बॉबीने पिक्चर बनवण्यासाठी सासऱ्याला गंडवून 300 कोटी ढापले?

धरमपाजींना दोन मुले. ढाई किलो वाले सनी आणि नय्यो नय्यो वाले बॉबी. डान्स करणारे एकमेव देओल म्हणून बॉबीला ओळखलं जातं होत, मध्यांतरी डीजे म्हणून त्याची ओळख निर्माण झाली होती.

त्याही पूर्वी बॉबी पिक्चरमध्ये हिरो होता.

पण दुर्दैवाने जगात बॉबी देओलचा फॅन असणारा माणूस असणार नाही. त्यांच्या घरात सुद्धा धर्मेंद्र सकट सगळे सनी पाजीचे फॅन्स असतील.

पण या बॉबीचा एक माणूस फॅन होता, तो म्हणजे त्याचा सासरा.

सासरेबुवा जावयाचे फॅन असणे यात जावई बराच सोज्वळ असला पाहिजे किंवा सासरा पण तेवढाच नालायक लागतो. बॉबी च्या प्रकरणात नेमकं काय झालंय ते तुम्हाला सांगतो.

बॉबी देओलचे सासरे म्हणजे देवेंद्र आहुजा. हे होते मुंबईचे मोठे इन्व्हेस्टमेंट बँकर.

कष्टाने कोट्यवधीची कमाई केली. पण दुर्दैवाने म्हातारपणी पाय घसरला. वयाच्या साठीत एका एयर होस्टेसच्या मागे ते पागल झाले.

घरी बायकोशी भांडणं सुरू झाली.

साधारण याच दरम्यान त्यांची मुलगी बॉबीच्या प्रेमात पडली होती. आता मुलगा सिनेमात काम करतोय, पंजाबी आहे आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे धर्मेंद्रचा लेक आहे म्हटल्यावर आहुजानी पोरीचं धुमधडाक्यात लग्न लावून दिल.

पण इकडे त्यांचं स्वतःच प्रकरण रंगात आलं होतं. नवरा बायकोची भांडणे टोकाला गेली आणि साहेबांनी घर सोडलं.

हे घर म्हणजे साधासुध नाही तर नरिमन पॉईंटला कफ परेड मधल्या आलिशान अपार्टमेंटमधला 14व्या मजल्यावरचा फ्लॅट.

आहुजा दाम्पत्याला पदरी दोन मुली एक मुलगा.

तिघेही लग्नाच्या वयाचे. त्यांच्या समोर ही बापाची आणि आईची भांडणे सुरू होती. छोट्या मोठ्या कुरबुरी की आहुजा साहेब आपल्या फ्लॅटमध्ये कोणी नसताना घुसले, किंवा मुलाला म्हणजे विक्रमला ९ वर्षांनी पोरं झाली पण हे आजोबा नातवाच तोंड बघायला गेलेच नाहीत.

धाकट्या पोरीच्या लग्नाला त्यांनी अट घातली की,

तुझी आई आणि भाऊ जर येणार असतील तर मी तुझ्या लग्नात येणार नाही.

म्हातारा बराच हट्टी होता.

तुमच्या आमच्या घरात असत तशी घरगुती भांडणं पण वाढत गेली. पोरांनी सुद्धा आई वडिलांची वाटणी करून घेतली.

मोठा मुलगा आणि धाकटी मुलगी आईच्या बाजूने होते तर बॉबीची बायको वडिलांच्या बाजूनं उभी राहिली.

देवेंद्र आहुजानी आपल्या मुलाला न्यूजपेपर मधून नोटीस पाठवून जायदादमधून बेदखल केलं आणि त्याचा वाटा तान्या देओल ला दिला.

एवढंच नाही तर त्यांच्या कफ परेडच्या फ्लॅटला सुद्धा तिचं नाव लावलं.

विक्रम भडकला, त्याने बापा विरुद्ध शेअर्सचा घोळ घातला म्हणून केस ठोकली.

त्याचा दावा होता की देवेंद्र आहुजा यांना तान्या आणि बॉबी फूस लावत आहेत. त्यांच्या कुटुंबियांच असंही म्हणणं होतं की बॉबीच्या सिनेमातल्या पडत्या करियरला संभाळण्यासाठी देवेंद्र आहुजा पैसे लावत आहेत.

बॉबी देओलच्या मेहुण्याने आरोप केला की देवेंद्र आहुजा यांनी जवळपास 300 कोटींची प्रॉपर्टी बॉबी आणि त्याच्या बायकोच्या नावाने केली आहे.

कोर्ट केस तर चालली, शिवाय इन्कम टॅक्स ऑफिसने रेड मारली. बॉबीच्या सासुरवाडीत बराच गोंधळ झाला.

अशातच बॉबीच्या सासऱ्याचा मृत्यू झाला. पण त्यांनी जाताजाता फिल्मी स्टाईल मध्ये सांगितलं होतं,

“मेरा अंतिम संस्कार मेरा जमाई करेगा, मेरा बेटा नहीं”

आज बॉबीची बायको बॉबी पेक्षा जास्त पैसे कमावते. तिचा फर्निचर आणि होम डेकोरचा बिजनेस आहे जो मुंबईतल्या उच्चभ्रू कुटुंबात फेमस आहे.

पण आजही तीच तिच्या भावाशी पटत नाही. कोर्टातल्या केस सुरूच आहेत.

आजही तानियाची भावंड बॉबीने सासऱ्याला गंडवून 300 कोटी ढापले असेच आरोप करतात. खरं खोटं कोर्टचं ठरवेल.

बॉबीला 300 कोटी कुठल्या पिक्चर साठी वापरले या बद्दल पत्रकारांनी विचारलं तर देओलस्टाईल मध्ये चिडण्यापेक्षा गाला वर खळी पाडून वेंधळ्या सारख हसत राहतो.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Raghunandan says

    super

Leave A Reply

Your email address will not be published.