किंग बॉबीचे मिम्स फेमस करण्यामागे पाकिस्तानी चाहत्याचा हात आहे

बॉबी देओलच्या प्रेमातून अनेक जण त्याच्यावर मिम्स बनवत असतात. कुठल्याही रोल मध्ये फिट बसणारा अभिनेता म्हणून बॉबी देओलची ओळख आहे. ९० च्या शतकातील हटकेबाज अभिनेता म्हणून बॉबी देओलकडे पाहण्यात येते.

बादल, आशिक, सोल्जर सारख्या चित्रपटातील याचा अभिनय आजही आठवतो.  त्यावेळी बॉबी देओलचे नाव अनेक दिग्गज अभिनेत्री सोबत जोडण्यात येत होते. मात्र सध्या अभिनय किंवा त्याचा कामामुळे नाही तर मिम्समुळे बॉबी देओल वर चर्चेत आला आहे. दोन दिवसांपूर्वी तर बॉबी देओल मिम्समुळे ट्विटरच्या ट्रेनिंग लिस्ट मध्ये सुध्दा होता.

मागच्या काही वर्षातील सोशल मिडीयावरील मिम्स पहिले तर मिम्स हवा आहे. यात बॉबी देओल मागे कसा राहील. मिम्ससाठी सुद्धा बॉबी देओल फेमस असल्याचे पाहायला मिळते. बॉबी देओलकडून सुद्धा त्या मिम्सला प्रोत्साहन दिल्याचे अनेकवेळा दिसून येते.

जेव्हा पण ट्वीटर वर बॉबी देओलचे मिम्स पाहता त्यावेळी ते बॉबीवुड या अकाऊंट वरून शेअर करण्यात आल्याचे पाहायला मिळेत. ते अकाऊंट कोण चालवत असा शोध घेतला तर लक्षात आले की, बॉबी देओलचा पाकिस्तान मधील एक चाहता सीमेपलीकडून बॉबीवुड नावाने अकाऊंट चालवत असल्याचे समजले.  त्या अकाऊटवरूनच बॉबी देओल वरील मिम, व्हिडीओ शेअर करण्यात येते.

बॉबी देओलच्या मिम्सला मिळणारे लाईक पहिले तर हे काही लाखात असतात. हे मिम्स फेमस होण्यामागे सीमेच्या पलीकडे फॅन असल्याचे सांगितले जाते.

बॉबीवुड नावच ट्वीटर अकाऊंट ३१ वर्षीय पाकिस्तानी नागरिक अब्दुल अहद जावेद चालवत आहे. त्याचे २२ हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. स्वतः बॉबी देओल बॉबीवुडला अकाउंट ला फोलो करतो. ९० च्या दशकातील इतर मुलांप्रमाणे अब्दुल अहद जावेद देखील हिंदी चित्रपट पाहून मोठा झाला आहे.

अब्दुलने सांगितले की, आनंद मिळविण्यासाठी बॉबीवुड नावच ट्वीटर अकाऊंट काढले होते. त्यावर बॉबी देओलच्या फोटो आणि व्हीडीओचे मिम्स टाकले. मी अभिनेता बॉबी देओल याच्यावर  टाकलेले मिम्स पाहून लोकं खुश होत होते. अनेकांनी फोन, मेसेज करून मिम्स चांगले होत असल्याचे सांगितले सुद्धा. त्यामुळे काम करतांना मजा येत गेली. आता स्वतः बॉबी देओल बॉबीवुड अकाऊंट फोलो करायला लागल्याने भारी वाटत असल्याचे अब्दुल सांगतो.

मिम्स तयार करण्यासाठी बॉबी देओल का निवडले असे विचारल्या नंतर अब्दुल सांगतो कि, ९० च्या दशका बरोबर २०२१ मध्ये ही बॉबी देओल प्रासंगिक वाटतो.  घरात मनोरंजनाचे साधन हे केवळ टीव्ही हेच होते. लहानपणा पासून बॉबी देओल चित्रपट पाहिले आहेत. ठरावीक दिवशी टीव्हीवर भारतीय चित्रपट दाखविले जात होते. बॉबी देओलचा चित्रपट असेल तर मी आवर्जून पाहत होतो असे अब्दुल सांगतो.

अब्दुलच्या मिम्स वर ९० च्या दशकातील चित्रपटाचा प्रभाव दिसतो. अब्दुल सांगतो की, हे अकाऊंट ट्रोल करण्यासाठी काढले नाही. सकाळी उठल्यावर बातम्या पाहून अनेकांना नैराश्य वाटत. अशावेळी लोकांच्या आनंदात आपला वाटा असावा असे वाटले त्यासाठी बॉबीवुड हे अकाऊंट काढले आहे. आणि त्याला नागरिकांनी चांगली प्रसिद्धी दिली. बॉबी देओलच्या चित्रपटासह जानी दुश्मन आणि गुंडा हे चित्रपट आवडत असल्याचे अब्दुल सांगतो.

जानेवारी महिन्या पासून प्रत्येक मोठ्या घडामोडी नंतर बॉबी देओलचे मिम्स इंटरनेट दिसेलच. त्यात बॉबीवुड या अकाऊंट मोठा हातभार आहे. ट्वीटर बरोबरच फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील  बॉबी देओल वरील मिम्स शेअर करण्यात येते. अब्दुल मुळे पाकिस्तान मध्ये सुध्दा बॉबी देओलचे मिम्स फेमस झाला आहे.

हे ही वाच भिड

Leave A Reply

Your email address will not be published.