोच झाल्यावर पाकिस्तान क्रिकेट टीम झपाट्याने वर आली आणि भारत ,ऑस्ट्रेलिया संघांपुढे ते बलाढ्य संघ म्हणून प्रस्थापित होऊ लागली. आता इथं ट्विस्ट बघा बरं, सगळं आलबेल होतं, पाकिस्तान टीम बॉब वूल्मर यांच्या कोचिंग अंडर नवनवीन प्रयोग करून क्रिकेटमध्ये टॉपला जात होती पण त्याच काळात ड्रेसिंग रूममधून नवनवीन घटना मिडियाकडून पुढे येऊ लागल्या होत्या. पाकिस्तानी खेळाडू आणि बॉब वूल्मर यांच्यात भांडणं असल्याचं बोललं जाऊ लागलं होतं.

जयपूर टेस्ट नंतर हा प्रकार अजूनच वाढू लागला, तेव्हा बातमी आली की बसमध्ये शोएब अख्तर आणि बॉब वूल्मर यांच्यात मारामारी करण्यापर्यंत प्रकरण गेलं होतं. असंही सांगण्यात आलं की बॉब वूल्मरला शोएब अखतरने कानफडवलं होतं. पण खेळाडूंनी हे प्रकरण खोटं असल्याचं सांगितलं. एवढं असूनही बॉब वूल्मर आपल्या कामापासून बाजूला झाले नाही त्यांनी पाकिस्तानला एक दमदार टीम म्हणून जगभरात प्रसिद्ध केलं. एवढं असूनही पाकिस्तानच्या काही खेळाडूंशी त्यांची भांडणं होतच राहिली.

या कुरबुरीच्या कारणांवरून बॉब वूल्मर यांचं एक विधान मीडिया मध्ये जास्तच उचलून धरलं गेलं ते म्हणजे, पाकिस्तानचे काही खेळाडू प्ले से ज्यादा प्रे पर ध्यान देते है. यावर जावेद मियाँदाद आणि इम्रान खानवर आरोपसुद्धा लावले गेले होते.

आरोप प्रत्यारोप होत राहिले याच काळात 2007 साली पाकिस्तानची टीम दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली. पण आपापसात असलेल्या मतभेदांमुळे पाकिस्तानला या दौऱ्यावर आफ्रिकेकडून सपाटून मार खावा लागला. हे पुढे सुद्धा चालूच राहिलं, आणि वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आयर्लंडसारख्या संघाकडून हरल्याने जगभर पाकिस्तान टीमची लोकं मस्करी करत होते.

हरून आलेली पाकिस्तान टीम तेव्हा गप्पच राहिली, बसमध्ये एकही खेळाडू एकमेकांना काहीच बोलला नाही. पाकिस्तानी फॅन्स आणि मीडियाने नेहमीप्रमाणे स्वतःच्याच टीमचे वाभाडे काढले होते. हॉटेलमध्ये आल्यावर सगळे खेळाडू आपापल्या रूममध्ये गेले. बॉब वूल्मर 374 क्रमांकाच्या त्यांच्या रूममध्ये गेले. नेहमीसारखी रात्र गेली पण सकाळी बोभाटा झाला कारण 374 नंबरच्या समोर पोलिसांनी गर्दी केली होती.

३७४ नंबरच्या रूमच्या बाथटबमध्ये बॉब वूल्मर यांचं प्रेत पडलेलं होतं. आता सगळे प्रश्न उभे राहिले की हा मर्डर आहे की सुसाईड ?

पोलिसांनी दिलेल्या रिपोर्टनुसार बॉब वूल्मर यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या, नाकातून रक्त वाहत होतं, प्राथमिक उपचारातच डॉक्टर लोकांनी हा मर्डर असल्याचं घोषित केलं. जशी बॉब वूल्मर यांच्या हत्येची न्यूज बाहेर आली जगभरात हलकल्लोळ माजला. पाकिस्तानी टीमला सगळे संशयाच्या नजरेने बघू लागले. सगळ्या टीमला पाकिस्तानमध्ये जाण्यापासून अडवण्यात आलं.

सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले पण फोटो ब्लर असल्याने विशेष काही सापडलं नाही. नंतर आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्या रात्री दोन व्यक्ती फुटेजमध्ये सापडल्या आणि त्या होत्या इंझ्माम उलहक आणि बॉलिंग कोच मुश्ताक अहमद. या नंतर मोठी इन्कवायरी बसवली गेली. तपासाची सूत्र फिरली आणि त्या दिवशी कळलं की मुश्ताक अहमद हे दोन शॅमपेन बॉटल घेऊन बॉब वूल्मर यांच्या रूममध्ये गेले होते. या घटनेला विष देऊन मारण्याचा अँगल सुद्धा देण्यात आला. पण काहीच हाती न लागल्याने पाकिस्तानी टीमला पुन्हा पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली.

शेवटी काहीच हाती न लागल्याने बॉब वूल्मर यांचं निधन हे हार्ट अटॅक आल्याने झाली अशी बातमी बाहेर आली पण आजही बॉब वूल्मर यांचा मर्डर हा मिस्ट्रीचं मानला जातो.

हे ही वाच भिडू :

English Summary: After Bob Woolmer became the coach, the Pakistan cricket team rose to prominence and began to emerge as a strong team ahead of India and Australia. Now look at the twist here, everything was alright, Pakistan team was going to the top in cricket with new experiments under Bob Woolmer’s coaching but at the same time new events were coming out of the dressing room from the media. There was talk of a feud between the Pakistani player and Bob Woolmer.

 

WebTitle : Bob Woolmer’s murder mystery is still unsolved

Leave A Reply

Your email address will not be published.